Manoj Jarange News- मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच -११व्या दिवशीही उपोषण सुरूच-मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला – मनोज जरांगे, -मराठ्यांनो धीर सोडू नका – मनोज जरांगे

Manoj Jarange News- मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच -११व्या दिवशीही उपोषण सुरूच- मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला – मनोज जरांगे, -मराठ्यांनो धीर सोडू नका – मनोज जरांगे

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर आता याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात गेल्या ११ दिवसापांसून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरु आहे. 1)मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला. 2) मराठ्यांनो धीर सोडू नका – मनोज जरांगे 3) शांततेत आंदोलन करण्याच आव्हाहन

११व्या दिवशीही उपोषण सुरूच –

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच

मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या, त्यात त्यांनी जुन्या निजामकालीन कुणबी प्रमाणपत्रांची कागदपत्रे ज्यांच्याकडे असतील त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आणि तसेच निजाम काळातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एका समितीची घोषणा केली. ही समिती निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलीय. त्यानंतर राज्य सरकारकडून याबाबतचा तसा जीआर मनोज जरांगे यांच्या मागणीनुसार काढण्यात आला होता.

1) मराठ्यांना सरसकट कुणबीचा दाखला – मनोज जरांगे
पण मनोज जरांगे यांचं अस म्हणण होत की, ज्यांच्याकडे कुणबी वंशावळीचे जुने कागदपत्रे नाहीत त्यांनाही सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. पण या जीआरमध्ये ज्यांकडे कुणबी वंशावळीचे कागदपत्रे आहेत, फक्त त्यांनाच कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी असं प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि राज्य सरकारने हा जीआर मनोज जरांगे यांना पाठवत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच शिवसेना नेते अर्जुन खोतकर जीआर निघाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटे गावात गेले होते आणि त्यांनी स्वतः हा जी आर वाचून दाखवाला होता. पण मनोज जरांगे यांनी त्यात बदल करून घ्यायला सांगितले परंतु शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मुंबईत बैठकीसाठी यावे असा प्रस्ताव दिला होता. परंतु मनोज जरांगे यांनी आपण उपोषण सोडून जाऊ शकत नाही असं सांगितलं अन् त्यांच्या जागी त्यांचे शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं सांगितलं.
विशेष म्हणजे शिवसेना नेते अर्जुन खोतकर जीआर निघाल्यानंतर मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी अंतरवली सराटे गावात गेले. त्यांनी सरकारचा जीआर वाचून दाखवला. पण मनोज जरांगे यांनी दुरुस्ती सुचवली. यावेळी अर्जुन खोतकर यांनी दुरुस्ती सुचविण्यासाठी मुंबईत बैठकीसाठी यावं लागेल, असा प्रस्ताव दिला. त्यावर मनोज जरांगे यांनी आपण शिष्टमंडळ पाठवणार असल्याचं सांगितलं. पण आपण स्वत: या शिष्टमंडळात नसणार. आपण आंदोलनस्थळी उपोषण कायम ठेवू, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.सरसकट मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, या मागणीसाठी हे शिष्टमंडळ सरकारची भेट घेणार आहे.यामध्ये मराठा अभ्यासक, आंदोलक आणि शेतकऱ्यांचा समावेश असेल.

Manoj Jarange News-

2) मराठ्यांनो धीर सोडू नका – मनोज जरांगे
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याच समोर आलं आहे. यावरमनोज जरांगे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी हे आरक्षण लागतं, त्या मुलांनी, विद्यार्थ्यांनी, मराठी समाजाच्या तरुणांनी, बांधवांनी कोणी टोकाचं पाऊल उचलू नये. त्याचं कारण आम्ही तुम्हाला न्याय देण्यासाठी जीवाची बाजी लावतोय. तुम्ही असं केलं तरं, आरक्षण कोणाला द्यायच?” आम्ही आंदोलन करत असताना तुम्ही उग्र आंदोलन करण्याचा अट्टहास करू नका. मराठा आरक्षणासाठी माझ्यावर विश्वास ठेवा. कारण विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होता कामा नये. विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल झाल्याने शिक्षणाला अडचण येईल, “तुम्ही शिक्षण घेणार, भविष्य घडणार आहे. म्हणून आम्ही हा लढा लढतोय. प्रत्येक मराठी विद्यार्थ्याने मिळालेल्या आरक्षणाचा फायदा उचलला पाहिजे. टोकाचा निर्णय जर घेतला तर आरक्षणाचा फायदा कोण उचलणार?”.आम्ही आंदोलन करत असताना, अशा प्रकारे आंदोलन करण्याची गरज नाही. ही माझी मराठा समाजाला विनंती आहे. मराठा समाजाने शांततेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं. ही माझी महाराष्ट्रातील मराठा समाजाला कळकळची विनंती आहे.चार दिवसाची त्यांना मुदत दिली होती, उद्या शेवटचा दिवस आहे. निरोप न आल्यास सलाईन बंद करू, म्हणजे आरोग्य सेवा घेणे बंद करणार” असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

3)शांततेत आंदोलन करण्याच आव्हाहन –
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील ५३ गावात एकदिवसीय उपोषणाला सुरवात करण्यात आली.
या आंदोलनात समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले असून आंदोलकांनी राज्यसरकारच्या विरोथात प्रतिकार करण्यासाठी अंत्ययात्रा काढली.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा म्हणून तात्काळ विधानसभा अधिवेशन बोलविण्यात यावे या मागणीसाठी ८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ५३ गावात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसाच उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नुसार आज सकाळी आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय, मंदीर, सार्वजनिक ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने तालुक्यातील शाळेत सुट्टी असल्याचे स्पश्ट्ट दिसून येत आहे. एकाच वेळी ५३ गावात आंदोलन केले जाणार असल्याने परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाचा कस लागणार आहे. .

Leave a comment