Marathi blogs मराठी ब्लॉग्स

नमस्कार मी अमोल निकम, रेल्वे च्या असंख्य चाहते वेड्यांसारखा एक.....

आत्ता च्या व्हाट्सअँप च्या युगात आम्हा रेल्वेमित्राचा अश्याच एका ग्रुप रेल्वेट्रीप चा बेत ठरत असतो त्यात बऱ्याच वेळेस बेत बनतो आणि काही हौशीकलाकार मंडळी तो बेत बुडवतात हि.... असो


अश्यातच एक दिवशी बातमी आली भारतीय रेल्वेच्या  दक्षिण पूर्व मध्य विभागाच्या नागपूर मंडळाच्या नॅरोव गेज (छोट्या लाईन) चा गेज परिवर्तन होणार असून तिचे रूपांतर ब्रॉड गेज (मोठ्या लाईन) मध्य होणार असल्याने  नॅरोव गेज (छोट्या लाईन) परिवहन स्थागित करण्यात येणार...

ग्रुप मधील मंडळींनी ती बातमी धडकली

काही उत्साही मित्रांनी जाण्यासाठी बेत ठरवत होते नकळत त्यांच्या होकारात मी पण होकार दिला....


खूप विचार मंथन झाल्यावर आम्हा ४ मित्रांचे (मी , माझा बदलापुरातील रेल्वेमित्र अंशुल विपट, पुण्याचा मित्र हिमांशू शर्मा  आणि सर्वात खट्याळ मित्र सुरत चा पंकज मिश्रा) २५/०९/२०१५ रोजी मुंबई वरून निघायची तारीख  ठरली मध्य रेल्वे च्या किंग म्हणून संबोधल्या जाणाऱ्या १२२८९ मुंबई नागपूर दुरोन्तो ने नागपूर पर्यंत जाण्याचा आणि त्या गाडी चा थरार घेण्याचे ठरले .  आणि उर्वरीत दोन मित्र नागपूरकर चेतन पुराणिक आणि बुऱ्हानपूर चा शिवम राय आम्हास नागपूर येतुन पुढील प्रवासासाठी साथ देणार होते


ठरलेल्या  बेतासाठी   भारतीय रेल्वेच्या  दक्षिण पूर्व मध्य विभागाच्या नागपूर मंडळाची परवानगी घेण्यात आली.प्रवासाचा दिवस उजाडला हिमांशू आणि पंकज साठी त्यादिवशी झटपट आवरून मुंबईला येणाऱ्या गाडीने येणार होते आणि मी आणि अंशुल निवांत वेळ असल्याने सायंकाळी निघायचे ठरवले पण पंकज आणि हिमांशू ४ वाजताच मला कल्याण ला बोलावून घेतले तेथून आम्ही सी.एस. टी.  गाठायचे ठरवले ,सी.एस. टी.  ला पोहचताच आम्हास सीऑफसाठी आलेले पौरव शाह यांची भेट झाली


आम्ही सी.एस.टी. च्या उपाहारगृहात सायंकाळ चा नाश्ता करतच होतो तेव्हड्यात अंशुल ने हि आम्हची कंपनी जॉईन केली..

वेळसरत  होती आम्ही फलाट क्रमांक १८ वर लागणाऱ्या आमच्या प्रवासाच्या गाडी च्या दिशेने निघालो वेळ होती ७.१५ ची.

गाडी फलाटावर लागली नव्हती आम्ही रेलप्रेमी १७ क्रमांकाच्या फलाटावर उभ्या असलेल्या पंजाब मेल कडे कुतूहलाने पाहत होतो. तेव्हड्यात पोलिसाताफ्यातील गाड्या एकामागोमाग एक स्थानकाच्या वि.आय.पी. प्रवेशद्वार जवळ आल्या काही कळण्याच्या आताच समजले कॅबिनेट मंत्री उमा भारती भोपाळ ला पंजाब मेल ने जात आहेत...  


७.५० ला आम्हची गाडी फलाट क्रमांक १८ वर स्थिरावली आली पुढील नागपूर चा प्रवासाचा  आस्वाद आपण चलचित्र पाहून घेऊ शकतात


                       INDIAN RAILWAYS Journey Compilation Onboard 12289 Nagpur Duronto
सकाळी बरोबर ०७.१५ आम्ही नागपूर च्या अजनी स्थानकावर थांबलो आणि नागपूर निकास साठी तयार झालो

नियोजित वेळेला म्हणजेच ०७.२५ ला गाडी ने नागपूर फलाट क्रमांका ८ वर  प्रवेश केला आणि आपला क्लास नागपूर दुरोन्तो ने पुन्हा एकदा सिद्ध केला..


काही वेळेत आम्हास शिवम राय  ने जॉईन केले आणि आम्ही नागपूर च्या प्रवाशी विश्रंती आणि आंघोळीसाठी प्रस्थान केले....  पुढील प्रवास होता तो जीच्यासाठी हा सर्व बेत होता त्या नॅरोव गेज (छोट्या लाईन) चा पहिल्या टप्प्यात नागपूर ते छिंदवाडा मार्गे नैनपूर चा होता त्याची नॅरोव गेज (छोट्या लाईन)ची ट्रेन ची नियोजित वेळ दुपारची १२.४५  58839 Nagpur-Chhindwara-Nainpur-NG Fast Passenger ची होती...


०९.३० विश्रंती गृहातून बाहेर पडलो आणि पुरेसा वेळ असल्याने बाहेर सकाळच्या नाष्ट्या साठी व पुढील प्रवासासाठी काही आवश्यक वस्तूंसाठी व नागपुरात पहिल्यांदा गेले असल्याने स्टेशन परिसर फिरलोय व ११.३० सुमारास आम्ही पुन्हा स्टेशन वर आलोत

अजून खूप अवधी असल्यामुळे आम्ही भारतीय रेल्वेच्या इंजिनियरिंग चा अदभूत अविष्कार असलेल्या उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिमेस जोडणारा  "डायमंड क्रॉसिंग" बघण्याचा उत्तम योगायोग आम्ही जुळवला
नेमकी त्याच वेळेस तेथून जाणारी कविगुरु एक्सप्रेस चे टिपलेले चलचित्र 

               12949 Porbandar - Santragachi Kavi Guru SF Express At Nagpur Diamond Crossing


अजून हि वेळ बाकी होता आणि चेतन भाऊ यायचे बाकी होते..

वरील उल्लेखाप्रमाणे सर्वात खट्याळ मित्र सुरत चा पंकज मिश्रा ह्याने चेतन भाऊ याना नागपूरची प्रसिद्ध संत्रावडी आणायला लावली...

नकळत त्याचा फायदा आम्हाला हि होताच...


आत्ता ज्याच्या साठी साठी हा बेत आखला होता त्याचा पहिल्या टप्प्यासाठी आम्ही खूप उत्साहात होतो... बरोबर १२ वाजता 58839 Nagpur-Chhindwara-Nainpur-NG Fast Passenger फलाटावर आली आणि आम्हची तिचे छायाचित्र काढण्यासाठी ओढ चालू झाली चला तर म आपण ह्या प्रवासाची चित्रफीत पाहू....... 

                                World's Biggest Narrow Gauge Network : Journey Compilationह्या प्रवासा दरम्यान मला खूप दुर्मिळ असे नॅरोव गेज (छोट्या लाईन) विरुद्ध ब्रॉड गेज (मोठ्या लाईन) सेवेच्या शर्यती टिपण्याचा योग्य मिळाला चला तर आपण ह्या ची पण चित्रफीत पाहू......


Extremely Rare : Indian Railway`s Broad Gauge vs Narrow Gauge - who wins???आमही नियोजित बालाघाट येथे सकाळी ७ वाजता पोहचलो आणि पुढील छोट्या लाईन चा प्रवास मी आपणस पुढील भागात अनुभवेल तुर्तास्त राजा घेतो 

आपल्या प्रतिक्रिया नक्की करावा 


धन्यवाद...!

mi maratha aarkshan aani atrpcity yavar pustak lihit aahe jankarani mala sahkarya karave.


Ganesh Nov 17 '16
"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@सनिल पांगे
प्रयत्नांच्या दोन पायरीं मधलं 
अंतर तसं नाही फार
म्हणटलं तर चढण आहे
म्हणटलं तर उतार
@ सनिल पांगे
"विश्वास" ह्या शब्दा मध्येच
श्वासाचा उल्लेख ठळक आहे
नि "श्वास" म्हणटला की 
जिवंत असल्याची ओळख आहे 
@ सनिल पांगे
पान : « 1 2 3 4 5 ... » »»