Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "prem kavita"
"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@सनिल पांगे


भावओले तुझे डोळे
ह्रदयात उतरले....
कळलेच नाही
कधी तुझ्या हाती हात माझे आले....!

शब्दांची अडखळली पाऊलवाट
भावनांचे चंद्रचांदणे असे पसरले
कळलेच नाही
कधी ईथवर आली नि:शब्द पाऊले....!

ह्रदयी धडधड अबोल गाणी
कितीक विरह अव्यक्तात जपले
कळलेच नाही
कधी तुझ्या मनीचे माझ्या मनी उतरले...!

प्रित गातसे विरह विराणी
ह्रदयी स्मृतींचे वसंत जपले
कळलेच नाही
कधी दारी गुलमोहर बहरले.....!!!

                                        " समिधा "
समिधा Feb 1 '16 · Comments: 4 · Tags: prem kavita
मी माळले श्वासात तुला   ....!

अनं   ---

तू असशी इथे तिथे

हे भासही गळाले   ....!!


मी प्राशीले गंधात तुला    ....!

अनं   ---

तू  माझ्याहुन वेगळा

हे भानही नाही उरले   .... !!


मी दिन राती गणल्या

तुझ्याच भेटींना   ....!

अनं  --- 

तू नजरेआड होता

दिन माझे मावळले   ....!!


मी पहाते अवती भवती

तुझ्याच खुणांना   .... !

अनं  ---

तू तसाच पाही मजला

मज अंतरंगी कळले   ….!!


तू  वाट धुक्याची आहे  …

मी भास आभासांची   ....!

अनं   …

हे सर्व जाणिले तरी   ....

प्रेमात रमलो खुळे    …!!!                                         " समिधा "
समिधा Dec 18 '15 · Comments: 5 · Tags: marathi prem kavita, prem kavita

दुर तु... तुझे उन्हामध्ये घर
इथे मी.... माझे सावलीचे माहेर
दुर तू... तुझे गुज माझ्या ओठी
इथे मी... डोळां आसवांची दाटी
दुर तू... तुझे रूसलेले बोल
इथे मी.... माझे आसुसलेे बोल
दुर तू ... तूझे अव्यक्तात प्रेम
इथे मी .... व्यक्त होण्यास आतूर....!!


                                    समिधा 

समिधा Apr 26 '15 · Comments: 2 · Tags: prem kavita


तू  सोबत  असलास की ,
उन्हाचेही चांदणे होते   …!!
तू खळखळून हसलास की ,
समुद्रालाही भरती येते    …!!
तू नुसता बघत असलास की ,
मौनालाही काव्य सुचते   …!!

                              
                         " समिधा "
समिधा Jan 21 '15 · Comments: 7 · Tags: prem kavita
पान : 1 2 3 »