Manoj Jarange- Maratha Reservation – मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय बैठक – मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक – Manoj Jarange Patil- उपोषणाचा 14 वा दिवस

Manoj Jarange- Maratha Reservation – मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय बैठक –

मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक – Manoj Jarange Patil- उपोषणाचा 14 वा दिवस            मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरंगे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे जाहीर केले की, निजामाच्या काळात ज्यांच्या वंशाची नोंद आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, मनोज जरंगे पाटील यांनी सरकारचा हा प्रस्ताव मान्य केला नाही. आणि मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरंगे यांनी केली आहे. १) मनोज जरंगे यांनी पाणी आणि उपचार बंद केले आहे.  २) मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ३) जालना जिलह्यातील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक.

Manoj Jarange Patil- उपोषणाचा 14 वा दिवस –

Manoj Jarange Patil- उपोषणाचा 14 वा दिवस

Manoj Jarange- Maratha Reservation –

१) मनोज जरंगे यांनी पाणी आणि उपचार बंद केले आहे –
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणुन मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची मागणी मनोज जरंगे यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे जाहीर केले की,
निजामाच्या काळात ज्यांच्या वंशाची नोंद आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल, मनोज जरंगे पाटील यांनी सरकारचा हा प्रस्ताव मान्य केला नाही. आणि मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी जरंगे यांनी केली आहे. त्यासाठी मनोज जरंगे यांनी सरकारला चार दिवसांची मुदत दिली होती. परंतू मराठा आरक्षण हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने 1 महिन्याची मुदत मागितली आहे. मनोज जरंगे यांच्या उपोषणाचा आज १४ वा दिवस आहे. पण अजूनही सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण मनोज जरंगे यांनी सरकारला चार दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार त्यांनी कालपासून पाणी व उपचार घेणे बंद केले आहे. सरकार 75 वर्षांपासून वेळ मागात आहोत. अजुन किती वेळ देणार असा प्रश्न मनोज जारांगे यांनी केला. आमच्या समाजाच्या आरक्षण देण्यासाठी वेळ लागतो, आणि इतर जातींचे आरक्षण कसे होते, त्यांना का वेळ लागत नाही, असा प्रश्न त्यांनी केला. आता कोणीही कोणतेही कारण न सांगता, आमच्या समाजाला आरक्षण द्यावे, हीच सर्व पक्षांना आपली विनंती असल्याचे जरांगे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय बैठक –

२) मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

मनोज जरंगे-पाटील यांचे उपोषण संपवण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न केले, पण त्यांनी ते मागे घेण्यास नकार दिला, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी पुण्यात सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. हे ऐकून मनोज जरंगे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून आपण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विचार करावा लागतोय. प्रश्न सोडवायचा असेच तर कायद्याच्या चौकटीत टिकलेही पाहिजे. अन्यथा समाज बोलेल की आमची फसवणुक केलीय. त्यामुळे सर्वांनी मिळून यावर काय मार्ग काढता येईल हा प्रयत्न केला जाईल. सगळ्यांनी मिळून सकारात्मक विचार केला तर समाजाचेही भले होईल, असेही ते म्हणाले. आज संध्याकाळी 7.30 वाजता ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे.

मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक –

३) जालना जिलह्यातील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने ठाणे बंदची हाक –

जालना जिलह्यातील झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आज ११ ऑगस्ट २०२३ रोजी ठाणे बंदची हाक पुकारण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे शहरात, रेल्वे स्टेशन परिसर, तीन हात नाका तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शनिवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना देखील मराठा समाजाच्या या रागाचा सामना करावा लागला. मराठा आरक्षणासाठी तुम्ही काय केलं? असा जाब आंदोलनकर्त्यांनी अशोक चव्हाण यांना विचारला. त्यांना घेराव घातला. शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त सायंकाळी ४ वाजता मोर्चातील सहभागी ठाणे महापालिकेसमोर जमणार होते .

हेही पाहा :

1 . Manoj Jarange News- मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच -११व्या दिवशीही उपोषण सुरूच-मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला – मनोज जरांगे, -मराठ्यांनो धीर सोडू नका – मनोज जरांगे https://mahakatta.com/manoj-jarange-news/ Link :

Leave a comment