Nipah virus – Nipah Virus Symptoms – Nipah Virus In Kerala – Nipah Virus Tretment – What is Nipah Virus

Nipah virus – Nipah Virus Symptoms – Nipah Virus In Kerala – Nipah Virus Tretment – What is Nipah Virus   :

निपाह विषाणू हा RNA विषाणू आहे. या व्हायरसचा प्रसार कसा होतो, हा सर्वप्रथम कुठं आढळला? त्याची लागण कशी होते आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी, याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. 2021 मधे करोना विषाणूनं महाराष्ट्रात थैमान घातलं आणि आता निपाह विषाणू. हा विषाणू सर्वप्रथम महाबळेश्वरमधील गुहेतील दोन वटवाघुळांमध्ये याची लक्षण आढळून आली. वाटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत.

1) निपाह विषाणूची लक्षणे.  2) निपाह विषाणूचा प्रसार कसा होतो. 3) निपाह विषाणूवर कोणते उपचार. 4) भारतात आधी पण आलेला निपाह विषाणू .

Nipah Virus Symptoms

Nipah Virus Symptoms

Nipah virus

2021 मधे करोना विषाणूनं महाराष्ट्रात थैमान घातलं आणि आता निपाह विषाणू. हा सर्वप्रथम महाबळेश्वरमधील गुहेतील दोन वटवाघुळांमध्ये  याची लक्षण आढळून आली. वाटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत.

1) निपाह विषाणूची लक्षणे –
या आजाराची लक्षणे डोकेदुखी, ताप, अंगदुखी, छातीत जळजळणे, श्वास घेण्यास त्रास होणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत.

2) निपाह विषाणूचा प्रसार कसा होतो –
सर्वप्रथम वटवाघुळांमध्ये याची लक्षण आढळून आली.वटवाघूळ याच्या मार्फत हा आजार होतो आहे. म्हणून वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाह विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. निपाहचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. NIV संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या संपर्कातून ही हा संसर्ग होऊ शकतो, त्यामुळं मानवाला ह्या विषाणूंचा संसर्ग डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते.

Nipah Virus Tretment

3) निपाह विषाणूवर कोणते उपचार –

‘स्वाइन फ्लू’सारखा निपाह’ विषाणूचा संसर्ग वेगाने होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. या विषाणूमुळं होणाऱ्या संसर्गावर अजून उपचार नाहीत. या आजारावर औषधे व लस उपलब्ध नसल्यानं संसर्गामुळं होणारा मृत्यूदर जास्त आहे. हा व्हायरस थेट मेंदू आणि मज्जासंस्थेवरच हल्ला करीत आहे. या आजाराने संक्रमित रुग्ण कोमात जाऊ शकतात. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ते १४ दिवस असतो.
आणि रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येतात.

Nipah Virus In Kerala

4) भारतात आधी पण आलेला निपाह विषाणू –
२००१मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्मिम बंगाल येथे निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यामध्ये ४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. २००७ मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगाल मधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. 2018 नंतर ही चौथी वेळ आहे जेव्हा केरळात निपा व्हायरस पसरला आहे. केरळात 2018 मध्ये प्रथम हा आजार पसरला होता. तेव्हा 23 संक्रमित 23 लोकांपैकी 21 जणांचा मृत्यू झाला होता. साल 2019 आणि 2021 मध्ये पुन्हा निपा व्हायरसच्या केस आढळल्या होत्या. केरळात निपा व्हायरस पसरली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात निपा विषाणू संसर्गाने 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

निपा व्हायरसचा ( Nipah Virus ) वेरिएंट सर्वात खतरनाक आहे. आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की हा व्हायरस मानवाद्वारे मानवात पसरत असतो. याच्या पसरण्याचा वेग जरी कमी असला तरी हा सर्वात खतरनाक आजार आहे. गेल्या ऑगस्टमध्येही एकाचा केरळात या आजाराने मृत्यू झाला होता. हा आजार वटवाघळे आणि डुकरातून माणसात पसरला असल्याचे म्हटले जात आहे

Nipah virus

What is Nipah Virus

निपाह विषाणू हा RNA “विषाणू” आहे. हा प्रथमतः १९९८ आणि १९९९ मध्ये मलेशियन आणि सिंगापूर मधील डुकरांना आणि एन्सेफेलिटिक रोगांमध्ये गंभीर श्वसन रोगाला बळी पडलेल्या मनुष्यांनंतर प्रथम झोनोटिक रोगकारक म्हणून ओळखला गेला. झोनोटिक हा रोगप्रकार प्राणी व मनुष्य या दोघांमध्येही आढळून येतो. झोनोटिक हा शब्द झोनोसिस या शब्दाशी संबंधित आहे. झोनोसिस म्हणजे माणसांना प्राण्यांपासून होणारे रोग. हा रोग मुळतः प्राण्यांमध्ये असून ज्याची लागण माणसांना देखील होऊ शकते. निपाह विषाणू फळांच्या वटवाघुळात मुख्यत्वे आढळतो. ‘फळांचे वटवाघुळ’ म्हणजेच असे वटवाघुळ जे फळे खातात. त्यांनाच फळांचे वटवाघुळ असे म्हणतात.

निपाह विषाणू हा हेंद्राच्या विषाणूशी संबंधित आहे व हे दोन्ही विषाणू हेनिपाव्हायरसचे सदस्य म्हणून ओळखले जातात. निपाह विषाणू हा वटवाघुळाची विष्ठा, लघवी आणि लाळ इ. आढळून येतो. हा विषाणू मनुष्य ते मनुष्य देखील पसरू शकतो. लोक किंवा प्राणी यांच्यासाठी कोणताही उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मानवाचे प्राथमिक उपचार हे काळजी घेणे हे आहेत.  लोकांमध्ये निपाह संसर्ग कमी करण्याचा किंवा रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जागरूकता पसरवणे. हे सार्वजनिक शिक्षणाद्वारे हि केलं जाऊ शकतं जसं की लोकांना खाण्यापूर्वी फळं पूर्णपणे धुण्यास सांगणे आणि संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानंतर खबरदारीचं पालन करणं.

परंतु, एका वटवाघळाला विषाणूची लागण झाली तर दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ तयार होतात. त्यामुळं एका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही.त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो असे नाही.

हेही पाहा :

Green Moong Benifits – Moong Dal Protein-मुगाचे फायदे – भिजवलेल्या मुगामध्ये कोणती जीवनसत्वे असतात https://mahakatta.com/green-moong-benifits-moong-dal-protein/ Link :

Leave a comment