Dussehra Festival 2023 -: दसरा सणाला का आहे विषेश महत्त्व?

Dussehra Festival 2023 -: दसरा सणाला का आहे विषेश महत्त्व?

विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.

Dussehra Festival 2023 

Dussehra 2023 in India

Dussehra 2023: दसरा सणाला का आहे विषेश महत्त्व 

विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.
याच दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला, त्याच्या निमित्ताने दसरा साजरा केला जातो.

याच दिवशी दरवर्षी रावण आणि कुंभकर्णाच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.म्हणजे श्री राम यांनी रावणाच्या गर्वावर विजय मिळवला तसा विजय. 24 ऑक्टोबर 2023 रोजी हा सण साजरा केला जाणार आहे. दशमी तिथी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 वाजता समाप्त होईल. दसरा सण या वर्षी 24 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचे पूजन आणि रावण दहन करून मोठ्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.

Dussehra Festival 2023-Vijayadashmi 2023

दसरा म्हणजेच विजयादशमी व दशेरा, दसहरा अशी नावे ह्या दिवसाला आहेत.
दसरा म्हणजेच दस + रा = १० तोंडे असलेला रावण असा हा दसरा शब्द तयार झालेला आहे. मराठी भाषेत दसरा असे बोलतात . दशहरा म्हणजेच दहा तोंडाचा रावण हरला असा ह्या शब्दाचा अर्थ होतो.असे म्हणले जाते कि रावणाला १० डोक्याची बुद्दीमत्त होती म्हणजेच तो खूप ज्ञानी होता . त्याला १० प्रकारची शक्ती प्राप्त होती
१ . काम म्हणजे वासना .
२. क्रोध ( राग )
३. मोह
४. भ्रम
५. लोभ
६. मादा म्हणजे अभिमान
७. मातस्य म्हणजे हेवा
८. बुद्धी
९. वाईट चित्त , वाईट इच्छा
१०. आणि अहंकार , गर्व
अशी हि रावणात असलेली १० प्रकारची शक्ती म्हणजेच १० डोकी रावणाला होती .

विजयादशमी वेळ आणि मुहूर्त

2023 दसरा
अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 वाजता समाप्त होईल. 24 ऑक्टोबरला या वर्षी दसरा सण साजरा केला जाणार आहे.

विजयादशमी 2023 पुजेचा शुभ योग
दुपारी 02 वाजून 05 मिनिटे ते 02 वाजून 51 मिनिटांचा मुहूर्त हा शुभ आहे. पुजेसाठी हा 46 मिनिटांचा कालावधी हा देखील अत्यंत शुभ असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन शुभकाळातच शस्त्रपूजा केली जाते. तर 22 ऑक्टोबर रोजी श्रवण नक्षत्राचा प्रारंभ हा संध्याकाळी 06 वाजून 44 मिनिटांनी सुरु होणार आहे. आणि 23 ऑक्टोबर संध्याकाळी 05 वाजून 14 मिनिटांपर्यंत असेल. तसेच यावर्षी दसरा सणाचया दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत.

दसरा 2023 रावण दहनाचा शुभ मुहूर्त
दसऱ्याच्या दिवशी रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते. 24 ऑक्टोबर 2023 ला दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त सूर्यास्तापासून अडीच तासांचा असेल. सूर्यास्तापासून अडीच तासापर्यंत प्रदोष काल मानला जातो. दसऱ्याचा सूर्यास्त संध्याकाळी 05:43 वाजता होईल.

Dussehra puja 2023

दसरा 2023

विजयादशमी आणि दसरा म्हणजे काय

दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत.देवीच्या शक्ती रुपांनी दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. दशहरा, दसरा आणि विजयादशमी या दिवसाला अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला. म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी त्यांचा वनवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी.

Dussehra 2023 in India

दसऱ्याला शस्त्रपूजन केले जाते
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते.दुर्गादेवीची नवरात्रीत नऊ दिवस पूजा केल्यानंतर दसऱ्याचा सण साजरा केला जातो. दुर्गा मातेची पूजा विजयादशमीला केली जाते. माता दुर्गा शक्तीचे प्रतीक आहे. शस्त्रांची स्वच्छता करून पूजा केली जाते. दसऱ्याला धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्यत येते.

विजयादशमीला महिषासुराचा वध झाला
माता दुर्गेने दशमीला महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. म्हणून या दिवशी आपण हा दिवस विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी रावण दहन होते. या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते. याच दिवशी शमीच्या झाडाचीही पूजा केली जाते. या दिवशी वाहने, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ असते.

Dussehra puja 2023

दसऱ्याच्या पुजेचा विधी
दसऱ्याची पूजा ही कायम विजयी या काळामध्ये केली जाते. घरातील ईशान्य दिशेला दसऱ्याची पूजा करा. पुजेच्या ठिकाणी सर्वात आधी गंगेचं पाणी किंवा गोमूत्र शिंपडून पवित्र करावे. देवी अपराजिताची पूजा करावी. त्यानंतर श्रीराम आणि हनुमानाची पूजा करावी. त्यानंतर आरती करुन प्रसादाचा नैवेद्य दाखवाव.. तसेच दसऱ्याच्या मूहुर्तावर काहीतरी खरेदी केली पाहिजे असे पूर्वीपासून प्रथा चालतआली आहे , ज्यात कोणी नवीन गाडी खरेदी करतात , कुणी सोने खरेदी करतात , असे म्हटले जाते कि साडेतीन मुहूर्त पैकी दसऱ्याचा हा एक मुहूर्त असतो ज्यात खरेदी करणे शुभ मानले जाते

हेही पाहा :Durga Puja Festival 2023

Dussehra Festival 2023

Leave a comment