Maharashtra Talathi Bharti – Talathi Bharti 2023

 महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३- Maharashtra Talathi Bharti Syllabus – महाराष्ट्र तलाठी भरती.

महाराष्ट्र तलाठी भरती 23 जून 2023 रोजी, महाराष्ट्र महसूल विभागाने 4664 तलाठी रिक्त पदांसाठी 2023 तलाठी भारती प्रकाशित केली परंतू काही कारणांमुळे संख्या 4657 अशी कमी करण्यात आली. १) महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची पात्रता २) महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेच पॅटर्न ३) Maharashtra Talathi Bharti Syllabus  ४) किती गुणांची परीक्षा असते.

महाराष्ट्र तलाठी भरती 

Talathi Bharti 2023

 

Maharashtra Talathi Bharti

सर्वात प्रथम फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडे सर्व कागदपत्रे पाहिजे.त्यात जातीचा दाखला, पदवी प्रमाणपत्र तसेच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अशी विविध कागदपत्रे आपल्याला आपल्या तालुक्यातील “तहसील कार्यालयातून “तहसीलदार” यांच्या कडून काढावी लागतात.

१) महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेची पात्रता –
तलाठी भरतीसाठी पात्रता ही खूप महत्त्वाची आहे.
– महाराष्ट्र तलाठी भरती वय मर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वय मर्यादा हि १ जानेवारी २०२३ रोजी १८ ते ३८ वर्षांची असावी.
– महाराष्ट्र तलाठी भरती शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी कमीत कमी १० वी श्रेणी पास असावा. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रांच्या माध्यमातून तपासली जाते. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
संगणक विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.जर संगणक विषय जर माहिती नसल्यास ही परीक्षा उत्तीर्ण नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या प्राप्त करणे आवश्यक आहे.
– महाराष्ट्र तलाठी भरती राज्य निवासी –
महाराष्ट्र तलाठी भरती पदासाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचा राज्याचा निवासी होणे आवश्यक आहे. सात वर्ष वयापूर्वी तुमची वास्तव्य महाराष्ट्रात आहे असे दाखवणे.

२) महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेच पॅटर्न –
महाराष्ट्र तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेत 100 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात .
महाराष्ट्र तलाठी भारती परीक्षा 2023 मध्ये मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या 4 विषयांचा समावेश आहे.
– महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम :-
१. मराठी भाषा. Marathi
२. इंग्रजी भाषा. English
३. सामान्य ज्ञान. General Knowledge
४. अंकगणित. Arithmetic / Mathematics
५. सामान्य बुद्धिमत्ता. Reasoning /General intelligence

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Maharashtra Talathi Bharti

३) Maharashtra Talathi Bharti Syllabus –
१. मराठी / Marathi –
समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सर्वनाम, क्रियापद, विशेषण, क्रियाविशेषण, विभक्ती, काळ व काळाचे प्रकार
शब्दांचे प्रकार, नाम, पुस्‍तके आणि लेखक, संधी व संधीचे, प्रकार, म्हणी, शब्दसंग्रह, वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द. इत्यादी
२. इंग्रजी / English –
Vocabulary, Synonyms, Antonyms, Proverbs
Tense & Kinds Of Tense, Question Tag, Use Proper Form Of Verb, Spot The Error, Punctuation, Fill in the blanks in the sentence, Voice, Verbal Comprehension, Passage Etc,,, Spelling, Sentence, Narration
Structure, One Word Substitution, Article
Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions), Phrases.
Maha Talathi Syllabus for General

३. सामान्य ज्ञान / Knowledge –
भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास (History of India Maharashtra and )
पंचायतराज व राज्यघटना (Panchayat Raj and Constitution)
रसायनशास्त्र (Chemistry)
भारतीय संस्कृती (Indian culture)
भौतिकशास्त्र (Physics)
जीवशास्त्र (Biology)

४. अंकगणित / Mathematics –
गणित – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी
चलन, मापनाची परिणामी, घड्याळ.
५. General Intelligence (बुद्धिमत्ता) –
वेगळा शब्द व अंक ओळखणे, अंकमालिका, अक्षर मलिका, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वेन आकृती,वाक्यावरून निष्कर्ष

४) किती गुणांची परीक्षा असते –
मराठी भाषा: – 25 प्रश्न , 50 मार्क्स
इंग्रजी भाषा: – 25 प्रश्न , 50 मार्क्स
सामान्य ज्ञान: – 25 प्रश्न , 50 मार्क्स
बौद्धिक चाचणी: – 25 प्रश्न , 50 मार्क्स
एकूण: – 100 प्रश्न , 200 मार्क्स

महाराष्ट्र तलाठी भारती परिक्षेचा निकाल २०२३- परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र महसूल विभाग तलाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करेल. तलाठी भारती लेखी परीक्षेच्या 2023 च्या तारखा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 आहेत. तलाठी भारती निकाल 2023 लेखी परीक्षेच्या समाप्तीनंतर अधिकार्‍यांकडून अधिकृत वेबसाइट: mahabhumi.gov.in वर उपलब्ध करून दिला जाईल.  Link:

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय बैठक

Leave a comment