Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "prem"
"प्रेम" .... शब्द दोन अक्षरांचा
नुसता ऐकला तरी हर्ष होतो
आणि उच्चारला तर
दोन ओठांमध्ये स्पर्श होतो
@सनिल पांगे
लग्नाला बारा वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण बारा वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या बारा वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!

 Author  = shree. Shital Mahadev Ghongade
समिधा Feb 6 '14 · Comments: 9 · Tags: prem

        सुनंदा  पुष्कर यांच्या सारख्या शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रीने जीने इथपर्यंतचा प्रवास अतिशय कनखरपणे केला   .... ती  स्त्री केवळ एका पुरुषासाठी आपले जीवन संपवू शकते  …?


         एकटे असून एकटे जगणे  शक्य होते  .... मात्र दुकटे असून एकटे जगणे खुपच कठीण  …! असा माणुस खचत जातो  ....! मग ही  शारारिक  बाब रहात नाही  …! ती मानसीक होते  … माणूस नैराश्याने वेढतो  आणि मग मनाने खचतो  तिथे मग स्त्री असो   वा पुरुष असो तो मग अश्या स्वत:ला  सपंविण्याच्या निर्णयाप्रत पोहचतो  …!!


          तरीही सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित होतो की   शिकल्या सवरलेल्या , स्वावलंबी , शिक्षण , आर्थिक स्वावलंबन लाभलेल्या स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष इतका  महत्वाचा  का  वाटतो  …?

         जेंव्हा याचा शोध घेते तेंव्हा मला समजलेली … उमजलेली काही कारणे आपली भारतीय समाज व्यवस्था याला जबाबदार आहे  ! कारण उच्च विद्या विभूषित  … स्वत:चे  एक विशिष्ट  स्थान प्राप्त केलेल्या स्त्रियांना कदाचित पुरुषी स्थैर्याची  गरज नसेल पण ज्या स्त्रियांचे विश्वच त्यांच्या पुरुषाच्या प्रेम, विश्वास  या भोवती वेढलेले आहे त्यांचे काय  …! ज्यांच्या जवळ शिक्षण, आर्थिक स्वावलंबन  सारे आहे  …! पण स्वत:च्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव नाही  … आणि कधी  असली तरी अश्या पुरुषी समाजात एकटे राहण्याचा आत्मविश्वास नसतो  …अश्या स्त्रीया  घरगुती हिंसाचाराच्या शिकार होऊनही कधी सामाजाच्या भीतीने त्याच्या बरोबर रहात असतात   …!  पण  तरीही काही स्त्रीया अगदी सामान्य स्त्रीयाही नवरा गेल्या  नंतर केवढ्या हिमतीने मुलांना वाढवतात  …आणि स्वत:ही जगतात   !   म्हणजे नवरा जिवंत असताना त्याच्या अस्तित्वाला डावलून जगण्याचा  संस्कार म्हणा , भीति म्हणा , या मुळे त्यांची तयारी   नसते  ! आणि म्हणूनच ज्याच्यावर त्या खरे प्रेम करतात म्हणून  … किंवा स्वत:चा स्वार्थ म्हणुनही   (  कोणताही स्वार्थ …) स्त्रियांना त्यांच्या आयुष्यातला पुरुष  महत्वाचा  वाटतो  अगदी कुणाच्याही जीवापेक्षा   ....! 


   पण आजकाल ही परिस्थिति बदलत आहे   …! म्हणूनच कदाचित (मुलींकडूनही ) घटस्पोटांचे प्रमाण वाढत आहे  …!

                                                                                                                                                         " समिधा "

समिधा Jan 25 '14 · Comments: 6 · Tags: prem, sunanda pushkar, marriage

नक्कीच वाचा: विचार करा.
__________________


हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी

आणि लग्न होणार असलेल्यांनी .......

नक्कीच वाचा: विचार करा.


एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच.
जेवताना मी तिचा हात हातात
घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे."


तिच्या डोळ्यांत वेदना उमटली;
तरीही ती शांतपणे जेवत होती,
सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं,
मला घटस्पोट हवाय."


तिने शांतपणे विचारल,- "का?"


तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली.
समोरच ताट तिने भिरकावून दिलं.
लग्न मोडायला नेमकं काय कारण आहे,
हे तिल जाणून घ्यायचं होत;
पण माझं मन दुसऱ्या स्त्रीवर आलय हे मि तिला
स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो.

माझा बँक ब्यालन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं:
पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला.
तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि
या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती.
तिची कारणे साधी होती. महिन्या भरात आमच्या मुलाची परीक्षा होती
आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता.
तिची आणखी एक अट होती.
लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत.
त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती.
मला वाटलं तिला वेड लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली.


घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.
मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने
बघितलं आणि त्याला फार आनंद झाला.


दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती.
आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस
नित बघितलेच नाही हे मला जाणवलं;
आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय,
असा प्रश्न पडला.
त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं.
रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं, तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां
हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला.


दिवसागणिक तिचं कमी होणारं वजन
माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच
पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना
नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.


आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती.
जी परत आयुष्यात येत होती.


महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.
ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच
नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता.
मी वेगाने CAR चालवत घरी आलो.
माझ्या चेहऱ्यावर हसू होत.
हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर... माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती.
मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो.
माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही.
जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते.


पती-पत्नीच्या नात्यात कार, बंगला, प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.

ruchira Dec 19 '13 · Comments: 1 · Tags: prem
पान : 1 2 »