Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "मराठी कविता"

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय,
"
स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु,
ती आपल्याजवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय, त्या कशाही जडतात,
हळुहळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन, सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

(नुकतीच एक फार छान कवितावाचनातआली, तुम्हांमराठी कट्टावरील मित्रांसाठी इथे प्रदर्शित करतोय.)

 

टी. व्ही. समोर बसून
उगाच चैनेल चाळत होतो
बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे?
मी म्हणालो भरपूर धूळ!
... .........
आणि भांडण जोरात सुरु झालं!

लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवी?
विचारलं तेव्हां म्हणाली-
अस काहीतरी हव...
...
एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!
मी वजन काटा दिला!
.........
आणि भांडण जोरात सुरु झालं!

रविवारी फिरायला जाऊया का? विचारलं...
मला महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
मी तिला पेट्रोलपंपावर नेलं!
.........
आणि भांडण जोरात सुरु झालं!

आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
काय मी भयंकर दिसतेय!!!
तुमच मत काय आहे?
मी म्हणालो
तुझा चष्म्याचा नंबर..
परफेक्ट आहे!
.........
आणि भांडण जोरात सुरु झालं!

मी विचारलं-
वाढदिवसाला कुठे जाऊ या?
ती म्हणाली
जेथे खूप दिवसात मी गेलेली नाही!
मी तिला स्वयपाक घरात नेलं!
.........
आणि भांडण जोरात सुरु झालं!

 

कवी - अनामिक

" घरटे  "


चिमण्याच्या घरट्या सारखे माझे पण घर ;

काट्याकुट्यानी गवताच्या काडीने बांधलेले ; 

एकत्र सर्वजण एकाच नात्याच्या धाग्यांनी बांधलेले;

आज एका माळेतल्या मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


सर्वांच्या तोंडी आई,बाबांनी प्रेमाचा घास भरवला होता;

सर्वांनाच मायेचा,प्रेमाचा आसरा त्यांनी दिला होता;

हाताच्या मुठीसारखे आम्ही सर्व एकत्र बांधलेले;

आज एका माळेतल्या मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


आई,बाबांच्या पायांशी स्वर्ग असतो असे सर्व म्हणतात;

त्यांची मायेची हाक़ सर्वांनाच समान असते;

मायेची सावट हि सर्वांच्या डोक्यावर असते पसरलेले;

आज एका मालेतल्या मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


आता हा मायेचा हाथ आमच्या डोक्यावरती नाही;

प्रेरणा देणारी,पाठीवरची थाप आमच्यासाठी ती नाही;

त्यांच्या सोबतीविना आयुष्य सारे आमचे बदललेले;

आज एका माळेतल्या मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


आई ची माये,बाबांचा राग अजून हि तसाच मनात आहे;

भावांची साथ,बहिणीचा लाड अजून डोळ्यात साठवून आहे;

सारे शून जणू माज्या हाथावर अजून हि तसेच रेखाटलेले;

आज एका माळेतल्या  मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


मृत्युच्या दारात असताना आपल्याला सर्वजण आठवतात;

आई,बाबा,भाऊ,बहिण,सर्वच डोळ्यासमोर येतात;

हे सर्व ह्या निसर्गाने,त्या देवाने किती शून्भांगुर केलेले;

आज एका माळेतल्या मोत्यांसारखे सर्वजण विखुरलेले;


मिलिंद सावंत 

डोळे तर आपले असतात
वाट मात्र दुसऱ्याची
बघतात,
.
हात तर आपले असतात
घडवत मात्र दुसऱ्याना
असतात,
.
वेदना अंतरीच्या असतात,
अश्रू मात्र डोळ्यातून
निघतात...
.
मन तर आंपल असतं
झुरत मात्र दुसऱ्यासाठी
असतं...
.
हे असलं कसलं नात असतं..
" खरचं कुणी कुणाचं नस...
mahendra Mar 11 '13 · Rate: 5 · Comments: 5 · Tags: marathi kavita, मराठी कविता
नेहमीच कशी आपली भेट ही पहिलीच भेट  असते...!

संकोचाची खोल दरी मध्ये पसरलेली दिसते....!

पहिल्याच डोळाभेटीत कशी जन्मोजन्मीची ओळख पटते ,

उपचाराच्या हात जोडण्यात सगळी दरी जुळून जाते.....!

चारच वाक्यात पुन्हा जमते नांव नसलेले  अतूट नाते,

मनामध्ये वाळले ,सुकले हिरवे होऊन चमकून उठते....!

एखाद्याच सौम्य हास्यात व्यक्त होतात कोमल कथा ,

नकळत सोडलेल्या एका उसाशात वाचता येतात मनोव्यथा ,

एकदम होते निरभ्र आकाश ताजे प्रसंन्न टवटवलेले ,

सगळ्या वेली , सगळे वृक्ष फळा फुलांनी लवथवलेले ,

मधले दिवस, महिने वर्ष - की मध्ये काहीच नसते...?

नेहमीच हि पहिली भेट - आणि आकाश निरभ्र होते.....!पान : 1 2 3 4 5 ... » »»