Marathi blogs मराठी ब्लॉग्सत्या दिवशी तू एकदम वेगळीच होती 

डोळ्यात ती भावना , कधीच विसरणार नाही अशी 

ते प्रेम , जणू पृथ्वीवरचे सारे तुझ्यामध्येच एकवटलेले 

निरोप घ्यायचा होता तेव्हा , पण सात समुद्र डोळ्यात साठलेले 

मन एकदम क्षीण झाले , दीन झाले 

पालटून त्याने साथ सोडली या कुशाग्र मेंदूची 

ब्रम्हचर्य लोपुनी, कायावाचामनी फक्त तुझा जाहलो 

सत्य असत्य काम क्रोध लोभ मोह मद मत्सर 

सर्व अंगिकारले , हळूहळू बाणले या देही 

आज आता जरी कुणी विचारले 

तू कधी देव पाहिला आहेस का , वेड्या ? 

मी निक्षून सांगेन त्याला आणि प्रत्येकाला 

खऱ्या प्रेमातच तो बैसला 

प्रेमातच दडलं सारं काही 


सिद्धेश्वर विलास पाटणकर कुठे तरी, काही तरी नित्य हवं असतं 

रोज शोध नित्यनेमाने त्याचा 

दिवस सुरु तयाने , रात्री शोध उद्याचा 

कधी तरी थांबशील तुही त्या श्वासांबरोबर 

तरी ओढ कायम त्या चढाओढीची 

दुसऱ्याच्या सुखांबरोबर 

पदरात काय आपुल्या ते पाहावे जरासे 

काय गरज त्या शोधाची 

कशाला हवे ते आरसे ? 

जरा बघावे अवतीभवती 

वाटून घ्यावं दुःखही 

ढाळावे किमान दोन अश्रू 

दुसऱ्याच्या अनोळखी दुखाप्रती 

स्वतहा शोध तू तुलाच मानवा 

सापडेल परमेश्वर उभा अंतरी 

कितीही कर भ्रमण तू अवकाशी 

पावशील स्वतःला तू दूर कुठेतरी 

पड बाहेर त्या चौकटीतून 

ती चौकटच करेल नाश 

घेता येईल तेव्हढे सामावून घे दुःख दुसऱ्याचे 

देत जा नवा प्रकाश 

विज्ञाने दिल्या सुविधा 

किंमतही तूच ठरवी 

त्याच्यासाठी आयुष्य नसते 

वेच लोकांसाठी , हीच त्याची थोरवी सिद्धेश्वर विलास पाटणकरसिंव्हाने मारायचं 

तरसाने पळवायचं 

मेहनत करायची दुसऱ्यानेच 

भलत्यानेच फळ खायचं 

सांग देवा तूच आता 

असं कसं नि किती जगायचं 

कोंबडीने अंड दिलं तरी 

मालकंच त्यावर ताव मारी 

येता पाहुणे घरी 

कोंबडीच कापून स्वागत करी 

अंडपण द्यायचं आणि वेळेसरशी मरायचं 

सांग देवा तूच आता , कोंबडीने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? 

युगेयुगे चालू असाच तुझा गाडा 

मरणारे मरतायंत पोटाला खड्डे पडून 

जिवंतपणीच आपणसुद्धा असंच बघून मरायचं 

हात नाय उचलायचं कि काय नाय बोलायचं 

सांग देवा तूच आता , समद्या जगाने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? सिद्धेश्वर विलास पाटणकरमाधुरी मला नेहेमी चोरून बघायची 

ऐश्वर्या तर मी बाहेर पडताच 

माझ्या मागेच लागायची 

कसाबसा मी घरातून निघायचो 

तोंड लपवत लपवत कॉलेजात जायचो 

कधी एकदा सुटतेय कॉलेज 

असं नेहेमी वाटायचं 

कठीण असत रे मित्रा , असा चेहरा घेऊन बाहेर पडायचं 

नेहेमी भीती वाटायची 

कंटाळलो होतो देऊन देऊन नकार 

त्या आपल्या माझ्या मागे मागे 

घेऊन फिरायच्या कार 

काय बघितलं असेल राव, माझ्यामधी 

मी आपला चापून तेल लावायचो 

नि राहणी एकदम साधी 

कॉलेजातले सर्व जण बेछूट जळायचे 

मी एकदा एंट्री मारली 

कि सर्व घरी पळायचे 

हेच कारण असेल बहुधा 

दोघीनी मला छळायचे 

त्यांना कोण भेटतच नसेल 

म्हणून माझ्या मागं लागायचे 

एकदा ठरवून मनाशी 

केला पक्का निर्धार 

तुम्ही दोघीही आवडत नाही 

असं सांगून केला पलटवार 

रडून रडून नाके लाल दोघींची 

रुमालही पिवळे नि ओले 

जगण्यात आता राम नाही उरला 

ऐकून पोटात आले गोळे 

मी तुरंत घेऊनि युटर्न 

सांगून टाकला भावी बायकोचा पॅटर्न 

दोघीनी बांधली मनाशी खूणगाठ 

टाकला लास्ट गियर , थेट पडद्यावर 

मी होतो राव त्यांचा खरा गॉडफादर 

आजचं दिवास्वप्न सपाट 

भेटूया पुढील स्वप्नात   
सिद्धेश्वर विलास पाटणकर


उसने हसून काय मिळविले ? 

तिला वाटलो निर्लज्ज मी 

प्रेमात आकंठ बुडालो असूनही 

तिच्यापासून दुरावलो मी 

तिच्या अश्रूंमध्ये मी उद्याचा पाऊस पाहिला 

रुमाल दिला कि नाही ते आठवत नाही मला 

पण तिचा रडवेला चेहरा मात्र हसून पाहिला 

तिच्या दुःखावर नव्हे, नाही तिच्या भावनांवर 

माझा खांदा तिच्या लायक आहे कि नाही 

तो मी तपासून पाहिला 

अंतःकरणात आलेल्या चैतन्यमयी उकळीचे 

लगेच निवारण झाले 

हसण्याचे कारण असे काही झोंबले 

उभा होतो तिथेच तिने मित्राचे खांदे पकडले 

मी आणि माझ्या प्रेमाचे हसरे कोंब 

दोघांचेही पुरते वांदे झाले 
सिद्धेश्वर विलास पाटणकर

पान : 1 2 3 4 5 ... » »»