Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "marathi story"
"हिला मनोरुग्णालयात दाखल करा......!!!!! " डॉक्टरांचे हे बोल ऐकून दीपक एकदम सुन्नच झाला. ठाण्याला ज्या कॉलेजमधे ती शिकत होती त्याच कॉलेज जवळ असलेल्या मनोरुग्णालयात तिला दाखल कराव लगणार होत. आईला हे कस सांगायचं बहिणीच पुढे काय होणार या विचाराने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व धूसर दिसत होत तशातच त्याने ऑटो केला आणि तिला घरी घेऊन आला. आईने आल्यावर विचारले काय झाल? डॉक्टर काय म्हणाले ?दीपक काहीच बोलला नाही आई पण समजून गेली कि डॉक्टर काय म्हणाले असतील. काही दिवसांपासून ऋतुजाच जे वागण होत त्यावरून तिला अस होणार याची जाणीव होती. आजूबाजूचे लोक पण आपापसात कुजबुजत होते कि शालू बाईंची मुलगी वेडी झाली म्हणून. संध्याकाळ झाली होती सागर आपल्या बाहूत सूर्याला सामावून घ्यायला उत्सुक झाला होता. दीपक गॅलरीत येऊन बसला. जसजसा सूर्य मावळतीकडे झुकत होता तसतसा दीपकला त्याचा भूतकाळ समोर दिसत होता. लहानपणापासून मामांकडे राहायला असल्यामुळे आईवडीलांच प्रेम कमी मिळाल होत वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांचं आजारपणामुळे निधन झाल. घरातली सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. आई, लहान बहिण, भाऊ या सर्वाना त्याला एकट्याला सांभाळायच होत.शेवटी नाईलाजाने त्याला शिक्षण सोडाव लागल.छोटी मोठी कामे करत त्याने आपल्या परिवाराला सांभाळायला सुरुवात केली.घरात तोच मोठा होता आई पण धुणी-भांडी करून थोडीफार मदत करायची. शिक्षण कमी असल्याने दीपक ला कोणती चांगली नोकरी मिळत नव्हती पण त्याचा स्वभाव मुळातच धडपड्या असल्यामुळे काही न काही उद्योग करत बसायचा. हे काम धर ते सोड अस काही ना काही चालू असायचं. textile मिल, स्टेशनरी शॉप अशी छोटी मोठी कामे त्याने केली. प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आपल शिक्षण झाल नाही पण त्याने राजेश आणि ऋतुजाच शिक्षण योग्य रीतीने पूर्ण केल.

१० वर्ष सहज निघून गेलीत त्याला आज तो Reliance Communication मध्ये Sales Executive Post var Appointed आहे मे 2009 , राजेश चे Graduation complete झाले आणि त्याला चांगली नोकरी पण लागली. ऋतुजा collegela जायची आणि तिने aptech computer क्लास पण लावला होता. क्लासमध्ये तिची ओळख प्रशांतशी झाली. हुशार,शांत,मनमिळाऊ,आणि सर्वाना मदत करणारा असा मुलगा होता तो. त्याच व्यक्तिमत्व अस होत कि कोणालाही सहज पहिल्या भेटीतच आवडेल. साहजिकच ऋतुजा त्याच्या प्रेमात पडली. त्याला हे कळायला वेळ लागला नाही. गणपतीमध्ये विसर्जनाच्या वेळी त्याने तिला विचारलं ती चटकन हो म्हणाली कारण तिलाही तो हवा होता. कधी काही अडलं तर ऋतुजा त्याला विच्रायाची.एकदा power point मध्ये काहीतरी तिला अडलं. तिने त्याला विचारलं त्याने पटकन mouse वर हात नेला आणि त्याच वेळी ऋतुजा ने हि mouse धरण्यासाठी हात पुढे केला. त्याचा हात तिच्या हातावर होता. ऋतुजा शहारली त्याने हात काही क्षण तसाच ठेवला. तिने झटकन आपला हात मागे खेचला. अस काही न काही रोज व्हायचं. बाजूला बसला असताना तिच्या पायाशी चाळा करायचा मधेच तिची ओढणी खेचायचा. दोघांचा जाण्या येण्याचा रस्ता एकाच होता. त्यामुळे रोज भेटण व्हायचं. कोणी काही बोलतही नव्हत त्यांना. एकदा क्लास सोडून दोघेहीजण बाहेर फिरायला गेले. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. ते एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या बाजूला फिरत होते. तिथे कोणी नव्हते बांधकाम बंद होत बर्याच दिवसांपासून. प्रशांत ने तिला आत चलण्यास सुचविले. तिने नकार दिला. पण तो ऐकेनाच आणि नंतर तिलाही ते हव हवंस वाटल. हळूच त्याच्या मागून ती चालत आली. पहिल्या माळ्यावरच्या व्हरांड्यात दोघेही जण उभे होते. त्याने तिची ओढणी काढून बाजूला ठेवली. केसांचा क्लीप काढला केस मोकळे केले. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. हळूच डोळ्यांवर टेकवले. तिने डोळे बंद केले होते. त्याचे उष्ण श्वास तिला जाणवत होते. तिची काय थरथरत होती. हळूच त्याने तिचा खालचा ओठ आपल्या दोन्ही ओठात घेतला आणि मुक्तपणे त्याचे रसपान केले. तीही त्याला साथ देऊ लागली. त्याचे हात तिच्या केसातून, पाठीवरून फिरत होते. ती त्याला घट्ट बिलगली होती. काही वेळाने तिने आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले आणि रडायला सुरुवात केली. त्याला एकच प्रश्न विचारत होती आपल लग्न होईल ना रे? तो म्हणाला नक्की होईल. त्याने तिचे डोळे पुसले.आजूबाजूला कोणी नाही याचा कानोसा घेत दोघेही दबक्या पावलांनी बाहेर आले. मुख्य रस्त्यावर आल्यावर रिक्षाने त्याने तिला घरी सोडल. आज ती खूप खुश होती.असच असत या वयात तृप्तीचा आनंदच निराळा असतो. त्या ३ महिन्यात असे कितीतरी वेळा त्या इमारतीला त्यांचा सहवास लाभला होता. दीपकला या बाबतीत थोडीशी भनक लागली होती, सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले पण एका मित्राने सांगितले होते कि तुझी बहिण एका मुलासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत होती. त्यानुसार त्याने स्वताहून जाऊन ख-या-खोट्याची शाश्वती केली. त्याने तिला त्याच्यासोबत असताना बघितले. तो तिच्या समोर गेला आणि बाईक वरून तिला घरी घेऊन आला. खूप ओरडला तिला तीही त्याला प्रत्युत्तर देत होती. तो तिच्या अंगावर हात उचलायला धावला तोच आई मध्ये आली. आज त्याला खूप वाईट वाटत होते कारण ज्या बहिणीसाठी तो इतका झटला ,तिच्या सुखासाठी रक्ताच पाणी केल आज ती अशी बोलत आहे आपल्यासोबत . लहानपणी म्हणायची भाई मला हे हवंय ते हवंय त्याने प्रत्येक गोष्ट तिला दिली. आज तीच म्हणते भाई मला तो हवाय. आपल्या माणसांकडून जेव्हा जखम मिळते ना तेव्हा ती खूप गहिरी आणि खोल असते काळ्या कुट्ट अंधारासारखी. आजपर्यंत त्याने कधीच दारूचा घोट घेतला नव्हता पण आज मित्रासोबत बार मध्ये जाऊन बसला आणि मनसोक्त प्यायला मित्रांसमोर रडला, उलटी केली. त्या दिवशी घरी आला नाही मित्राकडेच झोपला. त्याने ठरवलं कि त्या मुलाला समजवायचं नाही ऐकल तर हातापायी करून चांगला धडा शिकवायचा. तो त्याला भेटायला गेला. प्रशांत ने त्याला सांगितलं कि मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशी लग्नही करेन. दिपकने त्याला एकच गोष्ट सांगितली कि जर तू तिला पुन्हा भेटलास तर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीस. त्या दिवशी दीपक घरी आला. पण त्याला एक वेगळीच बातमी मिळाली घरी आईचे आणि ऋतूचे खूप भांडण झाले होते. आईने ऋतूला बरेच काही सुनावले होते. त्याचाच राग मनात ठेऊन ती कुठेतरी निघून गेली. ऋतुजा दुपारपासून कुठे गेली ते कोणालाच माहित नव्हत.तिचा cell हि swtched off लागत होता. दीपक ने बाईक वरून सगळीकडे शोधल बस stand , रेल्वे स्टेशन ,मैत्रिणीचे घर इतकाच काय तर त्याने प्रशांतलाही विचारलं पण त्यालाही माहित नव्हत.त्या दिवशी दीपक खूप घाबरला त्याला वाटल कदाचित तिने स्वताच्या जीवच बर वाईट तर नसेल केल ना? असंख्य प्रश्नांचा गोंधळ डोक्यात झाला. काय करावे काही सुचत नव्हते. कुठे शोधाव ,काय कराव, तिच्यासोबत काही बर वाईट तर झाल नसेल ना ?नाईलाजाने त्याने पोलीस स्टेशनला जायचे ठरवले. बाईक पोलीस स्टेशन च्या रस्त्यावर असतानाच एका देवळाजवळ त्याला ऋतुजा दिसली.त्याला इतका आनंद झाला कि त्याने जाऊन तिला मिठीच मारली आणि रडला खूप रडला. तिला घरी घेऊन आला आणि म्हणाला तूला पाहिजेल तसंच होईल पण पुन्हा तू अस करायचं नाहीस. 

काय माहित का पण त्याला प्रशांत वर विश्वास वाटत नव्हता.पण ऋतू मुळे तो त्याला भेटला त्याला म्हणाला प्रशांत जर तू तिच्याशी शेवटपर्यंत टिकवणार असशील तरच मी तुमच्या लग्नाला Support करेन.या जगातला कोणताही भाऊ आपल्या बहिणीचे प्रेमप्रकरण स्वीकारायला तयार नसतो पण दीपक ने ते केल. प्रशांतच्या past life विषयी जाणून घ्यायला दिपकने सुरुवात केली.२००६/०७ मध्ये त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती.पण नंतर काही कारणांमुळे त्याचं बिनसलं.पण अजूनही ती एक मैत्रीण म्हणून त्याच्या
आयुष्यात आहे.जेव्हा दिपकने हे ऋतूला सांगितलं तेव्हा ती म्हणली कि मला प्रशांत ने सर्व काही सांगितलं आहे .आता ती फक्त त्याची मैत्रीण आहे बाकी काही नाही.ती त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती कि तिचा कोणावरच विश्वास नव्हता.आपल्या व्यक्तिमत्वाने प्रशांतने तिला संमोहित केल होत एकप्रकारे. आणि ऋतूला पण प्रशांत आणि त्यांना Support करणाऱ्या मित्रांवरच विश्वास होता.सप्टेंबर २००९ च्या पहिल्या आठवड्यात मामा आणि मामीने ऋतू साठी एक स्थळ आणल होत.पण तिने त्याला नकार दिला होता.कारण तिला प्रशांतशी लग्न करायचं होत. दिपक प्रशांतला भेटायला गेला त्याने सांगितले कि तू तुझ्या घरच्यांना तुमच्याबद्दल सांग कारण आम्हाला ऋतूच लग्न करायचं आहे. माझ्या घरच्यांना मी तयार करतो. तेव्हा प्रशांत ने चक्क नकार दिला आणि म्हणाला कि माझ्या घरचे तयार नाही होणार. दीपक ने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकत नव्हता. दीपकला कळल कि त्याने फक्त टाईमपास केला होता. त्या क्षणी त्याला मारायचा विचार त्याच्या मनात आला पण तो तसाच घरी आला. आईला आणि ऋतूला घडलेला प्रकार सांगितला आईची परत बडबड सुरु झाली. पण दिपकने आईला शांत राहायला सांगितले कारण ऋतू खूप हळवी होती. त्याला भीती वाटत होती कि ती परत मागच्यासारख काही पाउल उचलेल. त्याने तिला समजावलं पण ती समजावण्याच्या खूप पलीकडे गेली होती. तिने त्याला call करण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही receive केला नाही sms करून बघितले पण काही उपयोग झाला नाही.दुस-या दिवशी ती त्याला भेटायला घराजवळ गेली त्याच्याशी बोलली. त्याने परत आपल्या मधाळ वाणीने तिची समजूत घातली तिला सांगितलं कि बाबांना heart attack आला होता त्यामुळे हा विषय घरात नको. ते बरे असते तर मी त्याला conveyance केल असत पण आता मला त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही. तिला तो हेही म्हणाला कि जर तुझ्या भावाने माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्या जीवाच बर वाईट करून घेईन. तिने त्याला खूप समजावयाचा प्रयत्न केला पण त्याने दाद दिली नाही. घरी आल्यावर खूप रडली.

पाहिलं प्रेम
त्यात हळव मन
जणू काही
दावाग्नीने पेटलेल मन

अशी तिची अवस्था झाली होती.रडून रडून डोळे सुकले होते, दीपकला तिची अवस्था बघवत नव्हती तो यायचा तिला समजावयाचा पण काही उपयोग होत नव्हता. तासंतास एकटीच खिडकीबाहेर बघत बसायची शून्यात नजर लावून.कागदावर काही तरी चित्र रेखाटत बसायची. एक दिवस खूप ताप आला काही केल्या कमी होईना ताप डोक्यात गेला आकडी आली तिला हॉस्पिटलमध्ये admit करण्यात आल. दीपकला वाटल आता तरी प्रशांत येईल पण नाही तो आला नाही त्याच्या वडिलांची बदली पुण्याला झाली त्यामुळे तो निघून गेला होता. काही दिवसात तापातून ती बरी झाली.पण तीच वागण बदललं काहीही बडबड करायची,चिडचिड करायची हट्टीपणा वाढला.दिपकने डॉक्टरकडे दाखवलं औषोधोपचार चालूच होते. आपल्या बहिणीची हि अवस्था बघून दिपकलाही व्यसन लागल. दारूचा घोट घश्याखाली उतरल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती एखादा दिवस घेतलीच नाही तर घसा सुका पडत होता. एक दिवस तिने आईला कारण नसताना मारलं लाटण्याचा वार असा होता कि आईला डोक्याला २ टाके पडले.मग मात्र डॉक्टरांनी दीपकला सांगितलं कि ती आता violent होत चालली आहे त्यामुळे तुम्ही तिला मनोरुग्णालयात दाखल करा.जिथे तिचा इलाज होईल जर घरी ठेवलं तर उद्या ती स्वताच्या किंवा तुमच्या कोणाच्या जीवाला हानी करू शकेल. अचानक आईने जेवायला हाक मारली आणि दीपक भूतकाळातून बाहेर पडला. आता त्याच्यासमोर काळाकुट्ट असा भविष्यकाळ होता. उठला जेवायला गेला.जेवताना आईला म्हणाला.ऋतुजाची bag भरायला घे उद्या जायचंय तिला...........

आजही दिपकपुढे एकाच प्रश्न आहे ज्या मुलाने त्याच्या बहिणीला फसवल त्याच काय करायचं,उद्या समजा ती बरी झाली आणि त्याने पुन्हा तिला त्रास दिला.sms करून,फोन करून तिच्या आठवणी परत जाग्या केल्या तर काय करायचं असे अनेक प्रश्न त्याला सतावत आहेत. त्याला तुमच्या मार्गदर्शनाचीगरज आहे 
एक विलक्षण प्रेमकथा..
.
अदिती आणि निरव हे गेली दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये आहेत.दिवसभर work मध्ये असणारा निरव दररोज संध्याकाळी 9 वाजता तिला फोन करायचा. बोलताना त्याचं सुरवातीचं एक वाक्य कायमचं ठरलेलं असायचं.ते म्हणजे hey dear i lov u.हे वाक्य ऐकल्याशिवाय अदितीला कधी झोपच यायची नाही.एक दिवसही तिचा असा गेलेला नसतो की तिचं त्याच्याशी फोनवर बोलणं झालं नाही.एक दिवस सत्याचा सामना करायचं ठरवुन नीरव तिला घरीघेऊन गेला आणि त्यांच्या रिलेशनशिपविषयी सगळं सांगितलं.त्याच्या आई वडीलांनी मोठ्या मनाने त्यांच्या नात्याला परवानगी दिली.त्यांच्या लग्नाला परवानगी दिली.आणि त्यांना सल्ला दिला की एकदा आपल्या कुलदेवतेला जाऊन या.त्यांनी त्यांचं म्हणणं ऐकुन ते कुलदेवतेच्या दर्शनाला गेले.दोघांनी देवाला नमस्कार करुन आपली इच्छा देवाजवळ व्यक्त केली.अदितीने मनोमनी देवाजवळ मागणं मागितलं की,देवा निरवच्या कोणत्याही bst 3 wishesh तु पुर्ण कर,एवढंच माझं मागणं आहे तुझ्याकडे..निरव ने मागणं मागितलं कि,देवा ही जे काही तुझ्याकडे मागतेय ते ते तु तिला दे.देवाजवळ आपल्या इच्छा व्यक्त करुन ते तिथुन निघतात.
यानंतर अदितीचं त्यांच्या घरी येणंजाणं म्हणजे कायमचंच होऊन जातं.पण तरीही त्यांच मोबाईलवरचं बोलणं काही थांबलं नव्हतं.
एक दिवस अदिती निरवला पुर्वकल्पना देऊन दोन दिवसांच्या summer campला जाते,एकडे निरवला त्याच्या working site वर जोराचा अपघात होतो.त्यामध्ये त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.त्याच्या आईवडीलांना याचा जोराचा धक्का बसतो पण ते हृदयावर दगड ठेवुन ठरवतात की यातलं काहीही अदितीला कळु द्यायचं नाही,कारण ती हे अजिबात सहन करु शकणार नाही.दोन दिवसांच्या समर कँप नंतर जेव्हा ती त्याच्या घरी येते,तेव्हा त्याचे आईवडील त्याच्याविषयी सांगणं टाळुलागतात.पण हार चढवलेला निरवचा फोटो बघुन,ती हिसक्याने तो हार खेचते.आणित्यांना म्हणते,अंकल ही कसली चेष्टा आहे,त्याच्या फोटोवर हार का चढवला होता तुम्ही ?शेवटी लपवता येणं कठीण वाटु लागल्यावर ते तिला सर्व हकीकत सांगुन टाकतात.पण तिला ही गोष्ट न पटणारी असते.ती म्हणते,हे कसं शक्य आहे?गेले दोन दिवस आम्ही contact मध्ये आहोत,त्याने मला कालच तर call केला होता.ती तिच्या cellphoneमधील recived calls मधील निरवचा नंबर दाखवते.पण त्यावर आता calling करुन पाहताना तो नंबर बिझी दाखवत असतो.पण तरीही ती त्यांना पटवुन देण्यासाठी सांगते कि निरव every evening 9.pmला मला कॉल करतो.आजही तोकॉल नक्कीच करेल.
उत्सुकतेपोटी ते थोडावेळ तिच्यावर विश्वास ठेवतात.
ते सायंकाळचे आठ वाजल्या पासुनच तिचा cellphone टेबलवर ठेवुन,तीन बाजुला तिघे जण बसलेले असतात.तिघांच्या ही नजरा cellphone वर खिळलेल्या असतात.तिघांच्या ही मनात एक चलबिचल आणि भीती असते.घड्याळात 9 चा ठोका पडतो.आणि त्या मोबाईलची रिंग वाजते.थरथरत्या ह!ताने अदिती तो फोन लाऊडस्पीकरवर ON करते,आणि त्यातुन आवाज येतो,hey i love u dear! हे ऐकुन त्याच्या आई वडीलांना हा विश्वास पटतो की हा निरव आहे तो म्हणतो,मला माहीतीयेमम्मी पप्पा तुम्हीही मला ऐकताय,अ!दिती,मम्मी पप्पा जेकाही म्हणतायेत की मी मेलोयते अगदी खरंय..
अदितीःमग तु सध्या आमच्याशी बोलत कसा आहेस?कसली मस्करी करतोयस?
निरवःही सुद्धा तुझीच कृपा आहे.तुने देवाकडे मागितलेले माझे 3 wishash पुर्ण करण्याचे मागणे,यातली ही माझी दुसरी wish होती कि मी मृत्युनंतरही काही दिवस तुझ्याशी बोलु शकेन.आणि तिच इच्छा सध्या देव माझी पुर्णकरतोय.
ते जाऊदे पण एक लक्षात ठेव तुला आता तुझं आयुष्य सावरायचंय आणि योग्य तो वर बघुन तुला लग्न करायचंय माझ्या आठवणीत तु तुझं आयुष्य बरबाद करु नयेस असं मला वाटतं.
अश्रुंनी भिजलेल्या चेहर्याने ती म्हणते,ठीकेय मी करीन लग्न! पण तुझी पहीली wish काय होती.
निरवःअगं ती तर मी मंदिरातच मागितली होती,तु जे मागतीयेस ते तुला मिळो,आणि देवाने तुला दिलं....सॉरी पण मला जावं लागेल उद्यापासुन मी तुला कॉल करु शकणार नाही.
आई वडीलांना तो हिचं लग्न करुन देण्यास सांगतो आणि लगेच फोन कट होतो....
अदितीच्या मनातला एक प्रश्न तर अनुत्तरीतच राहतो की निरवची तिसरी wishकाय होती.
.
.
.
.
.
आज अदितीचं लग्न होऊन सहा वर्षे झाली.ती एका श्रीमंत घरात नांदतीये.संध्या काळचेनऊ वाजतायेत. तिच्या मोबाईलची पुन्हा एकदा रिंग वाजते,ती फोन उचलते हेलो कोन? समोरुन आवाज येतो,hey i love u dear!निरव हा तुच आहेस,कुठे आहेस तु?कुठे होतास तु?
तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर तिला मिळत नाही.तिच्या cellphone वर पडलेला नंबर ती बघते.तिच्याच बंगल्यातील hall मधला landlineचा नंबर असतो तो...
.
bedroomमधुन बाहेर येऊन ती hallमधल्या त्या phoneकडे ती बघते...फोनवर तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा असतो जो तिच्याकडे बघुन हसत असतो.आत्ता तिला कळतं की निरवने देवाकडे त्याची तिसरी wish कोणती मागितली होती ते।
सहा वर्षे निरवच्या आठवणीँनी दबल्या गेलेल्या तिच्या अश्रुंना आज तिने तीच्या मुलाच्या रुपातील निरवला मिठीत घेऊन मोकळीक दिली,ज्यामुळे तिचं मन खुपच हलकं झालं..
मित्रांनो काहीजणांच प्रेम हे अद्वितीय असतं.जे वास्तविकतेच्या खुपच
पलीकडचं असतं.पण खुप वेळा अशा प्रेमाला त्याचं योग्य स्थान मिळत नाही,आणि म्हणुन त्याची योग्य किंमत कळत नाही.अन जेव्हा त्याची योग्य किंमत आपल्याला कळते.तेव्हा त्याची किंमत ठेवण्याइतकी, आपल्याला किँमत राहीलेली नसते..
ती सावरली पण तो क्षणात ढासळला..
आज तिचा फोन आला..
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ..
स्वतःला सावरून तिन सांगितलं,
अरे माझ लग्न ठरलं...


ती सावरली पण तो क्षणात ढासळला..
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला..

शब्द सगळे हवेत विरले...
ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला अपराध्यासारखी माफी का मागतेस?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस..
या जन्मी नाही झालीस माझी..
तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल..
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल..
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला..

कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला.. -_-

एक मुलगा एका कार अपघातात खूप गंभीर रित्या जखमी होता...
त्या अपघातात आणखी एकजण ठार सुध्दा झाला होता...
वेळीचं मदत मिळाल्याने या मुलाला लवकर शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात
आणण्यात आले होते...

मात्र डॉक्टर जाग्यावर नव्हते,
काही काळानंतर फोन केल्यानंतर डॉक्टर आले,
तितक्यात मुलाची आई एकदम रागात त्या डॉक्टर कडे पाहत म्हणाली,
तुम्हा डॉक्टर लोकांना दया नावाची गोष्टआहे का नाही...

माझ्या मुलाचे किती रक्त गेले मगापासून,
तुम्ही ­इतक्या हलगर्जीपणाने एवढे उशीरा का आलात..??

डॉक्टर म्हणाले आई मला माफ करा,
मला यायला जरा वेळ लागला मात्र आता मी आलो आहे...
देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल...

ती आई अजून रागाने म्हणाली तुझ्या माफी मागण्याने माझा मुलगा ठीकहोणार नाही,
तू जावून लवकर इलाज कर...

डाँक्टराने नर्स ला जवळ बोलावून घेतले आणि काहीतरी सांगून ते आत ऑपरेशन साठी गेले,
काही वेळाने ते परत आले
आणि त्या बाईला म्हणाले,
आई आता तुमचा मुलगा नक्की ठीक होईल,
थोड्या वेळाने त्याला शुध्द येईल, तुम्ही भेटू शकता...

आणि डॉक्टर शीघ्र तिथून चालते झाले...
ती बाई त्या नर्स ला म्हणाली,
या डॉक्टर ला एवढी कसली घाई,
जर माझा मुलगा शुद्धीवर आल्यावर गेले असते तर काय बिघडत होते...??

त्यावर नर्स म्हणाली,
बाई तुमच्या मुलाने मागच्या अपघातात
ज्या मुलाला ठार केले आहे तो याचं डॉक्टरचा मुलगा आहे...

Photo: एक मुलगा एका कार अपघातात खूप गंभीर रित्या जखमी होता...
त्या अपघातात आणखी एकजण ठार सुध्दा झाला होता...
वेळीचं मदत मिळाल्याने या मुलाला लवकर शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात
आणण्यात आले होते...

मात्र डॉक्टर जाग्यावर नव्हते,
काही काळानंतर फोन केल्यानंतर डॉक्टर आले,
तितक्यात मुलाची आई एकदम रागात त्या डॉक्टर कडे पाहत म्हणाली,
तुम्हा डॉक्टर लोकांना दया नावाची गोष्टआहे का नाही...

माझ्या मुलाचे किती रक्त गेले मगापासून,
तुम्ही ­इतक्या हलगर्जीपणाने एवढे उशीरा का आलात..??

डॉक्टर म्हणाले आई मला माफ करा,
मला यायला जरा वेळ लागला मात्र आता मी आलो आहे...
देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल...

ती आई अजून रागाने म्हणाली तुझ्या माफी मागण्याने माझा मुलगा ठीकहोणार नाही,
तू जावून लवकर इलाज कर...

डाँक्टराने नर्स ला जवळ बोलावून घेतले आणि काहीतरी सांगून ते आत ऑपरेशन साठी गेले,
काही वेळाने ते परत आले
आणि त्या बाईला म्हणाले,
आई आता तुमचा मुलगा नक्की ठीक होईल,
थोड्या वेळाने त्याला शुध्द येईल, तुम्ही भेटू शकता...

आणि डॉक्टर शीघ्र तिथून चालते झाले...
ती बाई त्या नर्स ला म्हणाली,
या डॉक्टर ला एवढी कसली घाई,
जर माझा मुलगा शुद्धीवर आल्यावर गेले असते तर काय बिघडत होते...??

त्यावर नर्स म्हणाली,
बाई तुमच्या मुलाने मागच्या अपघातात
ज्या मुलाला ठार केले आहे तो याचं डॉक्टरचा मुलगा आहे...

Photo: ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना !

एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली.
असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्याएका खिळ्याततिचा एक पाय
चिणला गेला आहे.
त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधारअसलेल्या पो­कळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?
जे जवळ जवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहेआणिती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला.
.
.
.
कल्पना करा १ नाही,२नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.
तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा.


ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना !

एकदा तेथे एका माणसाने आपल्या
घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली.
असे करतना भिंत तोडून उघडायला
लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा
पोकळी असते.
तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल
अडकून पडली आहे आणि भिंत सांधताना मारलेल्याएका खिळ्याततिचा एक पाय
चिणला गेला आहे.
त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं
कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन
बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय चिणलेल्या अवस्थेत ही पाल
जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं कीत्या अंधारअसलेल्या पो­कळीत
हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?
जे जवळ जवळ अशक्य होतं.
त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष थेवून बसला,
की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याच्या लक्षात आलं की
तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहेआणिती हळूहळू त्या
खिळलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक
झाला,गहिवरला.
.
.
.
कल्पना करा १ नाही,२नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल
आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते,अजिबात आशा सोडून न देता !
एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची
अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू
शकतो.
तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी
आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते, तेंव्हा. "तुम्ही" म्हणजे
त्या व्यक्तीसाठी संपूर्ण दुनिया असू शकता.
कोणतीही गोष्ट
(नातं,विश्वास...)
तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु
जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.....Happy Valentine's Day...............!!!!!

पान : 1 2 »