Dahihandi 2023-श्रीकृष्ण जन्माष्टमी -गोकुळाष्टमी- उत्सव का साजरा करतो

श्रीकृष्ण जन्माष्टमी -गोकुळाष्टमी- Dahihandi 2023 – Dahihandi Date 2023- दहीहंडी मराठी माहिती 

श्रीकृष्ण हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्मदिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात सर्व साजरा केला जातो. दहीहंडी ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. यावर्षी दहीहंडी 7 ऑगस्ट 2023 रोजी आहे. १)श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांचे बालपण २) दहीहंडी कधी साजरी केली जाते. ३) दहीहंडी उत्सव का साजरा करतो.   ४) दहीहंडी उत्सव कुठे कुठे साजरा होतो.

श्रीकृष्ण जन्माष्टमी -गोकुळाष्टमी-

Shreekrishna Janmashtmi

श्रीकृष्ण जन्माष्टमी -गोकुळाष्टमी-Sreeskrishna Janmashtmi –

१)श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांचे बालपण-

भगवान श्रीकृष्ण हे हिंदूंचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्मदिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात सर्व साजरा केला जातो.

श्रीकृष्ण यांचा जन्म 18 ऑगस्ट 3228 रोजी मथूरेत कारागृहात झाला. यांच्या जन्माची वेळ मध्यरात्री 12:00 वाजता आहे. म्हणून हा सण दोन दिवसांचा मानला जातो. यावेळी श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते. ज्या बायका असतात त्या पाळणा गातात आणि पाळणा हलवतात. त्यांचे बालपण गोकुळात गेले.

द्वापरयुगामध्ये पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले होते. तेव्हा पृथ्वी मातेने गाईचे रूप धारण केले आणि ती ब्रह्म आणि विष्णूकडे गेली. आणि पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय आत्याचारा विषयी ती सांगते.तेव्हा ब्रम्हा विष्णुना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे. तेव्हा विष्णू ब्रह्मदेवाला सांगतात पृथ्वीचा उदधार करण्यासाठी आणि राक्षसापासून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईल. आणि त्यानंतर श्रीकृष्ण यांचा जन्म झाला.

श्रीकृष्णाचा जन्माचा दिवस म्हणून आपण जन्माष्टमी साजरी करतो. या सणाला गोकुळअष्टमी असे म्हणतात.भगवान श्रीकृष्ण हे माता देवकी व पिता वासुदेव यांचे आठवे पुत्र होते.

भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर विष्णूचा 8 वा आवतार म्हणून जन्म घेतला. भारतात जन्माष्टमी हा दिवस मोठ्या आनंदात आणि उत्सवात साजरी केली जाते. त्यांच्या बाललीलाना आजही लहान-मोठे मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने ऐकतात आणि अनुभवतात. हा सण श्रावण महिन्यामध्ये साजरा करतात. देशभरात श्रीकृष्ण मंदिरात भाविक दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. फुले, तोरणे, हारांनी मंदिरे सजवली जातात.

जन्माष्टीमीच्या निमित्त लोक उपवास करतात.यादिवशी लोक रात्रभर जागरण करतात. सर्वत्र श्रीकृष्णाचे भजन व कीर्तन केले जाते. लोक दिवसभर उपवास करतात. श्रीकृष्णाची सर्व मंदिरे आकर्षक फुलांनी व दिव्यांनी सजवली जातातत. भक्तांसाठी महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते. पालखीतून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन वाजत गाजत मिरवणुका काढल्या जातात. ढोल ताशांच्या आवाजाने सगळे वातावरण अगदी आनंदाने फुलून जाते.

Dahihandi Date 2023

२) दहीहंडी कधी साजरी केली जाते-

दहीहंडी ही श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्यादिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजीत केला जातो. हा सण श्रीकृष्णाच्या खेळकर करमणुकीचे स्मरण करून साजरा केला जातो यावर्षी दहीहंडी 7 ऑगस्ट 2023 रोजी आहे. चौकाचौकात ठीक ठिकाणी दहीहंडी बांधल्या गोपाळांची म्हणजेच गोविंदांची पथके मानवी मनोरे उभारून दहीहंडी फोडली जातात.

“गोविंदा आला रे आला” हे गाणं बोलत बालगोपाल गोविंद ढोल, लेझीमच्या गजरात, गुलाल उधळत दहीहंडी फोडतात. उत्सवासाठी गोपाळकाला तयार केला जातो. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ दूध,दही,लोणी हे सर्व एकत्र कालविणे म्हणजेच “काला”.

जेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी गाई चारण्यासाठी जात असे त्यावेळी त्यांच्या आणि त्यांच्या सवंगड्यांच्या शिदोरी एकत्र करून काला केला आणि सर्वांनी मिळून खाल्ला. यामुळे गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी काला करण्याची आणि हांडी फोडण्याची प्रथा पडली. लोक मोठ्या आनंदात आणि उत्साहात यामध्ये सहभागी होतात.दहीहंडी उत्सव भारतातील महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणारा एक प्रमुख हिंदू सण आहे.

हा सण श्रावण मासातील अष्टमी ते दशमी ह्या दोन दिवसात साजरा केला जातो. हा सण तृप्तीचा, आनंदाचा, उत्सवाचा आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जातो.

३) दहीहंडी उत्सव का साजरा करतो-

लहानपणी श्रीकृष्ण हे खूप खोडकर होते.त्यांना लोणी खूप आवडत असे. म्हणून वृंदावनातील घरातून ते आणि त्यांचे मित्र लोणी चोरत असे आणि मित्रांबरोबर खात असे. ते लोणी चोरत असल्यामुळे वृंदावनातील बायकांना लोणी ची भांडी उंच ठिकाणी ठेवावे लागत असे. म्हणून घरातच लोणी ची भांडी टांगलेली असायची. पण तरी कृष्ण आणि त्यांचे मित्र लोणी चोरत असे. उंच टांगलेल्या लोणीच्या हांडीपर्यंत पोहोचण्यासाठी ते व त्यांचे मित्र गोल उभे राहून एक त्यावर चढून मडक्यातील लोणी चोरत असे आणि अशा प्रकारे दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली

४) दहीहंडी उत्सव कुठे कुठे साजरा होतो:

हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. पण सर्वात जास्त महाराष्ट्रात आणि गुजरात मध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा ढोल ताशे डीजे नृत्य आणि गाण्याच्या तालावर साजरा केला जातो. तसेच मुंबईमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि जिंकणाऱ्या मंडळाला आकर्षिक बक्षिसे दिले जाते.

सर्वपल्ली राधाकृष्णन 

श्रीकृष्ण जन्माष्टमी -गोकुळाष्टमी

 

Leave a comment