India vs Pakistan Today Match – Pakistan vs India – #India Asia cup 2023- Asia cup 2023 IND vs Pakistan – प्रेमदासा स्टेडियम 

India vs Pakistan Today Match – Pakistan vs India – #India Asia cup 2023- Asia cup 2023 IND vs Pakistan- प्रेमदासा स्टेडियम

आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होता.श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुपारी 3 वाजता सुरु झाला. कोलंबो येथील स्टेडियमवर हा सामना होत असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यामुळे कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पाकिस्तानने सुपर 4 मधील एक सामना जिंकून 2 पॉईंट्स मिळवले आहेत. तर भारत सुपर 4 मधील हा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत खेळणार आहे. १) भारत आणि पाकिस्तान चे खेळाडू  २) भारताची फलंदाजी  ३) पावसामुळे सामना थांबला

Asia cup 2023 IND vs Pakistan- 

Pakistan vs India

India vs Pakistan Today Match –

कोलंबो येथील स्टेडियमवर हा सामना होत असून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने टॉस जिंकला. टॉस जिंकल्यामुळे कर्णधार बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पाकिस्तानने सुपर 4 मधील एक सामना जिंकून 2 पॉईंट्स मिळवले आहेत. तर भारत सुपर 4 मधील हा पहिलाच सामना पाकिस्तान सोबत खेळणार आहे
१) भारत आणि पाकिस्तान चे खेळाडू
भारत:  रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, के.एल. राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या )(उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तानः  बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ.

२) भारताची फलंदाजी –
रोहित शर्माने प्लेइंग-११ मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराहचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर श्रेयस अय्यरच्या जागी के.एल. राहुलचा समावेश करण्यात आला आहे. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिलची चांगलीच फलंदाजी पाहायला मिळाले होते. रोहित आणि शुबमन यांनी पहिल्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. शुबमनने शाहीनच्या दोन षटकांत प्रत्येकी तीन चौकार मारले होते. त्याने कर्णधार रोहितला बाद केले. रोहित शर्मा ने आणि शुबमनने एकदिवसीय असे आपले ५०वे अर्धशतक पूर्ण केले. शादाब खानच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी त्याने नेपाळविरुद्ध नाबाद ७४ धावा केल्या होत्या. सध्या रोहित ४६ चेंडूत ५५ धावा आणि शुभमन गिल ४४ चेंडूत ५३ धावा करत फलंदाजी करत आहे. १७व्या षटकात शादाब खानने कर्णधार रोहित शर्माला कॅच घेऊन बाद केले. त्याने ४९ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली. शाहीन आफ्रिदीने त्याला सलमानकडे झेलबाद केले. शुबमन ५२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या आणि शाहीन आफ्रिदीने शुबमन गिलला बाद केले . त्यानंतर कोहली आणि राहुल हे मैदानात उतरले. विराट कोहली १५ चेंडूत ७ धावा आणि के. एल.राहुल २७ चेंडूत १७ धावा करत फलंदाजी करत आहे.

#India Asia cup 2023-

Pakistan vs India
३) पावसामुळे सामना थांबला –
मुसळधार पावसामुळे सामना थांबवला गेलाय. सामना थांबला तेव्हा टीम इंडियाचे २४.१ षटकात २ प्लेअर गमावून १४७ रण केल्या होत्या. विराट कोहली १६ चेंडूत ८ रन आणि के.एल. राहुल २८ चेंडूत १७ रन करत फलंदाजी करत आहे. तिसर्‍या विकेटसाठी दोघांमध्ये आतापर्यंत ३८ चेंडूत २४ धावांची भागीदारी झाली आहे. या सामन्यासाठी उद्याचा दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरही सामना सुरू झाला नाही, तर भारतीय संघ २४.१ षटकांपासूनच फलंदाजीला सुरुवात करेल. आणि जर हा सामना झाला नाही तर भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. कारण पाकिस्तान संघाने सुपर-४ फेरीत बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. म्हणजेच पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध विजय मिळवला तर संघाचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल. आणि टीम इंडियाला १२ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध आणि १५ सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. तेव्हा टीम इंडियाने हा सामना गमावल्यास अंतिम फेरी गाठण्यासाठी पुढील दोन सामने जिंकावे लागतील. भारत आणि पाकिस्तान यांच्यात  १३३ एक दिवसीय सामने खेळले गेले आहेत.  पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत, तर भारतीय संघाने ५५ सामने जिंकले आहेत. पाच सामने अनिर्णित राहिले. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. एक सामना रद्द झाला, तर एक पाकिस्तानने जिंकला.

 

हेही पाहा :

  1. Cricket Asia Cup 2023: India vs Nepal Cricket Match  Link :

Leave a comment