Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "मैत्री"
"आई म्हणजे भेटीत आलेला देव"!


"पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट" !


आणि 


"मित्र म्हणजे देवालाही न मिळणारी भेट"!  

There is some self-interest behind every friendship. 

There is no Friendship without self-interests. 

This is a bitter truth.' 

- Chanakya 
........... 

स्वार्थाशिवाय मैत्री ती कसली?...चाणक्याने मैत्रीबद्दल केलेल्या या स्पष्टीकरणामुळे क्षणभर धास्तावायला होतं, पण कधी कधी वाटतं चाणक्य अजब होता. ही व्याख्या वाचून गेल्या जनरेशनने किंबहुना चाणक्याला थेट वेडं ठरवायलाही कमी केलं नसतं. पण हे स्पष्टीकरण डोक्यात ठेवून जेव्हा आज मित्र म्हणून मला दहा चेहरे आठवत असतील, तर त्यापैकी या नियमाला अपवाद असणारा एकच आहे, किंबहुना कोणी नाहीच. 

काळाची गरज म्हणा किंवा जनरेशन गॅप म्हणूनही असेल कदाचित, पण पूवीर् मैत्रीचे गोडवे गाण्यात जसे पेपरांचे रकानेच्या रकाने, कवितांच्या ओळी खरडल्या जायच्या, इनफॅक्ट आजही खरडल्या जातायत, तसं मुळातच आता काही उरलेलं नाही. यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर वेळ आहे. कामाचं प्रेशर, ठरवलेलं टारगेट, सतत अपडेट राहण्याची सक्ती या सगळ्यात एकूणच स्वत:बद्दलचा होणारा तटस्थ विचार कमी झालाय. तोच विचार पार्शली सुरू असेल, तर त्याला आपण स्वार्थ म्हणू शकतो. कारण आज मी जे देतो, त्यातून मला काहीतरी हवं असतं किंबहुना मला काही हवं असतं म्हणूनच मी काहीतरी देतो. या मानसिकतेची वीण आजच्या जनरेशनवर खूप घट्ट आहे. 

सकाळी ८ ते रात्री १० असं माझ्या कामाचंच शेड्युल असेल, तर माझ्याच ऑफिसमधले, माझ्याच फिल्डमधले मित्र करण्यावर माझा भर असेल. जेणेकरून प्रॉब्लेम्स सेम असतील. त्यातही दोहोंची ठिकाणं वेगवेगळी असतील तर जास्त चांगलं. कारण अनुभवातला फरक. त्यातही मला ज्या वेळी बोलायला वेळ आहे त्याच वेळी त्यांना हवा हे बंधन आलंच. त्यातही आणखी घनिष्ट त्याने असावं, असं असेल तर आम्ही किमान एकाच भागात राहायला हवं. अर्थात, यात सगळ्या अटी माझ्याच आहेत, असं नाही. दुसऱ्या बाजूच्या अटी ज्या वेळी याच असतात, त्याच वेळी अटी जुळतात आणि एक नवा मित्र मिळतो. तो जोवर आहे तोवर आहे. 

लाइफ आयसोलेटेड होतंय. त्यामुळे मला केवळ त्या मित्राबद्दलच माहीत असणं गरजेचं असतं. तो कुठे राहतो, ऑफिसव्यतिरिक्त काय करतो, त्याची फॅमिली, त्याच्या इतर कौटुंबिक अडचणी याच्याशी मला देणं-घेणं नसावं आणि त्यालाही. ते विचारण्याचा जर प्रयत्न झाला तर त्याला इण्टरफिअरन्स समजलं जातं. म्हणूनच कॉलेजमधला मित्र महिनाभर कॉलेजला आला नाही, तर त्याच्या घरी कोणी जात नाही. त्याच्या पालकांचाच फोन आला, तर मात्र मित्र या नात्याने खरी माहिती सांगितली जाते. एखादी मैत्रीण फक्त बॉयफ्रेण्डबरोबरच तिकडे नालासोपाऱ्यात जाणार असेल, तर त्याला आडकाठी वगैरे केली जात नाही. मैत्रिणीच्या पालकांचा फोन आला तर त्यांनाही खरी माहिती द्यायची नसते, कारण मैत्रीचा धर्म. या सगळ्या अटी दुसऱ्या बाजूलाही लागू असतात. आता ही मैत्री, ओळख, तोंडओळख या सगळ्या गोष्टी मागे पडल्या. तुझं-माझं जमतंय तर चल आपण मित्र. इतकं सगळं सोपं असतं. प्रत्येक कन्सेप्टवर काथ्याकूट करायला वेळ कुठाय? 

अर्थात, एखादा असा मित्र असावा की त्याला आपल्याबद्दल, आपल्या कुटुंबाबद्दल, अडचणींबद्दल माहीत असावं. आपले प्लस-मायनस पॉइण्ट्स, आपल्या आवडी-निवडी त्याला माहीत हव्यात. तो नेहमी सतर्क करणारा, वाईटापासून अडवणारा वगैरे वगैरे असावा, हे सगळं ऐकायला चांगलं आहे. पण जर मी तशी अपेक्षा केली, तर तोही तशीच अपेक्षा धरणार यात वाद नाही, बट, वुई डोण्ट हॅव मच टाइम टू स्पेण्ड ऑन इच अदर यार. जे चाललंय ते चांगलंय. तो चाणक्य म्हणतोय ते खरंय. ही मैत्री आपल्या मीटरमध्ये बसायला हवी, तरच फ्रेण्डशिपवर पेपरचे रकाने भरण्यात पॉइण्ट आहे यार. 

चाणक्य आज बरोबर आहे. कारण तो काळाच्या पुढचा माणूस होता. दॅट्स इट. 
shree Apr 9 '13 · Rate: 5 · Comments: 3 · Tags: friendship, मित्र, मैत्री
हॅव मेट, फ्रेण्ड्स, बेस्ट फ्रेण्ड्स... स्वत:हून मैत्रीचा हात पुढे केलेल्या मित्रवर्याच्या नेटवरच्या ऑफरचा स्वीकार करताना त्याचीच अशी वर्गवारी करायची ही कल्पनाच थोडी वेगळी वाटली. पण नंतर लक्षात आलं, हे नेटवर्किंग आहे. वर्किंग लंच असतो, तशीच ही नेटवरची वकिर्ंग मैत्री. काहींच्या मते, ही वर्किंगपुरती म्हणजे कामापुरती मैत्री, तर काहींच्या मते, काम करता करता झालेली मैत्री... आपल्यासाठी मात्र कामातल्या कामातही वेळ काढता येण्याजोगी मैत्री हे सुरुवातीपासूनच ठरलेलं होतं. त्यामुळेच हायफाय ग्रुपमध्ये कुणी आपल्याला बोलावतंय, याचं अप्रूप वाटायचं, पण ते कुतूहल शमण्याआधीच कळू लागलं की यातले कित्येक मेल आपसुक आलेले असतात किंवा निव्वळ नेटप्रसाराचा भाग असतात. कित्येक जण तर व्हायरसचा भाग बनून येतात, तर काही जण थेट तुम्हाला तुमचा पासवर्डही लिहिण्यास भाग पाडतात. एकंदरीतच या सगळ्या 'फॉरवडेर्ड मैत्री'त आपण फिट्ट बसतोय का, याचं उत्तर नकाराथीर्च होतं. तरीही नेट हा मैत्रीचा हक्काचा प्लॅटफॉर्म ठरला. याचं कारणच हे की त्यात फॉरवडेर्ड प्रकाराला कमीतकमी स्थान होतं. नेट, फोन, एसेमेस या सगळ्याच माध्यमांचं काही वेगळं नाही. त्यामुळेच चॅटवर अनोळखी माणसं अनोळखी नावांनी कशी काय अनोळखी विषयांवर निरर्थक गप्पा मारतात, याचं पडलेलं कुतूहल आठवू लागलं. 

,आता आपणही फॉरवडेर्डच्या प्रवाहात स्वत:ला सामावून घेतलंय. पण आजही प्रत्येक कम्युनिकेशनला आपलं मनापासूनचं एक्स्प्रेशन मानण्याची प्रवृत्ती गेलेली नाही. असा विचार करतानाच दिवाळीच्या दिवसात स्वत: कार्डपेपरवर यथाशक्ती रंगरंगोटी करून चारोळ्या-पाचोळ्या खरडून मित्रांसाठी केलेली ग्रीटिंग्ज आठवली. फोन, नेट, एसेमेस यामुळे मैत्री मेकॅनिकल झाली की वाढली, याचं उत्तर शोधायला गेलं, तर त्यातून समान धागा सापडणं कठीणच दिसतं. नेटमुळेच तर दूर परदेशात बसलेल्या मित्राबरोबरची पावसाळ्यातली भटकंती आठवली आणि त्याबद्दल त्याला लिहिलं, तेव्हा त्याच्याही मनात त्या आठवणी ताज्या होत्या. खरंतर या नव्या माध्यमांनी कित्येकदा शिक्षण-नोकरीनिमित्ताने दूर गेलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा संपर्कात आले आणि कदाचित त्या वेळी नव्हती एवढी ओळख पुन्हा वाढल्याचेही प्रसंग घडले. कुणीतरी परवा म्हणालं, जो तुमच्याबद्दल धडधडीत सत्य सांगू शकतो, तुमच्या चुका दाखवू शकतो आणि तुमच्या हाकेला रात्री-अपरात्रीही साद देऊ शकतो, तोच खरा मित्र. आता पुन्हा तोच खरा की तो खरा यातला फरक म्हणजे हॅव मेट, फ्रेण्ड््स, बेस्ट फ्रेण्ड््स अशासारखाच झाला. आपण किती जणांना विश्वासाने हाक मारून तरी पाहिली आहे, हेही कोडंच. पण प्रत्येक वेळी कम्युनिकेशन हे एक्स्प्रेशन नसतं, हे जाणलेलंच बरं, अशी सध्याची तरी स्थिती आहे. त्यामुळेच लोक मैत्रीतही कुणालाच गृहित धरत नाहीत. इथे पुन्हा नेटवकिर्ंगचा अर्थ जो तो जसा घेईल त्यावर ते अवलंबून असतं. त्यामुळेच मैत्रीच्या व्याख्येत फार अर्थ काढत बसू नये, हेच बरं. आपल्याला पटेल, आवडेल त्याच्याशी आपण बेहद्द मैत्री करावी, हे बरं. आपण हाक मारली, तर मित्र धावून येईल का, असा विचार आपण करतो. हा विचार सुरू असतानाच एका मित्राच्या अकाली मृत्यूची बातमी आली. मित्र गुजरातेत गेला होता, मित्राचा विचार सतत मनात होता, पण आज त्याच्यासाठी कुठे धावपळ करायची वेळ आली असती, तर आपण हातातलं काम टाकून किती जण त्याच्यासाठी येऊ शकले असते? कुणाच्या घरचं कुणी वारलं, तर किती वेळा आपण भेटायला जातो? सगळीकडेच इतकी अनास्था नसते, पण इथेही हॅव मेट, फ्रेण्ड््स, बेस्ट फ्रेण्ड््स असा फरक आपण करत राहतोच...खरं तर हे सगळंच विविध नातेसंबंधांइतकंच जगड््व्याळ आहे. रक्ताच्या नात्यातही जर दिलोजानसे त्याग करण्याचा मोठेपणा आजकाल आपण दाखवू शकत नाही, तर तो मैत्रीत तरी का अपेक्षित धरायचा? पण म्हणून सगळी मैत्री कोरडीच असते, असं तरी का मानायचं? हॅवण्ट मेट स्टिल फ्रेण्ड््स अशी कॅटेगरी या नेटवकिर्ंगमध्ये कुणी ठेवलेली दिसत नाही, पण अपेक्षा तरी तीच असते, नाही का? 
काही दशकांपूर्वी अस्त्र-शस्त्र आणि पैसा श्रीमंतीचे निकष मानले जात. पण आता ज्याच्याजवळ माहितीची संपत्ती आहे तोच श्रीमंत समजला जातो. माहितीचा प्रचंड खजिना आणि स्ट्रॉंग नेटवर्क असणारे या शतकाचे राजे आहेत. त्याचप्रमाणे ट्वेंटीफर्स्ट सेंच्युरी इज सेंच्युरी फॉर फ्रेंडशीप असं म्हटलं तर वावगं ठरू नये. एकविसावं शतक मैत्रीचं जाळं विणणाऱ्यांचंही आहे. 

......... 

एकविसावं शतक मैत्रीचं शतक म्हणून ओळखलं जातं. मैत्री करण्याचं आणि वाढवण्याचं सर्वाेत्तम ठिकाण म्हणजे कॉलेज. कॉलेज सुरु झालं की कॉलेजपरिसरातील चहलपहल वाढू लागते. फ्रेंडशीपचं महत्त्व आणि गरज वाढते. मग मैत्री कुणाशी करावी, तिचे निकष काय असावेत, ती दीर्घकाळ कशी टिकवता येईल यावर प्रत्येकाच्या मनात विचारमंथन सुरू होतं. इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून, वेगवेगळ्या वर्गातील, अनेक स्वभावाची, मानसिकतेची मुलं-मुली येत असतात. त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा वेगळ्या असतात. अशा वातावरणात आपण निश्चिंत राहू, कम्फर्ट फील करू शकू अशा मुलामुलींशी मैत्री होणं म्हणजे सुवर्णयोगच असतो. 

एका संस्थेच्या पाहणीनुसार स्टाइलिश मुलामुलींसोबत मैत्री करायची उत्सुकता साऱ्यांनाच असते. विशेषत: आऊटरग्रूम्ड दिसणाऱ्यांकडे आकर्षण अधिक असतं. स्टाइलिश, डायनॅमिक, चार्मिंग असणाऱ्यांसोबत मैत्री करण्यास सारेच उत्सुक असतात. सगळ्यांशीच बोलत नाही किंवा स्वत:ला वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करत असलेल्यांशी मैत्री व्हावी असं वाटणारे खूपजण असतात. 

खरं म्हणजे मैत्री करण्यामागे वेगवेगळी कारणं असतात. पण कॉलेजमध्ये मैत्री करण्याची विशेष कारणे पॉवर, कम्युनिटी आणि स्कूल लॉबी आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणं हीच असतात. एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या सहवासात आनंद मिळत असेल तरीही मैत्री करण्यात आनंद असतोच. मैत्रीचे सुरुवातीचे निकष हेच असतात. अभ्यासात कोण हुशार आहे आणि कुणाच्या नोट्सची देवाणघेवाण करता येईल हा मैत्रीचा निकष सर्वात शेवटचा. या मुलांचा संपूर्ण फोकस असतो तो स्टाइलवर. इतकंच नव्हे तर स्टाईलबेस मैत्रीकडे अॅसेट म्हणूनही पाहिलं जातं. ग्रुपमध्ये कशाप्रकारची मुलंमुली आहेत हेही पाहिलं जातं. मैत्री कुणासोबतही होवो अपेक्षा एकच असते, कम्फटेर्बल सोबत. गरज पडली तर मदत करणार की नाही हा निकष नसतोच. या यंगस्टर्सना सतत ताणलेला चेहरा नको असतो असं व्हॉट्स माय सोल्यूशनच्या अनुपमा यांना वाटतं. तुटलेले संबंध पुन्हा जोडण्याचं स्किल ज्याच्याकडे आहे, नवे संबंध प्रस्थापित करता येतील आणि जुन्या संबंधात जोश भरण्याची क्षमता ज्यात आहे, तीच व्यक्ती एकविसाव्या शतकात टिकाव धरू शकते, असं प्रतिमा आणि भूषण मंुगलेवार यांना वाटतं. 

चेहऱ्यावर स्मितहास्य, मिष्कील स्वभाव आणि ज्याच्यासोबत सुरक्षितता जाणवते अशा मुलांसोबत मैत्री करण्यात मुलींना रस असतो. तर मोकळ्या स्वभावाची पण सर्वांसोबत न बोलणाऱ्या मुलींबरोबर मैत्री करण्याकडे मुलांचा ओढा असतो. अर्थात फार खचिर्क आणि शिष्ट मुलामुलींपासून मात्र दूर राहणं सारेच पसंत करतात. ओव्हर पझेसिव्ह, निगेटिव्ह थींकिंग असलेल्यांना टाळण्याचा नेहमीच प्रयत्न होतो. नेटवकिर्ंग स्किल वाढवण्यासाठी कॉलेजमधील मैत्रीची नक्कीच मदत होऊ शकते. मैत्रीमुळे सहकार्याची भावना वाढते. 

स्वत:ला व्यक्त करणं सर्वांसाठीच सोपं नसतं. जितके मित्रं जास्त तेवढ्या गप्पा जास्त. त्यामुळे एक्सप्रेशनचा प्रश्न सहज सुटतो. आत्मविश्वास वाढतो. अनेकदा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येणारे नैराश्य, डिप्रेशन मित्रांच्या सोबतीने टाळता येतं. अभ्यासक्रमात न शिकवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मैत्रीच्या माध्यमातून शिकता येतात. आजच्या मॉडर्न युगात मैत्रीचा मोठा फायदा म्हणजे लाइफस्टाइल अपडेट राहते. आयुष्यात कधी कुणाची गरज पडेल सांगता येत नाही. त्यामुळे मैत्रीचं जाळं जाणिवपूर्वक विस्तारणं आवश्यक आहे. प्रोफेशनल लाइफमध्ये दाखल झाल्यानंतर समोर येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तयारी कॉलेजात मैत्रीच्या माध्यमातून करून ठेवता येते. 
जय आणि आदितीच्या लव्हस्टोरीपलीकडे 'जाने तू...' एक भन्नाट गोष्ट सांगतो. त्या मित्रमैत्रिणींच्या एकमेकात गुंतलेपणाची, हेवा वाटावा अशा त्यांच्या कांेडाळ्यांची... आणि तिसऱ्याच्या येण्याने वाढत जाणाऱ्या दोघांमधल्या अंतराची... 

एकेकाळच्या लंगोटीदोस्तीत येणारं हे अंतर मात्र खूप अबोल आणि टोचत राहणारं असतं. दोस्तीतल्या याच नेमक्या नाजूक जागेवर 'जाने तू...' अलगद फंुकर घालतो. त्यातून आपल्याही हरवलेल्या मित्रमैत्रिणी आपल्या डोळ्यापुढे येतात. त्या रोल्टू, जिगी आणि बॉम्ससोबत आपल्याला आपला जुना कट्टा आठवू लागतो आणि त्यातले अनेक जण आज मनानेही किती दुरावलेत, हे आत कुठेतरी सलत राहतं... आपली

जयची क्लोजेस्ट फ्रेण्ड म्हणवणारी आदिती, मेघनाच्या येण्याने आतून दुखावते. पण हे दु:ख आपल्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपवून टाकते. सिनेमाच्या वाक्यातच सांगायचं तर 'खुश रहने के लिये बहुत कोशिष' करते. हे असं आपल्याही आयुष्यात घडलेलं असतं. फक्त ती मेघना जशी जयची गर्लफ्रेण्ड बनून येते, त्याऐवजी ती तिसरी व्यक्ती कोणीही असू शकते. 

या तिसऱ्या व्यक्तीच्या एण्ट्रीवरून आजवर अनेकांच्या मैत्रीचा डाऊनफॉल सुरू झालाय. आपल्याच आयुष्यात डोकावलं की दिसतं... एखाद्या मित्राच्या आयुष्यात आलेली गर्लफ्रेण्ड, एखाद्या मैत्रिणींचं झालेलं लग्न... या घटना आपल्याला तिच्या किंवा त्याच्या मैत्रीपासून दूर घेऊन जातात. मग आपणच आपल्या मनाची समजूत घालू लागतो, की जाऊ दे रे, आता त्यांच्या प्रायोरिटीज बदलल्या आहेत. 

बऱ्याचदा असंही होतं की, बेस्ट फ्रेण्ड्सच्या ग्रुपचा ट्रॅक बदलतो... म्हणजे कॉलेज संपतं, नोकरीच्या जागा बदलतात किंवा काहीही.. पण हे सवंगडी शरीराने एकमेकांपासून दूर जातात... पहिले काही दिवस फोन, मेल, स्क्रॅप या सगळ्याची संख्या खूप असते... पण जसा काळ जातो तसं प्रत्येकाला नवे सवंगडी भेटतात आणि आधीचे हे मित्र दुरावत जातात... तेव्हा 'जाने तू...'मधील शालीच्या तोंडचे एक वाक्य आठवतं... 'बाद मे ऐसा हुआ की जय से हमारा मिलनाजुलना कम हुआ...' 

जाने तू...' मधला रोल्टू हेही असंच भारी कॅरेक्टर आहे. या हीरोला आदिती आवडत असते, पण जयशी असलेल्या तिच्या जवळिकीमुळे हा कायम त्या कांेडाळ्यात राहूनही बाहेरबाहेर राहतो. कॉलेजमधला, नाक्यावरला आपला ग्रुप आठवला की, असे अनेक रोल्टू आपल्याला आठवतात. कित्येत वर्षांनंतर भेटल्यावरही ते 'तिची' चौकशी करतात, तेव्हा काय बोलावं हेच कळत नाही. 

जय-मेघनाच्या ब्रेकअपनंतर आणि आदिती-सुशांतच्या भांडणानंतरही जय-आदिती आपलं प्रेम मान्य करायला तयार नसतात. त्या दोघांच्या मध्ये उभा असतो तो भलामोठ्ठा इगो. मैत्रीतला हा इगो म्हणजे दोन डोंगरामधली खोलखोल दरी... समजूतदारपणे आणि इनिशिएटिव घेऊन कुणी पुढे नाही आलं तर ही दरी कधीच भरली जात नाही. मग समोरासमोर राहूनही ते दोघं परस्परांपासून कोसो दूर राहतात. 

अशा वेळी आठवतात ते पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'तील रावसाहेब. आपला दोस्त आपल्याविरुद्ध कोर्टामध्ये केस लढवायला बेळगावात आल्याचं त्यांना कळतं. पण आजवर आपल्या घरी गप्पाचा फड रंगवणारा हा सवंगडी या वेळेला हॉटेलात उतरल्याने ते भलतेच पिसाटतात. ते तडक हॉटेलात पोहोचतात आणि एक 'भ'च्या बाराखडीतील करकच्चून शिवी घालत म्हणतात... कोर्टात भांडायला तुझा वकील आहे, माझाही आहे, मग इथे कशाला उतरलायस. चल वाड्यावर... 

पुलंच्या रावसाहेबांची ही 'रावसाहेबगिरी' थोडी तरी आपल्यात उतरली, तर मैत्रीतल्या या अंतरांनाच नव्या नात्याची पालवी फुटेल... 
पान : 1 2 »