Marathi blogs मराठी ब्लॉग्स

पारतंत्रात जाण्याचा क्षण
     हौसेने
साजरा करण्याचा
सोहळा म्हणजे
   "लग्न"
तू मला दिसलीस की
मनात माझ्या धडधडत,
थोडी लाजून हसलीस की
बजेट माझं कोलमडत…
सिद्धार्थ Jul 12 '13 · Rate: 5 · Comments: 21 · Tags: चरोळ्या
आज तिचा फोन आला ,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,,
ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,
... शब्द सगळे हवेत विरले.,,
ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,,
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ......
काल मरून मी स्वर्गात गेलो,
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फाईल स्वर्गातही रखडलेली
इंद्र म्हणाला 'प्रेम करायचा, प्रेम करायचा म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा,
तूला प्रेम वाटता वाटता माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा.
ती तुझ्याकडे ढुंकूनही पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू काठोकाठ भरायचास
तिने तुझ्याकडे पहिले नसले तरी
ही रंभा तुझ्या प्रेमाचे लाईव टेलीकष्ट पहायची
दयेलहि दया येईल असे तुझे प्रेम पाहून
ही रंभा ढसा ढसा रडायची
सौंदर्य नको, अमरत्व नको
मी तुझ्या सारखं प्रेम करेल अस वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून असं
मला गाल फुगवून सांगायची
एवढं माझं नाव घेतला असतास तर
मी ही तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वतःहून धावलो असतो.
येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकात पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तस म्हणताच मी बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथे पाठवशील
नरकही मला स्वर्गाहून सुंदर भासेल
का म्हणून तिने माझ्याकडे यायचं
तहानलेल्यानं पाण्याकड
का पाण्यानं तहानलेल्याकड जायचं?
मी साधरण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं डबकं, ती झुळ झुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेशचा ऊ ऊ ऊ ऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांबसडक वेणी
मी आरे च दुध, ती शुद्ध लोणी
असं बोलताच इंद्रानं हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीनं परत भूतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावयाच तुझं काहीतरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असं तू कुत्र्याचं शेपूट आहे
तू साधारण असलास तरी तुझं प्रेम असाधरण आहे
तिन्ही जगावर मात करेल असं तुझ्याकड कारण आहे…।


सिद्धार्थ Jul 12 '13 · Rate: 5 · Comments: 16
जगण्यावर प्रेम कर
असं तू नेहमी सांगतेस
पण .... आज जगणं
खूप महाग झालय ...!
प्रेम करावे तर आधी
खिसा बघतो ....!
तू काल वेणी मागितलीस
किमत पाहून
फक्त फुल आणले ....
पण तू नाही  हिरमुसलीस ....!
दिमाखात फुल केसात माळलस...!
पगाराला वाटा  तरी किती ....?
आईला वाण्याचे बिल द्याचे आहे ...!
बहिणीला फी भरायचे आहे ...!
बाबांची इच्छा कोण विचारतो ....?
त्यानाही केंव्हाची प्यायची आहे..!
घराचं भाडं  भरायचय ... !
महागाई किती ...?
गावी दुष्काळ .....!
बघितलं  इथलं जगणं .....?
किती महाग झालय ......!
आणि तू म्हणते
जगण्यावर प्रेम कर........!
पण तू मात्र जगण्यावर
खूप प्रेम करतेस ...!
जेंव्हा भेटतेस ...
नवा सूर देऊन जातेस ...!
नवी पहाट ....., नवे स्वप्न
फुलवून जातेस .....!
मग  मीही ...
नकळत जगण्यावर
प्रेम करू लागतो
नव्या उमेदिने नवं जीवन जगत राहतो.......!!!!!पान : 1 2 3 4 5 ... » »»