Sukanya Samriddhi Yojana 2023- सुकन्या समृद्धी योजना

Sukanya Samriddhi Yojana 2023- सुकन्या समृद्धी योजना 

Sukanya Samriddhi Yojana 2023 या योजनेला पंतप्रधान सुकन्या योजना, सुकन्या समृद्धि खाते किंवा Sukanya Wealth Account असेही ओळखले जाते. सुकन्या समृद्धी योजना ही आपण पोस्ट ऑफिस किवा बँकेमध्ये सुरू करू शकतो आणि व्याज दर आपल्याला दोन्ही ठिकाणी सारखाच भेटतो. मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी सर्वात चांगली आणि मोठी बचत योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. 1) सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता. 2) सुकन्या समृद्धी योजना. 3) सुकन्या समृद्धी योजना कागदपत्रे . 4) सुकन्या समृद्धी योजना व्याजदर . 5) सुकन्या समृद्धी योजना PDF

Sukanya Samriddhi Yojana 2023

पंतप्रधान सुकन्या योजना

Sukanya Samriddhi Yojana 2023- पंतप्रधान सुकन्या योजना

सुकन्या समृद्धी योजना ही आपण पोस्ट ऑफिस किवा बँकेमध्ये सुरू करू शकतो आणि व्याज दर आपल्याला दोन्ही ठिकाणी सारखाच भेटतो. मुलींच्या लग्नासाठी आणि शिक्षणासाठी सर्वात चांगली आणि मोठी बचत योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना.

1) सुकन्या समृद्धी योजनेची पात्रता –

ही योजना 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी आहे. तसेच आपल्या दोन मुलींच्या नावे ही आपण हे अकाऊंट उघडू शकता, कायदेशीर पालकही आपल्या मुलीसाठी हे खाते उघडू शकतो. जर जुळ्या मुली असतील तर त्यांच्याही नावे सुकन्या समृद्धी खाते उघण्याची अनुमती आहे. आधी एका परिवारातील फक्त 2 मुलींना सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेता येत होता परंतु आता एकाच परिवारातील 3 मुली सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

सुकन्या समृद्धी योजना

2) सुकन्या समृद्धी योजना –
सुकन्या समृद्धी योजनेचे अकाऊंट 250 रुपये भरून ओपन करू शकतो . आणि त्यात 250 ते 1.5 लाख रुपये वर्षाला जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये फक्त 15 वर्षापर्यंत पैसे भरायचे असतात.नंतर 15 ते 21 वर्षापर्यंत या खात्यात पैसे भरायची गरज नसते. आणि मग नंतर सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यापासून ते मुलीचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जमा रक्कम व्याजासकट मुलीच्या पालकांना दिली जाते.

मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यास, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लक रकमेतून ५०% रक्कम काढता येऊ शकते.सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी २५० रूपये जमा नाही केले तर खाते बंद होते. पण खाते पुन्हा सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी ५० रुपये दंड भरुन खाते पुन्हा सुरू करता येते. काही विशेष परिस्थितींमध्ये, जर खाते धारकाचा मृत्यू झाला तर पालकांना व्याजासाहित जमा रक्कम मिळते.

3) सुकन्या समृद्धी योजना कागदपत्रे :
सुकन्या समृद्धी योजनाच अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ही पालकांची असावीत ते खालीप्रमाणे आहे.
१. मुलीचा जन्म दाखला
३. पॅनकार्ड
४. आधारकार्ड
५. मतदार ओळखपत्र
६. रेशनकार्ड,
७. वीजबिल

sukanya samriddhi interest rate

4) सुकन्या समृद्धी योजना व्याजदर:
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर भारताच्या अर्थव्यवस्थेनुसार कमी-जास्त होत असतो. तिमाही आधारावर भारत सरकार व्याजदर जाहीर होते. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६% एवढा आहे.

5) सुकन्या समृद्धी योजना PDF:
सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यासाठी कोणत्याही बँकेमध्ये व पोस्ट ऑफिसमध्ये खालील फॉर्म उपलब्ध असतात. योजनेची माहिती PDF च्या मार्फत खालीलप्रमाणे आहे. तुम्ही इथून प्रिंट घेऊ शकता.

  Download :Sukanya Samrudhi Yojana

प्रधानमंत्री किसान सम्मान निधि-पीएम किसान योजना 2023

महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप २०२३

Leave a comment