Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Photo: Share If u Care:-(
Pls Don't Bargain


आपल्या गावातील किंवा स्थानिक बाजारात जे शेतकरी स्वत:चा भाजीपाला, फळे विकण्यासाठी येतात ते अत्यंत कमी किमतीत आपले उत्पादन विकत असतात ... तरी कृपया त्यांच्याशी किंमतीबाबत  घासाघीस करू नये असे मला वाटते ...!  तुम्हाला पटत असेल तर लाईक  करा...!


आयुष्याच्या वळणावर 
धडपडत चालताना
 धडपडता धडपडता
कधीतरी आपटतो जीव
खूप लागलं तर नाही ना 
पाहत पुन्हा चालू पडतो
वाटेत सतत खाचखळगे 
अडचणी येताच राहतात 
पण चालणं कधी 
थांबत का ?
आयुष्याच्या शेवटच्या 
क्षणापर्यंत चालतच राहायचे  असते 
अडखळत धडपडत पाऊल 
नेहमी पुढेच टाकायचे असते 
आयुष्य जगताना कितीही दुखः आली तरी 
स्वप्न पाहणे का सोडायचे असते 
जीवन जगताना मरणांतिक वेदना मिळाल्या 
तरीही जगणे का सोडायचे असते .......


manaswi Mar 15 '13 · Rate: 5 · Comments: 6
होळीपर्यंत आसाराम बापूंच्या कोणत्याही कार्यक्रमाला महाराष्ट्रात पोलीस परवानगी मिळणार नाही. असे आश्‍वासन राज्याचे गृहमंत्री माननीय  आर. आर. पाटील यांनी जाहीर केले.  
manaswi Mar 20 '13 · Rate: 5 · Comments: 2
लाखात एक देखणी अशी बाला 
पाहून तिच्या रुपाला
सगळेच म्हणत लग्नाची चिंता कशाला
वाटेवरचा चोरही उचलून नेईल तिला 

खरंच अघटीत घडलं
वाटेवरच्या चोरानेच उचलून नेलं
तीन मुलं होईपर्यंत
रूपाच्या तिचं खोबरं  झालं 

अन एक दिवस नको तेच झालं 
बाहेरचा रस्ता दाखवला नवारयाने 
काखेत तीन उपाशी लेकरं 
फिरत राहिली अनवाणी पायाने अन रिकाम्या हाताने

गणगोत सारं कधीच संपलं होतं
सगळं आभाळच आता फाटलं होतं
जगणं आता तिचं संपलं होतं
नशिबी फक्त मुलांसाठी कष्टनं उरलं होतं

पण ती  हरली नाही मोडली नाही
उसंत अशी तिनं घेतलीच नाही
मुलांशिवाय काही असतं हेच ती विसरली
त्यांच्यासाठीच फक्त कष्टत राहिली

केसं हि गजर मळायला असतात
वस्त्र हि कधीतरी स्वतःला नटवायलाही असतात
हसणं नटणं मुरडणं हे ही  असतं
हे सारंच  ती विसरली होती

जिभेवर तलवार नजर घारीची
चाल वाघिणीची हिंम्मत मर्दाची
यात मात्र तिचं बाईपण हरवुन गेलं
तीच मीपण सारं संपूनच गेलं

मुलही तिची कर्तबगार निघाली
स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी
तिच्या आईपणाचा आदर राखणारी
तिच्या सुखासाठी आता झटणारी

पण तिचं सारं तरुण्य प्रौढत्व
कारुण्याची झालर लेउनच जगलं
त्याचे व्रण वृधत्वावरही घाला घालताहेत
आता तिला सुखाचे लेपही नकोसे वाटताहेत

विस्कटलेले आयुष्य आता जोड म्हणताही
जोडले जात नाही
सुखाचा प्याला जवळ असून पी म्हणूनही
आता पिता येत नाही

शरीराचे रोग औषधाने बरे करता येतात
पण हृदयाच्या जखमा कधीच भरता येत नाहीत
मन उध्वस्त करण्याचे काम मात्र त्या चोख बजावतात 
अन दुभंगलेपानाचे  विकार कायमचे जडवून जातात 

manaswi Apr 3 '13 · Rate: 5 · Comments: 7
काल मरून मी स्वर्गात गेलो,
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फाईल स्वर्गातही रखडलेली
इंद्र म्हणाला 'प्रेम करायचा, प्रेम करायचा म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा,
तूला प्रेम वाटता वाटता माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा.
ती तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू काठोकाठ भरायचास
तिने तुझ्याकडे पहिले नसले तरी
ही रंभा तुझ्या प्रेमाचे लाईव टेलीकष्ट पहायची
दयेलहि दया येईल असे तुझे प्रेम पाहून
ही रंभा ढसा ढसा रडायची
सौंदर्य नको, अमरत्व नको
मी तुझ्या सारखं प्रेम करेल अस वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून असं
मला गाल फुगवून सांगायची
एवढं माझं नाव घेतला असतास तर
मी ही तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वतःहून धावलो असतो.
येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकात पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तस म्हणताच मी बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथे पाठवशील
नरकही मला स्वर्गाहून सुंदर भासेल
का म्हणून तिने माझ्याकडे यायचं
तहानलेल्यानं पाण्याकड
का पाण्यानं तहानलेल्याकड जायचं?
मी साधरण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं डबकं, ती झुळ झुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेशचा ऊ ऊ ऊ ऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांबसडक वेणी
मी आरे च दुध, ती शुद्ध लोणी
असं बोलताच इंद्रानं हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीनं परत भूतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावयाच तुझं काहीतरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असं तू कुत्र्याचं शेपूट आहे
तू साधारण असलास तरी तुझं प्रेम असाधरण आहे
तिन्ही जगावर मात करेल असं तुझ्याकड कारण आहे…।


सिद्धार्थ Jul 12 '13 · Rate: 5 · Comments: 16
पान : 1 2 3 4 5 ... » »»