Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "marathi kavita"
सांग कसे
विसरायचे त्या
हळुवार  क्षणांना  …!!
अलगद येऊन बिलगतात
माझिया मनाला   ....!!!

स्पर्शून जातो
वारा  …
अनं गंध तुझा येतो  … !
क्षणिक रिमझिमल्या
मनाला
रंगात न्हाऊन जातो   … !!

मग -
तुला भेटाया
मन काहुर काहुर  होतो
अनं -
क्षितिजावर पहाते
तुझा रंग बदलेला   …!!!

परि -
पाहुन रंग
तुझा तृप्त
मनी अतृप्त
मी न राहते
ठाऊक असे  मजला
आतला रंग , रंगातला   ....!!

                                     
                                     "समिधा"
समिधा Aug 22 '14 · Comments: 1 · Tags: marathi kavita, prem kavita, viraha prem kavita
मला खूप वाटतं की
तुला लॉंग राईड ला न्ह्यावं
तुल इम्प्रेस करायला
हात सोडून गाडी चालवावं

डिस्क ब्रेक कसा असतो
हे तूला वारंवार दाखवावं
तुझ्या त्या एका स्पर्षासाठी
सारखं सारखं ब्रेक दाबावं

ऐंशीनं गाडी चालवावं
अनं तुला मला बिलगू द्यावं
तोच क्षण अनुभवायला
परत चाळीस वर यावं

मानेवर माझ्या तू
एक गोड कीस करावं
जादूनं त्याचा माझ्या
गाडीचं हैन्डल लडबडावं

रस्त्यानं जाताना कोणी
भुट्टावाला दिसावं
एकच कणीस दोघांनी
एकत्र शेअर करून खावं

घरी परत जाताना तुला
एक छानसं गीफ्ट द्यावं
हरखून त्यावर तू एक
गूड नाईट लीप किस द्यावं
ती समोर आल्यावर
हृदयाची स्पंदने वाढतात,
का नकळत काळजाचा
एक ठोका चुकवतात,

त्याला हाक मारताना
शब्द तोंडात अडखळतात
तिचेच नाव ओठावर येते
अन आजूबाजूची लोकं हसतात

मोबाईलची रींग वाजताच
धावतच मी जातो
तिचा फोन नाही बघून
कटच करून टाकतो

तिची स्वप्ने पडतात म्हणून
हल्ली लवकर झोपतो मी
झोप नाहीच आली तर
तिचे दिवास्वप्न बघतो मी

असं मला का होतं
कोणी जरा सांगेल का?
तिच्या शिवाय आयुष्य माझं
आयुष्यच उरेल का?
ती आहे,

एक सुरेख स्वप्न
जे सत्यात उतरणार नाही,
आशेचं वेडं पाखरू
जे घरट्यात परत येणार नाही…. 

फुलाहून नाजून ती
जणू चंद्राची चांदणी आहे,
अस्मानीची परी ती
हृदयाची माझ्या राणी आहे….

कवितेतून भेटते ती मला,
तिचे गोजिरे रूप घेउनी
माझ्या मनातून संगीत वहाते
शब्दांचे सुंदर साज लेउनी…


पान : 1 2 3 4 5 ... » »»