सुभेदार फिल्म -सुभेदार तानाजीराव मालुसरे – सुभेदार गड आला पण सिंह गेला… – सुभेदार फिल्म कलाकार -Subhedar.

Subhedar- सुभेदार तानाजीराव मालुसरे – सुभेदार गड आला पण सिंह गेला… -सुभेदार फिल्म कलाकार- सुभेदार फिल्म-

फर्जंद, फतेशिकस्त, पावनखिंड आणि शेर शिवराज या चार यशस्वी शिव पुष्पा नंतर दिगपाल लांजेकर घेऊन आले सुभेदार… गड आला पण सिंह गेला….
१) तानाजीराव मालुसरे यांची व्यक्तिरेखा. २) सुभेदार चित्रपटामध्ये भूमिका साकारलेले कलाकार यांची नावं
३) सुभेदार चित्रपटामध्ये काय दाखवले आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत.

सुभेदार फिल्म –

सुभेदार गड आला पण सिंह गेला...

सुभेदार तानाजीराव मालुसरे –

१) सुभेदार तानाजीराव मालुसरे –
हा चित्रपट २५ ऑगस्ट 2023 ला सिनेमा थेटर मध्ये आला आहे. शिवराज अष्टकातील पाचवा चित्र पुष्पक म्हणजे सुभेदार…!! तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमी आयुष्याला हा चित्रपट समर्पित केला आहे. शिवरायांचा लहानपणी सवंगडी ते त्यांचा विश्वासू सुभेदार असा तानाजी राव मालुसरे यांचा प्रवास आपल्या सर्वांना माहीतच आहे. पण त्याही पलीकडे एक माणूस म्हणून, योद्धा म्हणून, एक पती म्हणून, आणि एक बाप म्हणून ते कसे होते ते या चित्रपटांमध्ये बघायला भेटेल. हा चित्रपट दिग्गपाल लांजेकर यांनी प्रदर्शित केला आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास पडद्यासमोर जिवंत करण्याचे काम सुभेदार या सिनेमातून करण्यात आला आहे. त्यामुळे सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या ज्वलंत इतिहासाचा साक्षी होण्याचे भाग्य राज्यातील जनतेला प्राप्त होणार आहे. या चित्रपटांमध्ये भाषेवर जास्त जोर दिले आहे. या चित्रपटांमध्ये मावळी भाषेचा वापर केला आहे. सुभेदार फिल्म ची घोषणा 2022 मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी जून 2023 मध्ये रिलीज होणार अशी केली होती . परंतु काही कारणांमुळे तारीख पुढे ढकलली गेली. तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अजय पुरकरचे पहिला लूक पोस्टर, दिग्पाल लांजेकर यांनी ३० जून २०२३ रोजी समोर आनला होता. हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत प्रदर्शित करण्यात आला. परंतु तांत्रिक समस्यांमुळे तो चित्रपटगृहांमध्ये त्याच्या मूळ चित्रपटात प्रदर्शित झाला. रिलीझ झाल्यानंतर चाहत्यांकडून सकारात्मक पुनरावलोकने प्राप्त झाली.

सुभेदार फिल्म कलाकार- 

२) सुभेदार चित्रपटामध्ये भूमिका साकारलेले कलाकार यांची नावं-
या चित्रपटांमध्ये समीर धर्माधिकारी,अजय पुरकर, अभिजीत श्वेतचंद, स्मिता शेवाळे, शिवानी रागोळे, उमा सर देशमुख, अर्णव पेंढारकर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी यांनी भूमिका साकारली आहे. हे कलाकार कोण कोणाच्या भूमिकेत आहे. अभिनेते अजय पुरकर सुभेदार या आगामी चित्रपटात सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या भूमिकेत पाहायला मिळणारे, तानाजीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाईची भूमिका अभिनेत्री स्मिता शेवाळे यांनी साकारली आहे. सावलीप्रमाणे थोरल्या भावाची पाठराखण करणाऱ्या सूर्याजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिजीत श्वेतचंद यांच्या पत्नीची म्हणजे यशोदाबाईंची भूमिका शिवानी रागोळे यांनी साकारली आहे. तर मालुसरे कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या शेलार मामाच्या भूमिकेत समीर धर्माधिकारी आहेत. तानाजीराव यांच्या आईच्या म्हणजेच पार्वती बाईंच्या भूमिकेत उमा सर देशमुख तर मुलगा रायबाची भूमिका अर्णव पेंढारकर यांनी केली आहे. तसेच छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर आणि जिजाऊ यांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी, सोयराबाईच्या भूमिकेत नुपूर दैठणकर, बहिर्जी नाईकच्या भूमिकेत दिग्पाल लांजेकर, मोरोपंतांच्या भूमिकेत श्रीकांत प्रभाकर, बाजी सर्जेराव जेधे यांच्या भूमिकेत बिपीन सुर्वे, जीवाच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी,येसाजी कंकच्या भूमिकेत भूषण शिवतारे, वीर बाजी यशवंतराव पासलकर यांच्या भूमिकेत सुनील जाधव, अलका कुबलच्या भूमिकेत जना गाराधीनच्या, केशरच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडे, नवलजीच्या भूमिकेत पूर्णानंद वाधेकर, संभाजी जेधेच्या भूमिकेत अनिकेत बांदल, विश्वास म्हणून अस्ताद काळे, कुबाद खानच्या भूमिकेत ऋषी सक्सेना, अचल सिंगच्या भूमिकेत ज्ञानेश वाडेकर, सरदार शिळीमकरच्या भूमिकेत निखिल जोगदंड असे आपल्याला या चित्रपटात भूमिका साकारताना बघायला मिळणार आहे.

Subhedar...

३) सुभेदार चित्रपटामध्ये काय दाखवले आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत.
या चित्रपटामध्ये आपल्याला वर सांगितल्याप्रमाणे शिवरायांचा लहानपणीचा सवंगडी ते त्यांचा विश्वासू सुभेदार तसेच एक योद्धा, पती, बाप आणि माणूस म्हणून कसा आहे तसेच मामा भाच्याचं नातं काय असतं आणि मामा कसा ढाल घेऊन उभा राहिला आहे हे आपल्याला या चित्रपटांमध्ये बघायला मिळते. हा मूवी बनवताना त्यांना तानाजीराव मालुसरे यांचं गाव , तिथली लोक आणि त्यांचे वंशज यांची खूप मदत झाली. मावळी भाषा कशी बोलायची ही पण माहिती त्यांना त्यांच्याकडूनच मिळाले तसेच आपल्या संस्कृतीमध्ये लग्न ही गोष्ट किती महत्त्वाची असते त्याचे संस्कार असतात ते सर्व या चित्रपटांमध्ये अगदी जसेच्या तसे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटांमध्ये कोंढाणा किल्ला मुघलांच्या हातून सोडवायचा होता पण त्याच दरम्यान तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाच्या लग्नाची गडबड होती. तानाजीला वाटले शिवरायांनी आणि मासाहेबांनी लग्नाला यावं पण शिवराय म्हणाले ‘शेलार मामा,तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या’ आम्ही स्वतः लग्नाला येऊ शकणार नाही कारण आम्ही स्वतः जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. तेव्हा तानाजीराव मालुसरे शिवरायांना बोलले की “राज, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं!” आणि ते कोंढाण्याच्या कामगिरीवर गेले आणि त्यांनी कोंढाणा जिंकला, पण तो धारातिर्थी पडला. तेव्हा शिवराय तानाजीला उद्देशून बोलले की “गड आला पण सिंह गेला” आणि म्हणूनच कोंढाण्याचं नाव ठेवले “सिंहगड”. 2023 चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनून जगभरात ₹11.38 कोटींहून अधिक कमाई केली .

Leave a comment