Navratri Day 5 – काय आहे कहाणी स्कंदमाता ची?

Navratri Day 5 – काय आहे कहाणी स्कंदमाता ची… 

नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांचे स्मरण, पूजन, जप, आराधना, उपासना केली जाते. नऊ दिवस नवरात्रीत दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरुपांचे पूजन करणे शुभ लाभदायक तसेच पुण्यफलदायक मानले गेले आहे. आणि म्हणूनच दुर्गा देवीच्या नऊ रुपांमुळे नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी ह्या कालावधी मधे नवरात्र साजरी करण्यात येते.                                                                                                                                                  1) माता ला स्कंदमाता असे का बोलले जाते तर . 2) स्कंदमाता देवीची पूजा विधी. 3) स्कंदमाता देवीचा मंत्र. 4) कथा.

Navratri Day 5 

5th Day Navratri Festival 2023

Navratri Day 5-Skand Mata 

नवरात्रीत प्रत्येक दिवशी दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या रुपांचे स्मरण, पूजन, जप, आराधना, उपासना केली जाते. नऊ दिवस नवरात्रीत दुर्गा देवीचे आणि तिच्या स्वरुपांचे पूजन करणे शुभ लाभदायक तसेच पुण्यफलदायक मानले गेले आहे. आणि म्हणूनच दुर्गा देवीच्या नऊ रुपांमुळे नवदुर्गा असे म्हटले जाते. नवरात्रोत्सव म्हणजे साक्षात शक्तिदेवतेचा उत्सव. शक्‍तीची उपासना मानवाला प्रेरणादायी ठरते. म्हणून अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी ह्या कालावधी मधे नवरात्र साजरी करण्यात येते.

नवरात्रीतील पाचव्या दिवशी गुरूवार 19 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्राची पाचवी माळ असून,स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीची पूजा करण्यासाठी आहे. स्कंदमाता देवीचे पंचोपचार पद्धतीने पूजन करावे, स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत लाभदायी मानले जाते. स्कंदमाता दुर्गा देवीचे प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते.

5th Day Navratri Festival 2023

माता ला स्कंदमाता असे का बोलले जाते तर
भगवान स्कंद लहानपणी या देवीच्या काखेत बसले होते. भगवान स्कंद म्हणजेच ‘कुमार कार्तिकेय’ या नावाने ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. भगवान स्कंद ची आई असल्यामुळे देवी दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते. स्कंदमाता ही चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन हे सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे. स्कंदमाता कमळाच्या आसनावर विराजमान असतात. त्यामुळे त्यांना पद्मासना देवीही म्हटलं जातं

Navratri Festival 2023 : दुर्गेचे पाचवे रूप ‘ स्कंदमाता’ या कशी करणार पूजा? काय आहे कहाणी स्कंदमाता ची… 

स्कंदमाता देवीची पूजा विधी
स्कंदमाता देवीचे व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. घरात सुख, शांतता, समृद्धी नांदते, सकाळी लवकर उठून स्नान करून नंतर स्वच्छ कपडे परिधान करुन देवी स्कंदमाताची पूजा करा. देवीचे पूजन करताना सौभाग्यलंकार अर्पण करावे. सर्वात पहिले देवीला गंगाजल अर्पण करा.

लाल रंगाचे फुल, अक्षता वाहावे, कुंकू अर्पण करा. मग देवीला धूप, दीवा लावा. स्कंदमाताला नैवेद्य म्हणून केळी दाखवा. म्हणून या दिवशी दान पुण्य करण्याचं महत्व असतं. तसेच देवीला केळी चा समावेश असलेला नैवेद्य अर्पण करावा. देवीला पिवळा रंग प्रिय असल्यामुळे नैवेद्यात आणि पूजन करताना पिवळ्या रंगाचा समावेश असलेल्या गोष्टींचा वापर करावा.

स्कंदमाता देवीचा मंत्र
सिंहासना गता नित्यं पद्माश्रि तकरद्वया।
शुभदास्तु सदा देवी स्कन्दमाता यशस्विनी।।
या देवी सर्वभू‍तेषु मां स्कंदमाता रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

देवी स्कंदमाता

देवी स्कंदमाता

कथा
ब्रह्माजींना तारकासूर नावाच्या राक्षसाने घोर तपस्या करुन प्रसन्न केलं आणि अमर होण्याच वरदान मागितल. ब्रह्माजींनी तारकासूरला समजवलं की या जगात सर्वांचा मृत्यू अटळ आहे. ज्याचा जन्म झाला आहे. त्याचा मृत्यू ही अटळ आहे. तेव्हा तारकासूराने ब्रह्माजींना सांगितलं की, भगवान शिवच्या पुत्राच्या हाती मृत्यूचा वरदान मागितला. तारकासुरनी विचार केला की भगवान शिव कधीच विवाह करणार नाही त्यामुळे त्यांचा पुत्र मला कधीही मारु शकत नाही. तारकासूर लोकांवर अत्याचार करु लागला.

हा अत्याचार पाहून देवतांनी भगवान शिवची प्रार्थना केली की ते तारकासूरापासून त्यांची मुक्ती व्हावी. त्यानंतर भगवान शिवने देवी पार्वतीशी लग्न केलं. त्यानंतर त्यांचा पुत्र कार्तिकेय यांनी पुढे जाऊन तारकासूराचा वध केला. स्कंदमाता ही कार्तियकेयची आई होती.

हेही पाहा: Navratri festival 2023 

Navratri Day 

Leave a comment