Kuldeep

माझी माहीती थोडक्यात,

सद्गुरु दत्त महाराजांच्या कृपेने वयाच्या २४ व्या वर्षात उपरती झाली. अक्कलकोटीय दत्तस्वरुपाच्या दर्शनाने गुरु प्राप्तीची तीव्र उत्कंठा लागली. बर्याच कठीण परिस्थितीतुन जावे लागले. जीवनाचा शेवटच भर तारुण्यात आल्या सारखे वाटु लागले. जीवनाचा अंत जवळ आला असे वाटतच होते, ईतक्यात सद्गुरु शंकरनाथ साटम महाराजांकडुन सन २००८ साली महाशिवरात्रीच्या दोन दिवस आधी माणगाव दत्त मंदिर, तालुका कुडाळ येथे बोलावणं आलं. माणगाव, दत्त मंदीरातील थोरले स्वामीं महाराजांचे दर्शन घेऊन, भक्त निवासात महाप्रसादानंतर आराम करण्याहेतुने गेलो. दुपारी थोरले स्वामीं महाराजांकडुन नेत्र दीक्षा मिळाली. ते नाम मिळाले ज्याचा जीवनात आपण कधीच विचारही केला नव्हता.

नाम मिळले तेही तेथे स्थान बद्ध असलेल्या एका दैवताच्या समोरच...! त्यायोगे नामसाधनेतुन बरेच अनुभव, साक्षात दर्शनेही घडली. महाराजांनी योग शास्त्रांचे गहन असे आत्म ज्ञानही करवून दिले, सोबत अद्वैत कर्माचा सिद्धांत अकर्माद्वारे कसा करावा हे सुद्धा समजवले. भर तारुण्यात साक्षात थोरले स्वामीँ महाराजांच्या चरण कमलांच्या कृपेने मला जनसेवेची संधी मिळाली. हीच संधी आणि सद्गुरु महाराजांनी करवुन दिलेले आत्मज्ञान दत्त महाराजांच्या शिवआत्मसंधानासाठी जनहीतात कशाप्रकारे आचरणात आणता येईल, याच हेतुने जनसामान्यांच्या भक्तीमार्गातील विघ्ने दुर व्हावीत यासाठीच संस्थेचे प्रयोजन अमलात आणले आहे.

आज बराचसा साधक समुदाय, आपल्या आध्यात्मिक दत्त तत्वाच्या माध्यमातून आत्मनिर्भर, डोळस, तठस्थ, विचारवादी, स्वयंभु व स्वामी आत्मसन्मानी होत आहे. याबद्दल महाराजांच्या चरणी कृतज्ञतेने माझे आत्मसमर्पण करत आहे. सर्व दत्तभक्तांचे आत्मचिंतन सद्गुरु कृपे उत्तरोत्तर वाढत जावो.

ll अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll

Blog

फोटो अल्बम

Advertisement

Share:

Newsfeed