kavita | Forum

Anamik Aug 7 '15
किती चक्र जिवना हे फिरतील 
रोज नवे प्रश्न हे किती पडतील 
कीती दिशा तुझ्या माझी दशा ही
की रोज नवी उत्तरे किती मिळतील

स्वप्न कधीचं हरलित इथे पळताना 
मनात होती संवरली जी बालपनी
त्यांचा होउनी प्रत्यक्ष चेंडूच इथे 
तुडवली गेली किती पांउलां पाउली

नात्यांची काय अवस्था दिधली
मनं सोडून ही पैशात रुजली
प्रेमाचे पडती रोज किती मुडदे 
इथे ह्रदये आज तिजोरीत वसली

आस्थांचे तर दुकानेच सजली
आणि मालकच यांचे होती बलात्कारी 
सांग कसा शोधु कुठे भेटू तुला मी
जिथे रंग आज तुझी ओळख बनली

आठवतच नाही रे कधी खेळलो मुलांत
हसतात कधी ते रुसतात केव्हा 
किती पळु जिवना भिती तुझी
कोन ओढेल कधी पाय जेव्हा

पण मिच थांबवले आता चक्र माझे
आणी जाणले 
मातीलाही गंध येतो पहिल्या पावसात 
माझ्या मुलीला येऊ लागलेत बोभडे दात
कणिस गोड लागतो जेव्हा भिजतो पावसात 
भेटवस्तू पेक्षा ही मौल्यवान असतो
आईवडीलांचा आशीर्वाद व 
पत्नीचा प्रेमाने धरलेला हात
आणी देवही दिसतो निष्पाप मुलांच्या हसण्यात
गरिबांच्यांच कष्टात, व मानलेल्या समाधानात

अनामिक
Share:
Prashant Wagh May 16 '16
nice lines