Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "ruia"सिंव्हाने मारायचं 

तरसाने पळवायचं 

मेहनत करायची दुसऱ्यानेच 

भलत्यानेच फळ खायचं 

सांग देवा तूच आता 

असं कसं नि किती जगायचं 

कोंबडीने अंड दिलं तरी 

मालकंच त्यावर ताव मारी 

येता पाहुणे घरी 

कोंबडीच कापून स्वागत करी 

अंडपण द्यायचं आणि वेळेसरशी मरायचं 

सांग देवा तूच आता , कोंबडीने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? 

युगेयुगे चालू असाच तुझा गाडा 

मरणारे मरतायंत पोटाला खड्डे पडून 

जिवंतपणीच आपणसुद्धा असंच बघून मरायचं 

हात नाय उचलायचं कि काय नाय बोलायचं 

सांग देवा तूच आता , समद्या जगाने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? सिद्धेश्वर विलास पाटणकरमाधुरी मला नेहेमी चोरून बघायची 

ऐश्वर्या तर मी बाहेर पडताच 

माझ्या मागेच लागायची 

कसाबसा मी घरातून निघायचो 

तोंड लपवत लपवत कॉलेजात जायचो 

कधी एकदा सुटतेय कॉलेज 

असं नेहेमी वाटायचं 

कठीण असत रे मित्रा , असा चेहरा घेऊन बाहेर पडायचं 

नेहेमी भीती वाटायची 

कंटाळलो होतो देऊन देऊन नकार 

त्या आपल्या माझ्या मागे मागे 

घेऊन फिरायच्या कार 

काय बघितलं असेल राव, माझ्यामधी 

मी आपला चापून तेल लावायचो 

नि राहणी एकदम साधी 

कॉलेजातले सर्व जण बेछूट जळायचे 

मी एकदा एंट्री मारली 

कि सर्व घरी पळायचे 

हेच कारण असेल बहुधा 

दोघीनी मला छळायचे 

त्यांना कोण भेटतच नसेल 

म्हणून माझ्या मागं लागायचे 

एकदा ठरवून मनाशी 

केला पक्का निर्धार 

तुम्ही दोघीही आवडत नाही 

असं सांगून केला पलटवार 

रडून रडून नाके लाल दोघींची 

रुमालही पिवळे नि ओले 

जगण्यात आता राम नाही उरला 

ऐकून पोटात आले गोळे 

मी तुरंत घेऊनि युटर्न 

सांगून टाकला भावी बायकोचा पॅटर्न 

दोघीनी बांधली मनाशी खूणगाठ 

टाकला लास्ट गियर , थेट पडद्यावर 

मी होतो राव त्यांचा खरा गॉडफादर 

आजचं दिवास्वप्न सपाट 

भेटूया पुढील स्वप्नात   
सिद्धेश्वर विलास पाटणकर


उसने हसून काय मिळविले ? 

तिला वाटलो निर्लज्ज मी 

प्रेमात आकंठ बुडालो असूनही 

तिच्यापासून दुरावलो मी 

तिच्या अश्रूंमध्ये मी उद्याचा पाऊस पाहिला 

रुमाल दिला कि नाही ते आठवत नाही मला 

पण तिचा रडवेला चेहरा मात्र हसून पाहिला 

तिच्या दुःखावर नव्हे, नाही तिच्या भावनांवर 

माझा खांदा तिच्या लायक आहे कि नाही 

तो मी तपासून पाहिला 

अंतःकरणात आलेल्या चैतन्यमयी उकळीचे 

लगेच निवारण झाले 

हसण्याचे कारण असे काही झोंबले 

उभा होतो तिथेच तिने मित्राचे खांदे पकडले 

मी आणि माझ्या प्रेमाचे हसरे कोंब 

दोघांचेही पुरते वांदे झाले 
सिद्धेश्वर विलास पाटणकर


वेळ येते नि जाते 

वेळेसंगे खुलते हळूहळू  एक नवे नाते 

होतात निर्माण नव्या आशा 

ठरतात आपसूक दिशा नियोजनाच्या , पुन्हा पुन्हा मिलनाच्या 

वेळ थांबत नाही जात असते, वाहत असते 

नाते जन्मलेले असेच वाढत असते अन हळूहळू संपत असते 

वेळेचे खेळ असेच सुरु असतात 

अळवावरच्या थेंबाला आठवणीत झुलवत असतात 

कधी जमून येतो नशिबी असेल तर ध्येयाचा ध्यास 

कधी तो शोधत राहतो अखंड, अविरत 
  
धावू पाहतो तिच्यापुढे 

कधी सूर्य समजतो कुटुंबाचा, कधी कणा, कधी महामेरू 

वेळ थांबत नाही अशीच जात असते पुढे पुढे 

हसत असते त्या असंख्य कण्यांना, महामेरूंना अन स्वयंघोषित सुर्याना 

वेळ माहीत नाही नक्की काय आहे ते ? 

पण डोळे साक्षीदार तिचे 

ती होती आहे अन पुढे राहील 

कैक महामेरू तिच्यासंगे उगवतील न मावळतील 

वेळ पुढेपुढेच जात राहील   


सिद्धेश्वर विलास पाटणकरनभ उतरू लागले खाली 


तुझा निरोप घेऊनि 

नजर धूसर धूसर 

तुझ्या वाटेवर लागुनी 

दीनदुबळी देहबोली 

अश्रुनी चिंब ओली 

संदेश घेऊनि दाटले   

माघारी गेले ते रडवुनी 

आले चिंताग्रस्त खाली 

घेऊनि काळ्या मशाली 

चिंता पेटलेली पाहून 

केल्या सरी सर्व खाली 

धारा कोसळता साऱ्या 

पूर दोहींकडे आला 

निरोप देऊ तो कुणास ? 

राजा पंचतत्त्वी विलीन झाला 


सिद्धेश्वर विलास पाटणकर 
पान : 1 2 »