Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "."
मैत्री नसते दोन शब्दांचा खेळ 
नसते निव्वळ छेडाछेडीची वेळ 
मैत्री म्हणजे प्रत्येक क्षणात 
क्षणातील प्रत्येक सु:ख दु:खात 
साथ द्यायची असते ती वेळ... 

सर्व नात्यांपलीकडचं नातं म्हणून मैत्रीकडे पाहिलं जातं. वय, भाषा, धर्म, जात, लिंग अशा मर्यादा झुगारून सर्वत्र सुगंध पसरवणारा सोनचाफा म्हणजे मैत्री! आजतागयात या नात्यांची अनेक रूपं आपण पाहिली आहेत. शाळेत असताना तेव्हा आपल्या बाकावर बसणाऱ्या त्या राणी नाहीतर शेमड्या बाळ्याची काही वर्षांनंतर बालमित्र-मैत्रीण/लंगोटी यार म्हणून ओळख करून देताना, तेव्हा आईने डब्यात दिलेल्या पोळी-भाजीपासून ते बाईंच्या धम्मक लाडूपर्यंत हा आपला वर्गमित्र भागीदार असण्याच्या आठवणीत आपण अगदी रममाण होतो. त्यानंतर आयुष्यात आलेल्या कॉलेजच्या कट्टाग्रुपची कैफियत काही औरच! 

कॉलेजची मैत्री म्हणजे उधाण आलेल्या समुदाच्या बेधुंद लाटाच जणू. कॅण्टीनच्या वेटिंगपासून आयटमच्या सेटिंगपर्यंत आपले फण्टरच कामी येतात. बदल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. मैत्रीसारखी बाबही याला अपवाद नाही. आजच्या तरुण पिढीची मैत्रीची भावना, मैत्रीची व्याख्या, संकल्पना पार बदललेली दिसते. यात काही गुण, तसंच काही अवगुणही आढळतात. पण आजच्या नव्या दमाची मैत्री ही खरंतर दमविरहितच आहे. यात पूवीर्सारख्या जोश, जल्लोष दिसत नाही. अहो, इथे जो तो आपल्या कोशातच गुरफटून बसलेला आहे. सेकंद काट्याप्रमाणे पळणाऱ्या धकाधकीच्या या जीवनात एकमेकांशी मैत्री तर सोडाच आपुलकीचे चार शब्द बोलण्यासाठीही कोणाला वेळ नसतो. मग, यातूनच सुरू होतो प्रवास त्या एकांतवासाचा. 

अशाच एकांताच्या अंधारकोठडीत अडकलेला एक कैदी म्हणजे प्रीतम. एकाकीपणाचा जणू अभिशापच त्याला लागला असावा. तसा तो नेहमी शांत, निशब्द, एकांड्या, कोणातही न मिसळणारा. आजपर्यंत त्याच्या चेहऱ्यावरील भावही टिपता येऊ नयेत अशा प्रीतमच्या स्वभावात अचानक एक वेगळीच चमक दिसू लागली. त्याच फोनवर सारखं कोणाशी तरी बोलणं, नजरेतली ती दबकी चंललता लगेच हेरण्यासारखी होती. एरवी मोबाइलवर गेम खेळण्याशिवाय त्याचा बोलण्यासाठी वापर करताना प्रीतम कधीच दिसला नव्हता. त्या दिवशी आलेल्या त्या एका कॉलमुळे त्याच्या स्वभावात विशेष फरक पडत चालला होता. एखाद्या पंख कापलेल्या पक्षाला आपल्या पंखाची गती परत मिळून स्वच्छ आकाशात विहार करायला मिळावा, तसा त्याचा चेहरा खुलला होता. हळूहळू हे कोडं उलगडत गेलं. 

प्रीतमला आपले विचार, प्रश्न समजून घेणारं जवळचं कोणीतरी भेटलं आहे, असं तेव्हा वाटलं. पण ते केेवळ वाळवंटातील मृगजळ होतं. याने तहानलेल्याची तृष्णा कधीच भागणार नाही, हे कळण्यात बराच वेळ गेला होता. आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील, असं वाटणारा प्रीतम या कधी न सुटणाऱ्या कोड्यात अधिकच गुरफटत गेला. त्या दिवशी त्याचा फोन वाजला आणि समोरून मनाला स्पर्श करणारा आवाज ऐकला, सीमाचा. ती फ्रेण्डशिप नावाच्या एका संस्थेत काम करत होती. तो केवळ कॉल नव्हता, तर आजकाल फ्रेण्डशिप करण्याचे काही नवे मार्ग निघालेत त्यातलाच एक प्रकार म्हणजे 'फ्रेण्डशिप कॉल' होता. 

वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडता येत नाही किंवा मैत्रीचा खरा अर्थच त्याला कळला नव्हता. आज अशा अनेक माध्यमांमुळे आपण एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतो. पण याद्वारे खरंच तेवढी भावनिक जवळीक साधली जाऊ शकते का? प्रीतम जिच्याशी फोनवर आपली सुखंदु:खं मांडत होता, खरंच ती व्यक्ती त्याच्या विचारांशी तेवढी समरस होत होती? आपण एकमेकांना चेहऱ्याने ओळखत नसलो, तरी आजकाल सर्रास येणाऱ्या या फ्रेण्डशिप कॉल्स, गेट टू गेदरसारख्या कल्पनांमुळे माणसाचा एकाकीपणा नष्ट होऊ शकतो. दोन अनोळखी व्यक्तींमध्ये मैत्री होऊ शकते. पण, ती नि:स्वाथीर् असावी, तिथे वेळेची बंधनं, कॉलरेट, टारगेट्स अशा मर्यादा असणारी बंधनं माणसं दुसऱ्याच्या भावनांशी खेळून आपलं माकेर्टिंग स्किल दाखवतात. अशा दूषित वातावरणात प्रदूषणात फूल कोमेजून ते मैत्रीसारख्या सुंदर, निर्मळ, नात्याची मैत्री म्हणजे असा वटवृक्ष आहे जो हळूहळू आपल्या फांद्या विस्तारून वाटसरूला रखरखत्या उन्हात सावलीचे दोन क्षण देतो. तिथे मैत्रीच्या नात्याची सावली काय मिळणार? कदाचित प्रीतमला हे तेव्हा उमगलं नसावं, नाहीतर आजही तो अशा एकाकीपणाच्या अभिशापात अडकला नसता. 
shree Apr 9 '13 · Tags: .
Aai
आई होणं ही स्त्रीजन्मासाठी परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका लेकीची आई होणं हे स्त्रीला अधिक समृद्ध करतं... एका मातेचा हा स्व शोध.... 

खेडेगावातच नव्हे तर आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या ई-जनरशेनमध्येही लेकीचं मातृत्व किती सहजपणे नाकारलं जातं हे पाहून वाईट वाटतं ते त्या होऊ घातलेल्या लेकीच्या आई साठी! लेकीचं आईपण म्हणजे.... लेकीच्या जन्मापासून त्या नात्यातला तो प्रत्येक क्षण आईपणाचा तो प्रवास ज्यात लेकच नव्हे तर तिची आईही मोठी होत असते.लेक लहान असते तेव्हा वेगवेगळ्या रंगीबेरंगी पिना हेअरबँड क्लिप्स फ्रॉक्स जीन्स टॉप्सस्कर्टस इअरिंग्ज इतकंच काय बाहुल्या भातुकली अशा किती किती गोष्टीत जणू आपणच आपली राहिलेली हौस-मौज पुरवतोय की काय असं आईला वाटत असतं. कुठल्याही कार्यक्रमासाठी लेकीला तयार करताना इतकं मग्न व्हायला होतं की आपलीही तयारी करायची आहे हे लक्षातच येत नाही. फ्रिलवाल्या फ्रॉकमधे ती टुलुटुलू चालते तेव्हा आपणच ढगांवर चालतोय असं आईला भासतं. ती थोडी मोठी होऊन भातुकली मांडू लागते तेव्हा तिच्या हातचा कुरमुऱ्यांचा खोटा खोटा भात खाताना पोट भरून जातं आणि ऊरही! मग लेक आरशात बघून स्वत: नटू लागते. चेहऱ्यावरच्या छोट्याशा पुळीने अस्वस्थ होते. नैसर्गिक मानसिक शारीरिक बदलाने आमूलाग्र बदलते. पूर्वीचं कोवळेपण निरागसपण चेहऱ्यावरून नाहीसं होतं आणि कौमार्य चेहऱ्यावर मिरवू लागतं. तिचा वयात येण्याचा काळ म्हणजे लेकीच्या आईसाठी परीक्षा असते. तिला सावरणं आवरणं तिच्या प्रश्नांची समर्पक उत्तरं तिचं बदललेलं ताळतंत्र सांभाळताना आईची दमछाक होते. पण त्याचबरोबर मुलगी मोठी होताना पाहणं हा तिच्यासाठी एक सोहळा असतो. जणू ते स्वत:च स्वत:ला वयात येताना पाहणं असतं स्वत:चं तारुण्य पुन्हा अनुभवणं असतं जगणं असतं! वाटतं जणू आपल्या शरीराचा आपल्याच मनाचा एक भाग स्वतंत्र होऊन वेगळा आकार घेतो आहे.लेक शाळेत जाते नवं नवं शिकते तिच्या मैत्रिणींच्या अल्लड गप्पांत आईसुद्धा लहान होते. लेक कॉलेजात जाते तिचं विश्व आणखी विस्तारतं. कधी आई हेच अवघं विश्व असणाऱ्या लेकीच्या विस्तारल्या विश्वात आई एक छोटासा ठिपका होऊन जाते. कधी दोघींचं पटत नाही. आईचे सल्ले लेकीला कंटाळवाणे वाटतात. पण अतोनात काळजीबरोबरच आईला असतं ते तिच्या विश्वाचं प्रचंड अप्रूप! तिच्या मैत्रिणी तिचे मित्र... मन धास्तावतं. तरी मनाच्या एका कोपऱ्यात वाटतं मला होती बंधनं पण मी नाही तुला इतकी बंधनं घालणार! तुझ्यावर विश्वास आहे गं माझा! आईला आवडतात लेकीच्या महत्त्वाकांक्षा... तिचं आपल्या ध्येयाशी प्रामाणिक असणं... वाटतं आपल्याला नाही जमलं असं प्लॅन्ड फोकस्ड आयुष्य. पण लेकीने जमवलं हो! ऊर अभिमानाने भरून येतो.लेक मार्गाला लागते. कमावती होते. आई पुन्हा सुखावते. लेक बोहल्यावर चढते. साश्रुनयनाने लेकीला निरोप देताना कृतार्थ होते. लेक पहिल्या बाळाला जन्म देते आणि खरं तर आजी झालेली ती पुन्हा आई होते. नातवंडाची आई! मुलगा आणि मुलगी या दोघांचीही आई असलेल्या मला एक अनुभव प्रकर्षाने वेगवेगळ्या क्षणी येतच राहतो. आई होणं ही स्त्रीजन्माची परिपूर्णता असतेच. पण त्यातूनही एका लेकीची आई होणं हे माझ्या मते एका स्त्रीला अधिक समृद्ध करतं. स्त्री त्वाला अधिक प्रगल्भ करतं. लेकीचं आईपण म्हणजे स्वत:चं स्वत:लाच शोधणं असतं आणि हा न संपणारा शोध प्रत्येक क्षणाला वेगळंच समाधान अमाप सुख देऊन जातो. तात्पर्य , 'लेकीचं आईपण म्हणजे एक सोहळा आहे सोहळा!! आणि हो , ' लेकीचा बाप होण्यातली गम्मत निव्वळ अवर्णनीयच! केवळ वंशाचा दिवा हवा या हव्यासापोटी हे सुख हे भाग्य अव्हेरणाऱ्यांएवढे दुर्दैवी आणि कर्मदरिद्री तेच!! 
shree Apr 3 '13 · Tags: .

कॉलेजला सुटी असल्याने राणी खुशीत होती. दुपारी टीव्हीवर मॅच बघत असतानाच बेल वाजली. राणीनेच दार उघडलं आणि ती बुचकळ्यात पडली. 
कडक युनिफॉर्ममधले पोलीस तिच्यासमोर उभे होते. 
बाहेरच उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनमध्ये तिचा प्रियकर उत्पल मान खाली घालून बसला होता. 
पोलिसांनीच मग काय झालंय याचा नीट समजेल असा उलगडा केला. 
- गेल्या सहा महिन्यांपासून उत्पल टेलिफोन कंपनीच्या किमती केबल्स चोरून विकत होता. 
कारण काय तर राणीला काहीबाही किमती गिफ्ट देऊन खूश ठेवायला. 
रात्रीच्या वेळी संधी साधून उत्पल वरचेवर एका कंपनीच्या आवारात ठेवलेल्या केबल्स चोरून मार्केटमधल्या एका एजंटाला विकायचा. गेल्यावर्षीच उत्पलचं राणीसोबत सूत जुळलं होतं. प्रेमात आकंठ बुडालेल्या उत्पलचं आयुष्यातलं एकमेव टारगेट काय तर राणीला खूश ठेवायचं. त्यासाठी गिफ्टच दिली पाहिजे, असा त्याचा समज. मग व्हॅलेंटाईन डे आला की दे राणीला महागडी गिफ्ट, बर्थ डे आला दे महागड्या हॉटेलात पार्टी. कधी महागडे इयर रिंग्ज तर कधी किमती पर्स. 
विचारलंच राणीने, कुठून आणलेस पैसे तर ठोकून देई, ‘डॅडकडून घेतलेत. मी एकुलता एक ना. मग देणार नाहीत का?’ 
राणीही मग उत्पलने खास तिच्यासाठी आणलेल्या महागड्या भेटींचा आनंदाने स्वीकार करी. 
पण पोलीस दारात आले आणि तशी ती चांगलीच पस्तावली. कारण चोरीच्या कमाईतून आरोपीने केलेली खरेदी म्हणून पोलिसांनी राणीजवळच्या इयररिंग्जपासून पर्सपर्यंंत सारा ऐवज जप्त केला. 
अगदी कॉलनीतल्याच दोघा पंचांच्या साक्षीने पंचनामा करून. 
राणीला अगदी मेल्याहून मेल्यासारखं झालं.
----------***----------

गर्लफ्रेंडला भापवण्यासाठी नको तिथून पैसे कमावणार्‍या प्रेमवीरांची गोची
निश्‍चल प्रेमात पडला आणि त्याची लाइफस्टाइलच बदलली. ब्रॅण्डेड कपडे आणि अडीच-तीन हजारांचे शूज. इम्पोर्टेड गॉगल आणि घड्याळ. प्रेयसीवर इम्प्रेशन पाडायचं तर हा खर्च केलाच पाहिजे, असं मित्रांना मोठय़ा गुर्मीत ठणकावून सांगायचा. तिच्यासोबत कधी मॉलमध्ये शिरला की पाच-सात हजारांची शॉपिंग ठरलेलीच. या सगळ्याला पैका कुठून आणायचा तर केली ऑफिसच्या पैशांची अफरातफर. शेवटी मॅनेजमेंटने पोलिसात तक्रार केली आणि केलं पोलिसांच्या हवाली. 
सुटून आल्यावर प्रेयसीला तोंड दाखवायचीही लाज वाटू लागली. 
पोलीस अधिकार्‍यांच्या अनुभवानुसार अगदी मूलभूत गरजांसाठी गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांच्या तुलनेत छानछोकीसाठी गुन्हे करणार्‍यांचा वर्ग खूपच मोठा आहे. कारण गरजा भागवण्यासाठी जितके पैसे लागतात त्यापेक्षा कित्येक पटीत पैसे मौजमजेसाठी लागतात. उधळणुकीला र्मयादा असते कुठे? 
आता अगदी नकळत्या वयात मुलं प्रेमाबिमात पडतात. मेहनत करून कमाई करण्याचा मार्ग सापडायचा असतो. तशी पात्रता आलेली नसते. मुलींना भापवण्यासाठी बड्या धेंडांची मुलं घरचे पैसे उचलून दोन्ही हातांनी उधळतात. त्यांना पाहून मग ज्यांची अशी आर्थिक स्थिती नसते त्यातल्या काही जणांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो. 
आपण कशात कमी पडतोय तर ते पैशांमध्ये. 
मग त्यावर उपाय काय, तर कुठेतरी हात मार. 
- आणि सापडतात गुन्हेगारीच्या सापळ्यात. 
बिअर बारमध्ये काम करणार्‍या मुलींवर दौलत जादा करणार्‍या जमातीचा शोध घेत राहाणं हा तर पोलिसांच्या कामाचा मोठाच भाग. या मुलींच्या प्रेमात पडलेल्यांनी तर एकापेक्षा एक गंभीर गुन्हे केल्याची असंख्य उदाहरणं आहेत. 
आरोपी सापडला की, पोलीस शोधतात तो गुन्ह्यामागचा मोटिव्ह. कोणत्या उद्देशाने आरोपीने गुन्हा केलाय हे हुडकणार्‍या पोलिसांना प्रॉपर्टीविषयक केसेसमध्ये बहुतेक आरोपींनी कुठल्या ना कुठल्या ‘नाजूक’ प्रकरणात अडकून गुन्हे केल्याचं आढळतं. 
‘तुझ्यासाठी काय पण’, असं म्हणत क्राईम करणार्‍यांना खर्‍या प्रेमाची व्याख्या कुठे ठाऊक असते?
----------***----------

प्रेमात पडणं काही गुन्हा नव्हे ..पण प्रेमासाठी गुन्हा?
प्रेम म्हणजे उदात्त भावना वगैरे ठीक आहे. 
पण काही प्रेमविव्हळ मजनू मात्र लैलाच्या चैनीखातर नाहक स्वत:वर गुन्हेगारीचा स्टॅम्प मारून घेतात. अगदी आनंदाने. 
निवांत गप्पा मारायला महागड्या कॉफीशॉपमध्ये जा. तिथे पदरमोड ठरलेलीच. 
उंची भेटवस्तू देणं म्हणजे प्रेम व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग, असाही काहींचा गैरसमज. 
प्रेमात पडणं गुन्हा नाही; पण प्रेमासाठी गुन्हा करणं मात्र बिल्कुल गलत.
shree Mar 28 '13 · Tags: .
पान : 1 2 »