Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "marathi kavita blogs"
मनाच्या एकांतात तुझी खुप आठवण येते,
मला रोज खुप खुप सतावते..

नकळत माझ्या मनात आठवण देऊन जाते,...


नेहमीच कशी आपली भेट ही पहिलीच भेट  असते...!

संकोचाची खोल दरी मध्ये पसरलेली दिसते....!

पहिल्याच डोळाभेटीत कशी जन्मोजन्मीची ओळख पटते ,

उपचाराच्या हात जोडण्यात सगळी दरी जुळून जाते.....!

चारच वाक्यात पुन्हा जमते नांव नसलेले  अतूट नाते,

मनामध्ये वाळले ,सुकले हिरवे होऊन चमकून उठते....!

एखाद्याच सौम्य हास्यात व्यक्त होतात कोमल कथा ,

नकळत सोडलेल्या एका उसाशात वाचता येतात मनोव्यथा ,

एकदम होते निरभ्र आकाश ताजे प्रसंन्न टवटवलेले ,

सगळ्या वेली , सगळे वृक्ष फळा फुलांनी लवथवलेले ,

मधले दिवस, महिने वर्ष - की मध्ये काहीच नसते...?

नेहमीच हि पहिली भेट - आणि आकाश निरभ्र होते.....!स्वप्न पाहण्यासाठी एक
रात्र सुध्दा जास्त असते,

पण स्वप्न पुर्तिसाठी
एक आयुष्य सुध्दा कमी पडते...

देव देताना इतकं देतो की,
कुठं ठेवावं सुचत नाही..

अन घेताना एवढं घेतो
की जगावं की मरावं हे सुचत नाही
लढ मित्रा लढ म्हणायला 

माझे काय जाते आहे? 

कारण शिवाजी जन्माला यावा 

पण बाजूच्या घरात अशा समाजातले आम्ही 


मित्रा तू अधिकारी असलास तरीही 

सरकारी नोकरच आहेस 

पण परिघात राहूनही तू 

संविधानाची ढाल घेऊन लढतोच आहेस 


शह काटशहच्या राजकारणात तू 

नियम अधिनियमांच्या बरोबर चालतोस

कितीही शह काटशह दिले तरीही 

शेवटी तूच बरोबर असतोस 


तू ज्याही विभागात जातोस

तिथे खूप छान बदल होतात

तू तिथेही जास्त टिकत नाहीस

बदलांच्या वाऱ्यात नवा विभाग तुझ्यासाठी तयारच ठेवतात


तू हरत नाहीस थकत नाहीस 

मिठाला जागून तू तिथेही राबतोस 

जुन्या खोडांचा श्वास गुदमरला की 

पुन्हा प्रशासकीय कामाचा भाग म्हणून दुसऱ्या विभागात जातोस


असे नाही कि प्रत्येक वेळी खळखळ होतच नाही 

चार दिवस निषेध बोर्ड लागतात

पेपरातही तीव्र नाराजीच्या बातम्या येतात

पुन्हा वादळ थांबून सगळे शांत होतात


पण मित्रा तुला थांबायला वेळ कुठे आहे?

आम्ही मात्र बातमी दाखवत हा आमचा मित्र म्हणवतो

तू कसा लढतोस याच्या कहाण्या ऐकवतो 

अन तुला लढ मित्रा लढ म्हणतो


आज आम्ही कॉमनमेनच्या नावाखाली

निष्क्रिय आयुष्य जगत आहोत 

तुला मात्र लढ म्हणताना 

स्वतःची कातडी वाचवत जगत आहोत.

मी नाही म्हणत....
तू फक्त माझं असावं...
पण माझ्या जीवनात मात्र
तुझ्याखेरीज कुणी नसावं...
मी नाही म्हणत....
तू मलाच आठवावं..
पण तू मात्र सदैव
माझ्या स्मरणात राहावं..
मी नाही म्हणत....
तू मला मनात ठेवावं...
पण माझ्या मनी
मात्र तूच वसावं...
मी नाही म्हणत....
तू माझ्यासाठी रडावं....
पण माझी पापणी मात्र
तुझ्याचसाठी भिजावं..
मी नाही म्हणत....
तू मला प्रेम कराव...
पण कधीतरी तुलाही
माझ्याचसारखा प्रेम व्हाव...
मी नाही म्हणत....
तू कधी हसू नये....
पण माझ्यासाठी हसण्याचे कारण
मात्र तूच असावं..
मी नाही म्हणत....
तू मला भेटावं..
पण माझ्यासाठी ती भेट
मला सुखी करून जावं...
मी नाही म्हणत....
कधी तू माझ्यासाठी
कविता रचावी...
पण माझी लेखणी तुझ्याच
आठवणीत वळावी....
मी नाही म्हणत....
कधी तुला मीच दिसावं....
पण मला, डोळे बंद होताच स्मरणात
तुझाच चित्र रेखातावं...
मी नाही म्हणत....
कधी तुझी भावना
तुझ्यापासन दूर जावी..
पण दुख होईल मला, जर
माझी भावना तुला न कळली....
मी नाही म्हणत....
तुझ जगन माझ्यासाठी बदलावं...
पण माझं स्वप्न जगणं हे
तुझ्याकुशीत पूर्ण व्हाव...
मी नाही म्हणत....
माझ्या भावनानसोबत खेळू नको...
पण माझं तुझ्यावर खरच प्रेम
आहे हे तू विसरू नकोस...
मी एवढच म्हणते....
माझ्या प्रेमाची जाणीव
व्हावी....
अन पुढच्या जन्मीतरी
तु माझा अन
मी तुझी बनून याव...
पान : 1 2 »