कट्ट्याबद्दल माहिती .

प्रेम

 

गाईचे वासरावरती असते ते प्रेम………

चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम………

आईचे मुलांवर असते ते प्रेम………

नवरा- बायकोचे एकमेकांवर असते ते प्रेम………

अन् प्रियकराचे प्रेयसीवर व प्रेयसीचे प्रियकरावर असते ते सुद्धा प्रेमच……..

प्रेमाचे प्रकार तसे अनेकच,

पण त्याच्या मागील भावना मात्र एकच…..

आजच्या जीवनात खरे प्रेम तसे क्वचितच मिळते…

खरे प्रेम असावे तरी कसे!!!!!

तर….

खरे प्रेम असावे…..

कमळासारखे, जे पाण्याची साथ कधीच सोडत नाही,

त्याच्याशिवाय ते कधीच उगवत नाही….

खरे प्रेम असावे…..

गुलाबासारखे, जे कोमल आणि सुगंधी जरी असले,

तरी काटयाची साथ कधीच सोडत नाही….

खरे प्रेम असावे…..

आकाशासारखे विशाल व विस्तीर्ण..

कुठेही गेले तरी न संपणारे,

सदैव आपल्या बरोबर असणारे…..

खरे प्रेम असावे…..

पैशाने विकत न घेता येण्यासारखे,

वेळ आलीच तर पैशालाही झुकवण्यासारखे……

कारण…..

प्रेम हा काही खेळ नाही,

टाइम-पास करण्याचा तो वेळ नाही……..

Share:

सभासद

Newsfeed

 • shankar Ekewar joined group
  प्रेम
    गाईचे वासरावरती असते ते प्रेम……… चिमणीचे पिल्लांवरती असते ते प्रेम……… आईचे मुलांवर असते ते प्रेम……… नवरा- बायकोचे एकमेकांवर असते त...
 • प्रियांका posted a forum topic
  प्रेम
  कधी कुणी विचार करून प्रेम करतो का आणि केलंच तर त्याला प्रेम म्हणतात का
   चर्चा करा  प्रतिक्रिया : 2 
  Jan 25 '13
  4
  4 members like this

कट्ट्याची भिंत

You need to sign in to comment
Apr 19 '14
खुप गैरसमज घेतलास तु करुन,
अजुन पण घेतल नाही तु मला समजुन,
तु केले होते प्रेम माझ्यावर म्हणुन,
मी घेतले तुला आपलेसे करुन तु माझ्या मनाचा तरी केला होता का?
एका क्षणात का होईना तु म्हटलेले ते शब्द या मनाला टोचले,
एवढे प्रेम करुनही नकार दिलास,
पुन्हा पुन्हा विसरलीस...
जरी विसरली मला पण विसरणार नाही कधी मी तुला,
कारण तुझ्यामुळे छंद कवितेचा जडलाय मला...
खुप गैरसमज घेतलास तु करुन,
अजुन पण घेतल नाही तु मला समजुन,
तु केले होते प्रेम माझ्यावर म्हणुन,
मी घेतले तुला आपलेसे करुन तु माझ्या मनाचा तरी केला होता का?
एका क्षणात का होई...See more
Apr 19 '14
कधी तुझा विचार हि नव्हता तुझा या मनात
आली समोर त्या एका क्षणात
हे सत्य आहे की भास
हो हे सत्य आहे हा तुझा सहवास
अंधारलेल्या या जिवनात तु आलीस प्रकाशासारखी
जणु जिवनाची ती नवी पहाटच सुरु झाली
आज या मनी फक्त तुच होती
अशी अत्तरासारखी जिवनात तु आली
अन् सुगंध म्हणुन या मनात दरवळतच राहिली..
तु परत येशिल अशी आजपर्यंत मी वाटच पाहिली....
कधी तुझा विचार हि नव्हता तुझा या मनात
आली समोर त्या एका क्षणात
हे सत्य आहे की भास
हो हे सत्य आहे हा तुझा सहवास
अंधारलेल्या या जिवनात तु आलीस प्रकाशासारखी
जणु जि...See more
Mar 12 '14
एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत,
भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत,
झाडां मागे लपणारी .
एक प्रेयसी पाहिजे,
मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात,
अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे,
कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र,
अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला,
हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे,
प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या,
तन्मयतेने साथ देणारी
im watting.....
एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत,
भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
फुलपाखरांमागे धावणारी;
फुलां...See more
Mar 12 '14
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत


सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही
एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हत...See more
Mar 1 '14

जोकर ………………. जिंदगीच्या तमाश्यातला .................................................. कधी भिजलेल्या वाटा ……. पावसाची … रिमझिम ……………… कधी …… उन्हाळी पायवाट ……आयुष्याची …… ठोकर …… - जिंदगीचा …… हा …रंगीत …तमाश्या …। मी … एक … वाट हरवलेला …जोकर …. .................................................. …………………………… रंग उधळून ………………… आयुष्याच्या चिंध्या …. उधळुन …. ……………………………. मी …… तुझ्या येण्याची वाट …पाहत …. राहिलो ………………….................................................. टाळ्यांच्या …………. गर्दीत ……… तु ……………………. कुठेच ………………. न्हवतीस ……………… फक्त ………………………. जोकर … गोरख शंकर गुराळे ……………. पुणे ………….

जोकर ………………. जिंदगीच्या तमाश्यातला .................................................. कधी भिजलेल्या वाटा ……. पावसाची … रिमझिम ……………… कधी …… उन्हाळी पायवाट ……आयुष्याची …… ठोकर …… - जिंदगीचा …… ...See more
Oct 24 '13
खरं प्रेम एकदा तरी करा....

आपलं हे आपलपण
जीवापाड जपायचं
शब्द कशाला
मुक्याने बोलायचं.....

नको कृत्रिम धागे
श्वासांनी एकमेंकाना
बांधायचं
रंग कशाला
एकमेकात रंगायचं.....

झालेत मतभेद तर
नजरेनं भांडायचं
सर्व काही विसरुन
नजरेनं विनवायचं.....

आपलं जग खुप सुंदर
आणि निराळं असलं
तरी ते कुणाला सांगुन
नाही पटायचं
मात्र ते समजण्यासाठी
जीवनात प्रत्येकाने
एकदा तरी खरं
प्रेम करायचं.....
खरं प्रेम एकदा तरी करा....

आपलं हे आपलपण
जीवापाड जपायचं
शब्द कशाला
मुक्याने बोलायचं.....

नको कृत्रिम धागे
श्वासांनी एकमेंकाना
बांधायचं<...See more
Oct 5 '13
आठवण काढू नको म्हणालास
तरी ते शक्य आहे का?

तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....???

तुझ्या इतक समजून घेणारा मला
दुसरा कोणी मिळेल का..???

आणि जरी मिळाला
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी त्याच्या मध्ये शोधू शकेल का....??

तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसर्या मध्ये नाही सापडणार

कारण .., तू तो आहेस ज्याच्यासाठी मी जगतेय
आणि तू म्हणतोस आठवण काढू नकोस......
तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?
आठवण काढू नको म्हणालास
तरी ते शक्य आहे का?

तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....???

तुझ्या इतक समजून घेणारा मला
दुसरा कोणी मिळ...See more
Sep 20 '13

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत


सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची

तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात

काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली

होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळ...See more
Sep 20 '13
मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती

तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती

तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती

तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.

नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.

तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती

तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती

आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.

मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती
मी तिच्यात नव्हतो

मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती

मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती<...See more
Sep 20 '13
एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत,
भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत,
झाडां मागे लपणारी .
एक प्रेयसी पाहिजे,
मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात,
अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे,
कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र,
अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला,
हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे,
प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या,
तन्मयतेने साथ देणारी.
एक प्रेयसी पाहिजे

एक प्रेयसी पाहिजे,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत,
भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
फुलपाखरांमागे धावणारी;
फुलां...See more
पान : 1 2 3 »

Forum

मुद्दा शेवटचे मत
प्रेम शेवटचे मत यांच्या कडून तेजू Feb 6 '13