Dr-Sarvapalli Radhakrishnan – शिक्षक दिन ५ सप्टेंबर ला का साजरा केला जातो ?

 Dr. Sarvapalli Radhakrishnan-Teacher’s Day – शिक्षक दिन ५ सप्टेंबर ला का साजरा केला जातो ?

राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक आणि महान विचारवंत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना 1954 मध्ये भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त 5 सप्टेंबर ला शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्याविषयी माहिती पुढील प्रमाणे  १) सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म : सुरुवातीचे जीवन 2). सर्वपल्ली राधाकृष्णन यांच बालपण  3). सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण   4). सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राजकीय वाटचाल

Dr. Sarvapalli Radhakrishnan

  • Sarvapalli Radhakrishnan
  • Sarvapalli Radhakrishnan-सुरुवातीचे जीवन

  • १) सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म : –
    राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून साजरा करतो
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी  तिरुत्तनी या ठिकाणी झाला होता.
    भारताच्या तामिळनाडू राज्यात तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्म एका मध्यमवर्गीय धार्मिक तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील साधे तहसीलदार होते.
    2). सर्वपल्ली राधाकृष्णन यांच बालपण- 
    लहानपणी मुले खेळण्यात रमतात, दंगा करतात, गप्पा मारतात, पण राधाकृष्णन् मात्र याला अपवाद होते. त्यांना मुलांच्यात मिसळायला, खेळायला आवडत नसे. ते एकांतप्रिय व शांतताप्रिय होते. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. पण कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. त्यांच्या बालपणीचा काळ तिरुत्ताणी या गावात गेला. तिरुत्ताणीपासून तिरुपती हे क्षेत्र अगदी जवळ आहे. महाराष्ट्रातील पंढरपूर उडुपी आणि तिरूपती या तीर्थक्षेत्री अनेक भाविक येतात. अशा धार्मिक वातावरणाचा परिणाम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्यावर झाला.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
    सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी येथे झाले. गाव लहान असल्यामुळे राधाकृष्णन् यांना पुढील शिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील शिक्षणासाठी त्यांना तिरुपती येथील ‘लूथरन मिशन हायस्कूल’मध्ये घालण्यात आले.  आठव्या वर्षी  राधाकृष्णन्  मिशन हायस्कूलमध्ये शिकू लागले. या शाळेत ख्रिस्ती धर्माचे आणि त्यातील तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले जाई. बायबलचा अभ्यास करावा लागत असायचा . राधाकृष्णन् यांचे वाचन खूप अफाट होते. आणि खोल अभ्यास होता. त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. दोन्ही धर्मांची तत्त्वे समजून घेतली आणि पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी राधाकृष्णन् मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.राधाकृष्णन् यांनी बी. ए. आणि एम्. ए. या परीक्षांमध्ये सुवर्णपदके मिळविली. कॉलेजमध्ये दाखल झाल्यापासून ते थेट एम. ए. होईपर्यंत सर्व बक्षिसे, पदके व शिष्यवृत्त्या त्यांनी मिळवल्या होत्या.
     सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राजकीय वाटचाल-
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. राधाकृष्णन १३ मे १९५२ – १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती म्हणून काम केले .भारताने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना सन्मानित केले.
    राधाकृष्णन यांनी स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ – १३ मे १९६७) म्हणून काम केले .
    एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, बारीक सडपातळ बांधा, चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, मोठे कपाळ, त्यावर पांढराशुभ्र फेटा, पांढरे पण थोडेसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, पूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्!अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, लेखक, तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते होते .
  •  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
    नाव: सर्वपल्ली राधाकृष्णन
    जन्मतारीख: ५ सप्टेंबर, १८८८
    जन्मस्थळ: ठीरुत्तानी
    मृत्यूची तारीख: १७ एप्रिल, १९७५
    मृत्यूस्थळ: चेन्नई
    शिक्षण: मद्रास क्रिस्चियन कॉलेज (१९०६–१९०८), …
    पुरस्कार: भारतरत्‍न, टेम्पलटन पुरस्कार, …
    १९३९ -१९४८ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि – योजना 

Sarvepalli Radhakrishnan

 

Leave a comment