Dhanteras 2023 – धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कधी आहे?जाणून घ्या

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कधी आहे आणि कशी केली जाते पूजा 

धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी, आपली संपत्ती, धन आणि धान्य यांची या दिवशी पूजा करणे म्हणजेच धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो. इंद्रदेवानी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारण्यासाठी असुरां बरोबर समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. आणि समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणूनचं धन्वंतरीची या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते.

चीन ने कहा कि बच्चों में माइकोप्लाज्मा के कारण होने वाले निमोनिया में वृद्धि कम होने के संकेत दिख रहे हैं, लेकिन साथ ही उसने चेतावनी जारी की है क‍ि कोविड प्रतिबंधों के बाद सर्दियों के दौरान अन्य श्वसन संबंधी बीमारियों से व्यापक आबादी प्रभावित होने की संभावना है.

 Dhanteras 2023 : धनत्रयोदशीचा मुहूर्त कधी आहे 

धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी, आपली संपत्ती, धन आणि धान्य यांची या दिवशी पूजा करणे म्हणजेच धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो. इंद्रदेवानी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारण्यासाठी असुरां बरोबर समुद्र मंथन केले तेव्हा त्यातुन देवी लक्ष्मी प्रगट झाली. आणि समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणूनचं धन्वंतरीची या दिवशी लक्ष्मी मातेसोबत पुजा केली जाते.

दिवाळीची सुरुवात 9 नोव्हेंबर पासून होणार असून, 15 नोव्हेंबरला दिवाळीचा सण संपणार आहे. पहिल्या दिवशी वसूबारस हा सण 9 नोव्हेंबरला आहे. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. या वर्षी धनत्रयोदशी ही 10 नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी केली जाणार आहे. धनत्रयोदशीचया दिवशी धन्वंतरी देव, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते.

दिवाळी चा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी, या दिवशी आपल्याकडे असलेली संपत्ती ,धन आणि धान्य याच्या बद्दल असलेली आपल्या मनात प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी धनत्रयोदशी चा दिवस साजरा केला जातो.

धनत्रयोदशी 2023

Dhanteras 2023-धनत्रयोदशी 2023

1) धनत्रयोदशी कधी आहे
10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी धन, धान्य आणि भगवान गणेश, भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

2) धनत्रयोदशीच्या पूजेचा मुहूर्त कधी ?
धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 10 नोव्हेंबरला 12 वाजून 35 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि 11 नोव्हेंबरला 1 वाजून 57 मिनिटांपर्यंत असणार आहे. त्यामुळे, या कालावधीमध्ये आपण धनत्रयोदशीची विधीवत पूजा करू शकतो.धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी पूजा केली जाते. या लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी सुरू होणार असून 7 वाजून 46 मिनिटांनी हा शुभ मुहूर्त संपणार आहे.

3) धनत्रयोदशीच्या पूजेचे महत्व काय
असे म्हणले जाते की, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी (13 व्या दिवशी) तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्रमंथनातून प्रकट झाले. त्यावेळी त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले घडा होता अशी मान्यता आहे. तसेच भगवान विष्णूंचा अवतार म्हणून धन्वंतरींना मानले जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो.

म्हणून या दिवशी सोने-चांदी, वाहन खरेदी करण्याचे ही विशेष महत्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी दान केल्याने संपत्तीमध्ये जास्त पटींनी वाढ होते असे म्हणले जाते. त्यामुळे, धनत्रयोदशीची पूजा ही विधीपूर्वक करावी.

4) धनत्रयोदशीच्या पूजाविधी
धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र विकत घेऊन देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी संध्याकाळी गोमती चक्राची पूजा करावी. धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी धणे खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला धणे घेऊन देवी लक्ष्मीला अर्पण करा. भगवान धन्वंतरी यांची मूर्ती किंवा प्रतिमा पवित्र ठिकाणी स्थापन करून स्वतः पूर्व दिशेला तोंड करून बसा. भगवान धन्वंतरीचे मंत्राचे स्मरण कराव.

Dhanteras 2023

“अन्वेषित च सविधिं आरोग्यमस्य। गूढं निगूढं औषध्यरूपम्, धन्वन्तरिं च सततं प्रणमामि नित्यं।। “

त्यानंतर सात प्रकारचे धान्य गहू, उडीद, मूग, हरभरा, जव, तांदूळ आणि मसूर देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना अर्पण करावे आणि दोघांचे फुल, अक्षत आणि अगरबत्तीने पूजन करावे. धनत्रयोदशीला १३ दिवे पेटवण्याची प्रथा आहे. हे दिवे घरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जसे की प्रवेशद्वाराजवळ, स्वयंपाकघरात आणि पूजा कक्षात ठेवावेत. प्रसाद म्हणून धने आणि गूळ बारीक वाटून त्यात कडुलिंबाचा पाला टाकून वाटणे.

Dhanteras 2023

5) धनत्रयोदशी का साजरी करतात
असे म्हणतात की हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. राजा व राणी यांनी आपल्या पुत्राला जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवशी तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. म्हणून त्याची पत्नी या रात्री त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. त्याच्या पत्नीने महालाच्या प्रवेशद्वारवर सोन्या चांदीने भरून रोखले होते.

संपुर्ण महालात मोठमोठे दिवे लावून लखलखीत प्रकाश केला जातो. राजकुमाराचे पत्नी राजकुमाराला वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगुन जागे ठेवते. राजकुमाराच्या खोलीत यम प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. म्हणून या कारणामुळे यम आपल्या यमलोकात परत जातो.

अश्या प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणुनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. म्हणून धनत्रयोदशी या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. प्रसादा म्हणून कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे, धने व साखर एकत्र करून असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.

हेही पाहा : Dussehra 2023: दशहरे पर इस शुभ मुहूर्त में होगी पूजा

धनत्रयोदशी 2023

Leave a comment