Radhakrishnan- Sarvapalli Radhakrishnan- Dr. Sarvapalli Radhakrishnan-Teacher’s Day – सर्वपल्ली राधाकृष्णन

Radhakrishnan- Sarvapalli Radhakrishnan- Dr. Sarvapalli Radhakrishnan-Teacher’s Day – सर्वपल्ली राधाकृष्णन

नमस्कार,

राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस म्हणजे शिक्षकदिन साजरा करतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि द्वितीय राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आदर्श शिक्षक आणि विचारवंत होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे सन 1954 मध्ये त्यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी 5 सप्टेंबर ला शिक्षक दिवस साजरा केला जातो. पण त्यांच्याविषयी काय माहिती करून घेणार आहोत ते पुढील प्रमाणे  १) सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म : सुरुवातीचे जीवन 2). सर्वपल्ली राधाकृष्णन यांच बालपण  3). सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण   4). सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राजकीय वाटचाल 5). डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन थोडक्यात माहिती खालील प्रमाणे.

Dr. Sarvapalli Radhakrishnan

  • Sarvapalli Radhakrishnan
  • Sarvapalli Radhakrishnan-सुरुवातीचे जीवन

  • १) सर्वपल्ली राधाकृष्णन जन्म : –
    राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन् यांचा वाढदिवस म्हणजे शिक्षकदिन साजरा करतो
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी चित्तोर जिल्ह्यातील तिरुत्तनी या ठिकाणी झाला.
    भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडू राज्यात चित्तूर राधाकृष्णन यांचा जन्म झाला, तिरुत्ताणी या छोट्याशा गावात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा एका मध्यमवर्गीय धार्मिक तेलगू कुटुंबात झाला. त्यांचे वडील साधे तहसीलदार होते.
    2). सर्वपल्ली राधाकृष्णन यांच बालपण- 
    लहानपणी मुले खेळण्यात रमतात, मुलांच्यात मिसळतात, दंगा करतात, गप्पा मारतात, भांडतात,पण राधाकृष्णन् मात्र याला अपवाद होते. त्यांना मुलांच्यात मिसळायला, खेळायला आवडत नसे. ते एकांतप्रिय व शांतताप्रिय होते. घरची आर्थिक स्थिती बेताचीच बेताची होती. पण कुटुंबातील धार्मिक वातावरणामुळे त्यांच्यावर चांगले धार्मिक संस्कार झाले. राधाकृष्णन् यांच्या आयुष्याचा बालपणीचा काळ तिरुत्ताणी या गावात गेला. तिरुत्ताणीपासून अगदी जवळ तिरुपती हे पुण्यक्षेत्र आहे. महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र पंढरपूर उडुपी आणि तिरूपती या तीर्थक्षेत्री अनेक भाविक येतात. अशा धार्मिक वातावरणाचा परिणाम राधाकृष्णन् यांच्यावर झाला. त्यामुळेच त्यांच्या मनात ईश्वर व धर्म यांच्याविषयी कुतूहल निर्माण झाल.
  • डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
    सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण

    राधाकृष्णन् यांचे प्राथमिक शिक्षण तिरुत्ताणी येथे झाले. गाव लहान असल्यामुळे पुढील शिक्षणाची सोय नव्हती; म्हणून पुढील शिक्षणासाठी त्यांना तिरुपती येथील ‘लूथरन मिशन हायस्कूल’मध्ये घालण्यात आले. त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी ते मिशन हायस्कूलमध्ये शिकू लागले. तेव्हा त्या शाळेत ख्रिस्ती धर्माचे आणि त्यातील तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले जाई. बायबलचा अभ्यास करावा लागे. राधाकृष्णन् यांचे वाचन खूप अफाट होते. आणि खोल अभ्यास होता. त्यांनी हिंदू धर्माचा अभ्यास केला. दोन्ही धर्मांची तत्त्वे समजून घेतली; पुढे वयाच्या पंधराव्या वर्षी राधाकृष्णन् मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले.राधाकृष्णन् यांनी बी. ए. आणि एम्. ए. या परीक्षांमध्ये सुवर्णपदके मिळविली. इतकेच नाही तर कॉलेजमध्ये दाखल झाल्यापासून ते थेट एम. ए. होईपर्यंत सर्व बक्षिसे, पदके व शिष्यवृत्त्या त्यांनी मिळविल्या.
    ३) डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थ्यांचे आवडतं शिक्षक
    अधिक अभ्यास करा, उत्तम गुण मिळवा आणि मग अभिमानाने छाती पुढे काढून सांगा, की मला प्रवेश द्या. वशिला लावणे मला आवडत नाही. तेव्हा असा प्रयत्न व्यर्थ ठरेल’, असे रोखठोकपणे सांगत.विद्यार्थ्यांवर कधीच अन्याय होऊ दिला नाही. कोणाचीही कोणतीही तक्रार ऐकून घेऊन योग्य असल्यास ती दूर करण्याचा प्रयत्नच केला.

     सर्वपल्ली राधाकृष्णन यांची राजकीय वाटचाल-
    डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ते १३ मे १९५२ – १२ मे १९६२ पर्यंत उपराष्ट्रपती राहिले. भारताने १९५४ साली त्यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविले.
    तसेच ते स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती (१३ मे १९६२ – १३ मे १९६७) होते.
    एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ५फूट ११ इंच उंची, बारीक सडपातळ बांधा, गंभीर तेजस्वी चेहरा, चमकणारे तेजस्वी तपकिरी रंगाचे डोळे, मोठे कपाळ, त्यावर पांढराशुभ्र फेटा, पांढरे पण थोडेसे आखूड नेसलेले धोतर, त्यावर रेशमी कोट, पूर्ण जगभरात विख्यात असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन्!अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्व, सुविख्यात भारतीय तत्त्वज्ञ, भारताचे दुसरे राष्ट्रपती, साधी राहणी उच्च विचारसरणी, अष्टपैलू जीवनाचे दर्शन घडविणारे एक आदर्श शिक्षक, लेखक, तत्त्वज्ञानी, उत्तम वक्ते, स्त्री व पुरुष ही समाजरथाची दोन चाके आहेत. म्हणूनच स्त्री व पुरुष यांच्यात समानता असली पाहिजे, असे त्यांचे मत होते. याचसाठी स्त्रियांना समाजात योग्य तो मान मिळाला पाहिजे, असे त्यांचे मत होते.
    तत्वज्ञान म्हणजे तत्त्वज्ञानाच्या पायावर उभी असलेली भव्य अशी इमारत असा त्यांच मत होते.

  •  डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन थोडक्यात माहिती खालील प्रमाणे
    नाव: सर्वपल्ली राधाकृष्णन
    जन्मतारीख: ५ सप्टेंबर, १८८८
    जन्मस्थळ: ठीरुत्तानी
    मृत्यूची तारीख: १७ एप्रिल, १९७५
    मृत्यूस्थळ: चेन्नई
    शिक्षण: मद्रास क्रिस्चियन कॉलेज (१९०६–१९०८), …
    पुरस्कार: भारतरत्‍न, टेम्पलटन पुरस्कार, …
    १९३९ -१९४८ पर्यंत ते बनारस हिंदू विद्यापीठाचे चौथे कुलगुरू होते.

    सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा…!

Leave a comment