Ayushman Bharat Yojana – Ayushman Card – आयुष्यमान भारत योजना – पंतप्रधान जन-आरोग्य योजना – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना

Ayushman Bharat Yojana – Ayushman Card – आयुष्यमान भारत योजना – पंतप्रधान जन-आरोग्य योजना – राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना     :

देशातील प्रत्येक लाभार्थ्यांच्य चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारने एक योजना आणली आहे. . मोदी सरकारने पंतप्रधान जन-आरोग्य योजना म्हणजे राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात केली आहे. ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. १) आयुष्यमान भारत योजनेची पात्रता काय आहे. २) आयुष्यमान भारत योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची – ३) आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा –  ४) आयुष्यमान भारत योजनेतंर्गत मिळतात या सुविधा

आयुष्यमान भारत योजना

आयुष्यमान भारत योजना

पंतप्रधान जन-आरोग्य योजना

ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेतंर्गत देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत किरकोळ उपचारापासून शस्त्रक्रियेचा लाभ घेता येतो. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गातील लाखो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करता येईल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना

१) आयुष्यमान भारत योजनेची पात्रता काय आहे. –
आयुष्यमान भारत योजनेचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गातील लाखो लोक घेत आहेत. या योजनेचा लाभ आदिवासी , बेघर, निराधार, बेघर, भिकारी, मजूर यांच्यासह अनेक वर्गाला घेता येईल.
आयुष्मान भारत योजनामध्ये ग्रामीण भागात सामील होण्यासाठी खालील पात्रता ठरवण्यात आली आहे –
ग्रामीण भागात पक्के घर नसलेले, कुटूंब प्रमुख महिला असणे, कुटूंबात वयस्क (१६-५९ वर्ष) नसणे, अनुसूचित जाती , जमातीमधील व्यक्ती, बेघर व्यक्ति, निराधार, भीक मागणारे, आदिवासी लोक असे कोणतीही प्रक्रिया न करता आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 आयुष्मान भारत योजनामध्ये शहरी भागात सामील होण्यासाठी लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे –
भिकारी, कचरा वेचणारे, घरकाम करणारे, छोटे दुकानदार, शिवणकाम करणारे, फेरी वाले, रस्त्यावर काम करणारे, कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणारे मजूर, प्लंबर, मिस्त्री, पेंटर, वेल्डर, सुरक्षा रक्षक, हमाल व सामान वाहून नेणारे अन्य कामगार. सफाई कर्मचारी, मोल मजूरी करणारे, हँडीक्राफ्टचे काम करणारे, टेलर, ड्रायव्हर, रिक्षा चालक, दुकानात काम करणारे लोक आदि आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र ठरवण्यात आले आहेत.

या योजनेसाठी आपण पात्र आहे की नाही, याची माहिती PMJAY च्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर Am I Eligible यावर क्लिक करा. या पेजवर मोबाईल क्रमांक आणि राशन कार्ड क्रमांक टाका. त्याआधारे काही मिनिटांतच तुम्ही योजनेसाठी पात्र आहेत की नाही, हे समोर येईल.

२) आयुष्यमान भारत योजनेसाठी लागणारे कागदपत्रांची –
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) इनकम सर्टिफिकेट
४) मोबाइल क्रमांक
५)पासपोर्ट साईज फोटो

Ayushman Card

३) आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज कसा करायचा –
आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी सर्वात अगोदर PMJAY या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
– नवीन नाव नोंदणीसाठी ‘New Registration’ वा ‘Apply’ यावर क्लिक करा.
– तुमचे नाव, लिंग, आधार क्रमांक, रेशन कार्ड इत्यादी माहिती नोंदवा.
– सर्व कागदपत्रे अपलोड करा.
– पूर्ण अर्ज एकदा तपासा आणि सबमिट करा.
– आयुष्यमान भारत योजनेत कार्ड तयार होईल.

Ayushman Bharat Yojana

४) आयुष्यमान भारत योजनेतंर्गत मिळतात या सुविधा

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना देशात सरकारी आणि खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत इलाज करता येईल. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील 15 दिवसांपर्यंत सरकार त्यांचा खर्च करणार. या योजनेत सर्व कुटुंबातील सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळतो. आयुष्यमान योजना ही कॅशलेस योजना आहे. उपचारासाठी एक रुपया पण द्यावा लागणार नाही. योजनेच्या पॅनलमध्ये सामील प्रत्येक रुग्णालयात एक आयुष्मान मित्र असेल. तो रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची हरसंभव मदत करेल व त्याला रुग्णालयातील सुविधा पुरविण्यासाठी सर्वतोपरि मदत करेल. रुग्णालयात एक हेल्प डेस्क सुद्धा असेल जेथे कागदपत्र तपासणी, योजनेत नामांकनासाठी व्हेरिफिकेशन यासाठी मदत केली जाईल.आयुष्मान भारत योजनेत जवळपास सर्व आजारांवर उपचार व रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर केला जातो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) १३५४ पॅकेज सामील केले आहेत. यामध्ये कोरोनरी बायपास, गुडघे बदलणे व स्टंट लावण्यासारखे उपचारही सामील आहेत.

आयुष्मान भारत योजनेत (एबीवाय) उपचाराचा खर्च केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेहून १५-२० टक्के कमी आहे.
सामाजिक-आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी) २०११ नुसार ग्रामीण भागातील ८.०३ कोटी कुटूंब आणि शहरी भागातील २.३३ कोटी कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येतील. सध्या आयुष्मान भारत योजनेत ६२,६६७ कूटूंब पात्र आहेत. अशा प्रकारे पीएम जय योजनेच्या कक्षेत ५० कोटी लोक येतील.

आयुष्यमान भारत योजनेत अर्ज करण्यासाठी PMJAY या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.  Link:

  1. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि-पीएम किसान योजना 2023-PM Kisan Nidhi Yojana 2023-किसान सम्मान योजना -किसान सम्मान निधि योजना यादी –  https://mahakatta.com/pm-kisan-samman-nidhi-yojana-2023/ Link :
  2. Sukanya Samriddhi Yojana 2023- सुकन्या समृद्धी योजना – पंतप्रधान सुकन्या योजना- sukanya samriddhi interest rate https://mahakatta.com/sukanya-samriddhi-yojana-2023/ link :

Leave a comment