प्रधानमंत्री किसान सम्मान निधि – योजना – 2023

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि-पीएम किसान योजना 2023- PM Kisan Nidhi Yojana 2023

पीएम किसान योजना ही केंद्र सरकारच्या योजनांपैकी एक आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते.
१)प्रधानमंत्री किसान सम्मान निधि अर्ज कसा भरायचा. २) शेतकऱ्यांनी ऑनलाइन ई-केवायसी कसे करावे. ३)पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यासाठी नोंदणी कशी करावी.४) किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायच.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि-

पीएम किसान योजना 2023

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि-किसान सम्मान योजना:

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी ही भारत सरकार कडून केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे. ही योजना १ डिसेंबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत लागू आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी असं वर्षभरात ६००० रुपये एका वर्षामध्ये मिळतात. म्हणजेच चार महिन्यांनी २००० असे वर्षभरात तीन हफ्ते शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात. सुरुवातीला सरकारनं 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

१) प्रधानमंत्री किसान सम्मान निधि अर्ज कसा भरायचा –
प्रधानमंत्री किसान योजना चां फॉर्म pmkisan.gov.in या लिंक वर क्लिक करून भरू शकतो.
-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत अर्ज करण्यासाठी, आपल्याला त्या वेबसाइटवर जावे लागेल जिथून त्याचे पेज उघडेल.
-त्याच्या होम पेजवर तुम्हाला Farmers Corner अंतर्गत New Farmer Registration चा पर्याय दिसेल- त्यानंतर, समोर एक नवीन पेज उघडेल, या पेजमध्ये तुम्हाला Rural Farmer Registration किंवा Urban Farmer Registration निवडा.
-त्यानंतर, खाली आधार क्रमांक टाकून आणि तुमचे राज्य निवडून, तुम्हाला कोड टाकावा लागेल आणि शोध बटण निवडा.
– तुमच्या समोर किसान योजनेचा नोंदणी फॉर्म उघडेल, ज्यामध्ये काही माहिती विचारली जाईल.
-माहिती योग्यरित्या भरल्यानंतर, फॉर्म सेव्ह करा आणि सबमिट बटण निवडा.
अशा प्रकारे तुमचा अर्ज पूर्ण होईल.

PM Kisan Nidhi Yojana 2023-

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि

२) शेतकऱ्यांनी ऑनलाइन ई-केवायसी कसे करावे-
ई-केवायसी करण्यासाठी, तुम्हाला आधार कार्ड आणि रजिस्टर मोबाइल नंबर गरजेचं असते. तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्रातून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. आणि जर मोबाईल असेल तर तुम्ही स्वतःही ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता. मोबाईलवरुन ऑनलाइन ई-केवायसीची प्रक्रिया पुढील प्रमाणे –
-पीएम किसान मोबाईल अॅप तुमच्या मोबाईलमध्ये उघडणे आवश्यक आहे.
– फार्म कॉर्नरमध्ये ई-केवायसीचा पर्याय आहे, तो पहिल्या पेजच्या उजव्या बाजूला लिहिलेला असतो.
-त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा असतो आणि नंतर शोध पर्यायावर क्लिक करावे लागेल.
-त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबर वरचार अंकी OTP येईल.
– त्यानंतर पुढील पेजवर हा OTP टाकावा लागेल. त्यानंतर सबमिट ओटीपीवर क्लिक करा.
अशा प्रकारे पीएम किसान योजनेसाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता कधी येणार?
पीएम किसान योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै दरम्यान, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान जारी केला जातो. 27 जुलै 2023 रोजी या वर्षाचा दुसरा हप्ता आणि पंतप्रधान किसान योजनेचा आजपर्यंतचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. त्यानुसार, पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जारी केला जाऊ शकतो.

३)पीएम किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यासाठी नोंदणी कशी करायची –
पीएस किसान योजनेच्या 15 व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेतलेला नाही ते आपली नोंदणी करू शकतात.  यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, मूळ रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याच्या तपशीलासाठी पासबुकची प्रत आणि रजिस्टर मोबाईल क्रमांक लागेल.

किसान सम्मान निधि योजना यादी Link-

४) किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत तुमचे नाव कसे तपासायचे –
लाभार्थी शेतकरी खाली दिलेल्या प्रक्रियेद्वारे किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत त्यांचे नाव तपासू शकतात-

– पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाइटवर जा.

-स्क्रीनवर वेबसाइटचे होम पेज उघडेल.

-होम पेजवरील ‘फार्मर्स कॉर्नर’ विभागातील ‘लाभार्थी यादी’ वर क्लिक करा.
– तुम्हाला येथे राज्य, जिल्हा आणि इतर माहिती अचूकपणे टाकावी लागेल.
-किसान सन्मान निधी यादी; किसान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी तपासा
-सर्व माहिती भरल्यानंतर ‘गेट रिपोर्ट’ वर क्लिक करा.
-तुमच्या स्क्रीनवर लाभार्थ्यांची यादी उघडेल,

येथे तुम्ही तुमचे नाव पाहू शकाल.Link : 

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि

G20 Summit 2023

Leave a comment