Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "मराठी कथा"
"हिला मनोरुग्णालयात दाखल करा......!!!!! " डॉक्टरांचे हे बोल ऐकून दीपक एकदम सुन्नच झाला. ठाण्याला ज्या कॉलेजमधे ती शिकत होती त्याच कॉलेज जवळ असलेल्या मनोरुग्णालयात तिला दाखल कराव लगणार होत. आईला हे कस सांगायचं बहिणीच पुढे काय होणार या विचाराने त्याच्या डोळ्यात अश्रू आले. सर्व धूसर दिसत होत तशातच त्याने ऑटो केला आणि तिला घरी घेऊन आला. आईने आल्यावर विचारले काय झाल? डॉक्टर काय म्हणाले ?दीपक काहीच बोलला नाही आई पण समजून गेली कि डॉक्टर काय म्हणाले असतील. काही दिवसांपासून ऋतुजाच जे वागण होत त्यावरून तिला अस होणार याची जाणीव होती. आजूबाजूचे लोक पण आपापसात कुजबुजत होते कि शालू बाईंची मुलगी वेडी झाली म्हणून. संध्याकाळ झाली होती सागर आपल्या बाहूत सूर्याला सामावून घ्यायला उत्सुक झाला होता. दीपक गॅलरीत येऊन बसला. जसजसा सूर्य मावळतीकडे झुकत होता तसतसा दीपकला त्याचा भूतकाळ समोर दिसत होता. लहानपणापासून मामांकडे राहायला असल्यामुळे आईवडीलांच प्रेम कमी मिळाल होत वयाच्या १५ व्या वर्षी वडिलांचं आजारपणामुळे निधन झाल. घरातली सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. आई, लहान बहिण, भाऊ या सर्वाना त्याला एकट्याला सांभाळायच होत.शेवटी नाईलाजाने त्याला शिक्षण सोडाव लागल.छोटी मोठी कामे करत त्याने आपल्या परिवाराला सांभाळायला सुरुवात केली.घरात तोच मोठा होता आई पण धुणी-भांडी करून थोडीफार मदत करायची. शिक्षण कमी असल्याने दीपक ला कोणती चांगली नोकरी मिळत नव्हती पण त्याचा स्वभाव मुळातच धडपड्या असल्यामुळे काही न काही उद्योग करत बसायचा. हे काम धर ते सोड अस काही ना काही चालू असायचं. textile मिल, स्टेशनरी शॉप अशी छोटी मोठी कामे त्याने केली. प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली आपल शिक्षण झाल नाही पण त्याने राजेश आणि ऋतुजाच शिक्षण योग्य रीतीने पूर्ण केल.

१० वर्ष सहज निघून गेलीत त्याला आज तो Reliance Communication मध्ये Sales Executive Post var Appointed आहे मे 2009 , राजेश चे Graduation complete झाले आणि त्याला चांगली नोकरी पण लागली. ऋतुजा collegela जायची आणि तिने aptech computer क्लास पण लावला होता. क्लासमध्ये तिची ओळख प्रशांतशी झाली. हुशार,शांत,मनमिळाऊ,आणि सर्वाना मदत करणारा असा मुलगा होता तो. त्याच व्यक्तिमत्व अस होत कि कोणालाही सहज पहिल्या भेटीतच आवडेल. साहजिकच ऋतुजा त्याच्या प्रेमात पडली. त्याला हे कळायला वेळ लागला नाही. गणपतीमध्ये विसर्जनाच्या वेळी त्याने तिला विचारलं ती चटकन हो म्हणाली कारण तिलाही तो हवा होता. कधी काही अडलं तर ऋतुजा त्याला विच्रायाची.एकदा power point मध्ये काहीतरी तिला अडलं. तिने त्याला विचारलं त्याने पटकन mouse वर हात नेला आणि त्याच वेळी ऋतुजा ने हि mouse धरण्यासाठी हात पुढे केला. त्याचा हात तिच्या हातावर होता. ऋतुजा शहारली त्याने हात काही क्षण तसाच ठेवला. तिने झटकन आपला हात मागे खेचला. अस काही न काही रोज व्हायचं. बाजूला बसला असताना तिच्या पायाशी चाळा करायचा मधेच तिची ओढणी खेचायचा. दोघांचा जाण्या येण्याचा रस्ता एकाच होता. त्यामुळे रोज भेटण व्हायचं. कोणी काही बोलतही नव्हत त्यांना. एकदा क्लास सोडून दोघेहीजण बाहेर फिरायला गेले. संध्याकाळचे 7:30 वाजले होते. ते एका बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या बाजूला फिरत होते. तिथे कोणी नव्हते बांधकाम बंद होत बर्याच दिवसांपासून. प्रशांत ने तिला आत चलण्यास सुचविले. तिने नकार दिला. पण तो ऐकेनाच आणि नंतर तिलाही ते हव हवंस वाटल. हळूच त्याच्या मागून ती चालत आली. पहिल्या माळ्यावरच्या व्हरांड्यात दोघेही जण उभे होते. त्याने तिची ओढणी काढून बाजूला ठेवली. केसांचा क्लीप काढला केस मोकळे केले. तिच्या कपाळावर ओठ टेकवले. हळूच डोळ्यांवर टेकवले. तिने डोळे बंद केले होते. त्याचे उष्ण श्वास तिला जाणवत होते. तिची काय थरथरत होती. हळूच त्याने तिचा खालचा ओठ आपल्या दोन्ही ओठात घेतला आणि मुक्तपणे त्याचे रसपान केले. तीही त्याला साथ देऊ लागली. त्याचे हात तिच्या केसातून, पाठीवरून फिरत होते. ती त्याला घट्ट बिलगली होती. काही वेळाने तिने आपले डोके त्याच्या छातीवर ठेवले आणि रडायला सुरुवात केली. त्याला एकच प्रश्न विचारत होती आपल लग्न होईल ना रे? तो म्हणाला नक्की होईल. त्याने तिचे डोळे पुसले.आजूबाजूला कोणी नाही याचा कानोसा घेत दोघेही दबक्या पावलांनी बाहेर आले. मुख्य रस्त्यावर आल्यावर रिक्षाने त्याने तिला घरी सोडल. आज ती खूप खुश होती.असच असत या वयात तृप्तीचा आनंदच निराळा असतो. त्या ३ महिन्यात असे कितीतरी वेळा त्या इमारतीला त्यांचा सहवास लाभला होता. दीपकला या बाबतीत थोडीशी भनक लागली होती, सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केले पण एका मित्राने सांगितले होते कि तुझी बहिण एका मुलासोबत अमुक अमुक ठिकाणी फिरत होती. त्यानुसार त्याने स्वताहून जाऊन ख-या-खोट्याची शाश्वती केली. त्याने तिला त्याच्यासोबत असताना बघितले. तो तिच्या समोर गेला आणि बाईक वरून तिला घरी घेऊन आला. खूप ओरडला तिला तीही त्याला प्रत्युत्तर देत होती. तो तिच्या अंगावर हात उचलायला धावला तोच आई मध्ये आली. आज त्याला खूप वाईट वाटत होते कारण ज्या बहिणीसाठी तो इतका झटला ,तिच्या सुखासाठी रक्ताच पाणी केल आज ती अशी बोलत आहे आपल्यासोबत . लहानपणी म्हणायची भाई मला हे हवंय ते हवंय त्याने प्रत्येक गोष्ट तिला दिली. आज तीच म्हणते भाई मला तो हवाय. आपल्या माणसांकडून जेव्हा जखम मिळते ना तेव्हा ती खूप गहिरी आणि खोल असते काळ्या कुट्ट अंधारासारखी. आजपर्यंत त्याने कधीच दारूचा घोट घेतला नव्हता पण आज मित्रासोबत बार मध्ये जाऊन बसला आणि मनसोक्त प्यायला मित्रांसमोर रडला, उलटी केली. त्या दिवशी घरी आला नाही मित्राकडेच झोपला. त्याने ठरवलं कि त्या मुलाला समजवायचं नाही ऐकल तर हातापायी करून चांगला धडा शिकवायचा. तो त्याला भेटायला गेला. प्रशांत ने त्याला सांगितलं कि मी तिच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तिच्याशी लग्नही करेन. दिपकने त्याला एकच गोष्ट सांगितली कि जर तू तिला पुन्हा भेटलास तर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाहीस. त्या दिवशी दीपक घरी आला. पण त्याला एक वेगळीच बातमी मिळाली घरी आईचे आणि ऋतूचे खूप भांडण झाले होते. आईने ऋतूला बरेच काही सुनावले होते. त्याचाच राग मनात ठेऊन ती कुठेतरी निघून गेली. ऋतुजा दुपारपासून कुठे गेली ते कोणालाच माहित नव्हत.तिचा cell हि swtched off लागत होता. दीपक ने बाईक वरून सगळीकडे शोधल बस stand , रेल्वे स्टेशन ,मैत्रिणीचे घर इतकाच काय तर त्याने प्रशांतलाही विचारलं पण त्यालाही माहित नव्हत.त्या दिवशी दीपक खूप घाबरला त्याला वाटल कदाचित तिने स्वताच्या जीवच बर वाईट तर नसेल केल ना? असंख्य प्रश्नांचा गोंधळ डोक्यात झाला. काय करावे काही सुचत नव्हते. कुठे शोधाव ,काय कराव, तिच्यासोबत काही बर वाईट तर झाल नसेल ना ?नाईलाजाने त्याने पोलीस स्टेशनला जायचे ठरवले. बाईक पोलीस स्टेशन च्या रस्त्यावर असतानाच एका देवळाजवळ त्याला ऋतुजा दिसली.त्याला इतका आनंद झाला कि त्याने जाऊन तिला मिठीच मारली आणि रडला खूप रडला. तिला घरी घेऊन आला आणि म्हणाला तूला पाहिजेल तसंच होईल पण पुन्हा तू अस करायचं नाहीस. 

काय माहित का पण त्याला प्रशांत वर विश्वास वाटत नव्हता.पण ऋतू मुळे तो त्याला भेटला त्याला म्हणाला प्रशांत जर तू तिच्याशी शेवटपर्यंत टिकवणार असशील तरच मी तुमच्या लग्नाला Support करेन.या जगातला कोणताही भाऊ आपल्या बहिणीचे प्रेमप्रकरण स्वीकारायला तयार नसतो पण दीपक ने ते केल. प्रशांतच्या past life विषयी जाणून घ्यायला दिपकने सुरुवात केली.२००६/०७ मध्ये त्याच्या आयुष्यात एक मुलगी होती.पण नंतर काही कारणांमुळे त्याचं बिनसलं.पण अजूनही ती एक मैत्रीण म्हणून त्याच्या
आयुष्यात आहे.जेव्हा दिपकने हे ऋतूला सांगितलं तेव्हा ती म्हणली कि मला प्रशांत ने सर्व काही सांगितलं आहे .आता ती फक्त त्याची मैत्रीण आहे बाकी काही नाही.ती त्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती कि तिचा कोणावरच विश्वास नव्हता.आपल्या व्यक्तिमत्वाने प्रशांतने तिला संमोहित केल होत एकप्रकारे. आणि ऋतूला पण प्रशांत आणि त्यांना Support करणाऱ्या मित्रांवरच विश्वास होता.सप्टेंबर २००९ च्या पहिल्या आठवड्यात मामा आणि मामीने ऋतू साठी एक स्थळ आणल होत.पण तिने त्याला नकार दिला होता.कारण तिला प्रशांतशी लग्न करायचं होत. दिपक प्रशांतला भेटायला गेला त्याने सांगितले कि तू तुझ्या घरच्यांना तुमच्याबद्दल सांग कारण आम्हाला ऋतूच लग्न करायचं आहे. माझ्या घरच्यांना मी तयार करतो. तेव्हा प्रशांत ने चक्क नकार दिला आणि म्हणाला कि माझ्या घरचे तयार नाही होणार. दीपक ने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकत नव्हता. दीपकला कळल कि त्याने फक्त टाईमपास केला होता. त्या क्षणी त्याला मारायचा विचार त्याच्या मनात आला पण तो तसाच घरी आला. आईला आणि ऋतूला घडलेला प्रकार सांगितला आईची परत बडबड सुरु झाली. पण दिपकने आईला शांत राहायला सांगितले कारण ऋतू खूप हळवी होती. त्याला भीती वाटत होती कि ती परत मागच्यासारख काही पाउल उचलेल. त्याने तिला समजावलं पण ती समजावण्याच्या खूप पलीकडे गेली होती. तिने त्याला call करण्याचा प्रयत्न केला पण त्याने काही receive केला नाही sms करून बघितले पण काही उपयोग झाला नाही.दुस-या दिवशी ती त्याला भेटायला घराजवळ गेली त्याच्याशी बोलली. त्याने परत आपल्या मधाळ वाणीने तिची समजूत घातली तिला सांगितलं कि बाबांना heart attack आला होता त्यामुळे हा विषय घरात नको. ते बरे असते तर मी त्याला conveyance केल असत पण आता मला त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा नाही. तिला तो हेही म्हणाला कि जर तुझ्या भावाने माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मी आपल्या जीवाच बर वाईट करून घेईन. तिने त्याला खूप समजावयाचा प्रयत्न केला पण त्याने दाद दिली नाही. घरी आल्यावर खूप रडली.

पाहिलं प्रेम
त्यात हळव मन
जणू काही
दावाग्नीने पेटलेल मन

अशी तिची अवस्था झाली होती.रडून रडून डोळे सुकले होते, दीपकला तिची अवस्था बघवत नव्हती तो यायचा तिला समजावयाचा पण काही उपयोग होत नव्हता. तासंतास एकटीच खिडकीबाहेर बघत बसायची शून्यात नजर लावून.कागदावर काही तरी चित्र रेखाटत बसायची. एक दिवस खूप ताप आला काही केल्या कमी होईना ताप डोक्यात गेला आकडी आली तिला हॉस्पिटलमध्ये admit करण्यात आल. दीपकला वाटल आता तरी प्रशांत येईल पण नाही तो आला नाही त्याच्या वडिलांची बदली पुण्याला झाली त्यामुळे तो निघून गेला होता. काही दिवसात तापातून ती बरी झाली.पण तीच वागण बदललं काहीही बडबड करायची,चिडचिड करायची हट्टीपणा वाढला.दिपकने डॉक्टरकडे दाखवलं औषोधोपचार चालूच होते. आपल्या बहिणीची हि अवस्था बघून दिपकलाही व्यसन लागल. दारूचा घोट घश्याखाली उतरल्याशिवाय त्याला झोप येत नव्हती एखादा दिवस घेतलीच नाही तर घसा सुका पडत होता. एक दिवस तिने आईला कारण नसताना मारलं लाटण्याचा वार असा होता कि आईला डोक्याला २ टाके पडले.मग मात्र डॉक्टरांनी दीपकला सांगितलं कि ती आता violent होत चालली आहे त्यामुळे तुम्ही तिला मनोरुग्णालयात दाखल करा.जिथे तिचा इलाज होईल जर घरी ठेवलं तर उद्या ती स्वताच्या किंवा तुमच्या कोणाच्या जीवाला हानी करू शकेल. अचानक आईने जेवायला हाक मारली आणि दीपक भूतकाळातून बाहेर पडला. आता त्याच्यासमोर काळाकुट्ट असा भविष्यकाळ होता. उठला जेवायला गेला.जेवताना आईला म्हणाला.ऋतुजाची bag भरायला घे उद्या जायचंय तिला...........

आजही दिपकपुढे एकाच प्रश्न आहे ज्या मुलाने त्याच्या बहिणीला फसवल त्याच काय करायचं,उद्या समजा ती बरी झाली आणि त्याने पुन्हा तिला त्रास दिला.sms करून,फोन करून तिच्या आठवणी परत जाग्या केल्या तर काय करायचं असे अनेक प्रश्न त्याला सतावत आहेत. त्याला तुमच्या मार्गदर्शनाचीगरज आहे 
प्रेम तर नव्हत ते होत फक्त आकर्षण तुझ्या चारोळ्यांच, कथांच, बोलण्याच बस बाकी काही नाही. मी वेडी त्यालाच प्रेम समजून बसली. बर झाल तू जाणीव करून दिलीस खर प्रेम काय असत ते. त्याग आणि प्रेम दोन्ही शब्द अडीच अक्षरांचे पण सर्वाना प्रेम हाच शब्द दिसतो अडीच अक्षरांचा. त्यात कराव्या लागणा-या त्यागाच त्यांना काही नसत. एखाद्यावर प्रेम केल म्हणजे तो मिळायलाच पाहिजे अस काही नसत. तिला किंवा त्याला मिळवण म्हणजेच प्रेम असत का ? त्या व्यक्तीला न मिळवताही त्याच्या मनात राहण, त्याच्या नकळत त्याच्या स्पंदनातून वाहण, पौर्णिमेच्या शुभ्र चांदण्यात त्यालाच पाहण, पापण्या कायमस्वरूपी मिटल्यावर त्या व्यक्तीच्या आसवांनी नहाण....हे खर प्रेम असत ....जे या जगात फार कमी दिसत.किती साध्या आणि सरळ शब्दात बोललास रे हे सार.

पहिल्याच दिवशी कॉलेज मध्ये भेटलो. वाटल नव्हत ती भेट एवढी पुढे जाईल. इंजिनीअरिंगच पहिलंच वर्ष.पहिलाच दिवस.खूप बर वाटत होत आवडत्या शाखेत प्रवेश मिळाला म्हणून पण मनात कुठेतरी एक भीतीही दाटली होती. रिसेसमध्ये मी आणि माझ्या मैत्रिणीला सिनीयर मुलीनी बाहेर बोलवलं.वर्कशॉप जवळ आमची रॅगिंग चालू होती .पहिली  ओळख विचारली. आम्ही दोघीही सर्व उत्तर देत होतो. आम्हाला तर काही कळतच नव्हत हे सर्व काय चालल ते. नंतर नंतर तर काहीही करायला सांगितलं. या मुलाला प्रपोज  कर, हे आणून दे, ते आणून दे. दोघीही अक्षरशः रडकुंडीला आलो. तुला काय वाटल कुणास ठाऊक तिथे आलास आणि क्लास मध्ये बोलावून घेऊन गेलास. पहिले तर कळलच नाही कि ओळख नाही पाळख नाही आणि लगेच कसा एकदम असा म्हणालास. मीही पटकन निघून आले मैत्रिणीला घेऊन. खरच त्या वेळेसखूप आधार वाटला रे तुझा. तू कोण काय काहीच माहित नव्हत. पण त्या वेळेस अनोळखी असूनही ओळखीचा वाटलास. त्या वेळेस तुला थॅक्स पण म्हणाली नाही कारण मीच त्या प्रकाराने भांबावली होती. नंतर एक दिवस तू केमिस्ट्रीच्या लॅब बाहेर भेटलास. मी पटकन आले आणि तुला थॅक्स म्हटलं.तू खूप अबोल वाटलास, कारण मुलगी स्वता:हून जेव्हा बोलायला येते तेव्हा मुल खूप काही बोलतात, तू फक्त एवढंच म्हणालास कि कोणीही बोलावलं तरी कुठेच जायचं नाही आणि लॅब मध्ये निघून गेलास. तू अबोल आहेस कि तुला बोलायला नाही आवडत कि अजून काही, काहीच मला कळल नाही. एकदा campus मध्ये तुम्ही मुल काहीतरी खेळत होता तेव्हा पहिल्यांदा तुला हसताना पाहिलं किती मस्ती चालली होती तुमची. एकमेकांना शिव्या देण मारण हे सार दुरूनच न्याहाळत होते आमचा group पुढे निघून गेला आणि मी तुलाच बघत बसली तेवढ्यात मैत्रिणीने आवाज दिला कि काय पाहतेस मी काही नाही म्हटलं. तुझी नजर तेवढ्यात माझ्यावर पडली. मी पटकन तुझ्याकडे न बघितल्यासारख करून निघून गेली. तुझी एक मैत्रीण आमच्या बायोटेक मधेच होती त्यामुळे तिच्याकडून तुझ्याविषयी कळल. त्या दिवशी तू तिला आमच्याबरोबर पाहिलं होतस म्हणून तू वा-यासारखा आलास आणि आमची त्या मुलींच्या तावडीतून सुटका केलीस .तू आय. टी. शाखेत होतास. त्या वर्गासामोरून जाताना नजर नेहमी तुलाच शोधायची. कॉलेज मधेही कुठेतरी दिसशील हीच अपेक्षा असायची. दिसल्यावर बस तुला पाहत रहावस वाटायचं बाकी काही नाही. त्या मैत्रिणीकडे तुझ्याविषयी विचारायची. तुम्ही दोघे ११ वी पासून friend होते.त्यामुळे ह्ळुह्ळु तुझ्याविषयी कळायला लागल. मलाही ते आकर्षण वाटलं तुझ त्या दिवशी अचानक येण, कमी बोलण या सर्वांवर मी भाळले असेल कदाचित. मैत्रीणीना हे जाणवत होत कारण मी कितीही टाळायचा प्रयत्न केला तरी राहून राहून तुझ्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता लागायची. पहिलं वर्ष असच निघून गेल जास्त बोलता आल नाही. पण दुस-या वर्षी तुला सांगितलं माझ प्रेम आहे तुझ्यावर. हलकीशी हास्याची लहर तुझ्या चेह-यावर उमटली. तेव्हा जो काही प्रेमाचा अर्थ तू सांगितलास तो आजही आठवतो मला. 

एखादी व्यक्ती आवडण म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमाला रूप नसत कोणीतरी चांगल दिसत, वागत, बोलत, लिहित म्हणून आपल्याला आवडत आणि त्याला प्रेम अस गोंडस नाव देतो. त्याचा सहवास हवा हवासा वाटण, त्याच्या नसण्याने डोळ्यात पाण्याच दाटण म्हणजे प्रेम नव्हे. या सर्व गोष्टीत आपण कसली न कसली अपेक्षा करत असतो. आणि प्रेम तर निरपेक्ष, निस्वार्थ असत मग हे प्रेम कस काय? मीरेने कृष्णावर केलेलं प्रेम म्हणता येईल कारण तिला त्याच्याकडून काही अपेक्षा नव्हती. बस त्याच्या भक्तीत विलीन होऊन त्या दगडाच्या मूर्तीशी बोलायची. कृष्णासाठीच तर तिने राजवैभवाचा त्याग केला आणि जोगीण बनली. प्रेमाला समानार्थी शब्द म्हणजे त्याग .दोन्हीही अडीच अक्षर अगदी एकमेकांना पूरक अशी. तू म्हणालास तुझ जे माझ्याप्रती आहे ते आकर्षणाचाच एक भाग आहे आणि तू त्याला प्रेम समजतेस. मला कळत नव्हत तुला काय म्हणाव ते. कारण तुझे वाक्य बरोबर होते. जेव्हा तुझा sms नाही यायचा तेव्हा मी उदास व्हायची कारण तुझ्या sms ची अपेक्षा करत बसायची, तू कॉलेजमध्ये दिसावा अस वाटायचं. खरच माझ तुझ्यावर प्रेम होत का? असच मला वाटायला लागल. तू दिसला नाहीस कि स्पंदन वाढायची मनाला सारखी तुझीच ओढ लागायची. किती प्रेमविवाह सफल होतात आणि किती नाही यामागे कारण एकच आहे आकर्षण. तू केव्हाच निघून गेला होतास आणि मी कॅटीन मध्ये तिथेच बसून होते तुझ्या शब्दांच्या मोहिनीतून बाहेर पडताच आल नाही लवकर. आज मी माझ्या नव-यासोबत खुश आहे. घरच्यांच्या सांगण्यानुसार विवाह केला. त्यांच्याबद्दल (नव-याबद्दल) काही माहिती नव्हत. एकदाच भेट झाली फ़ॉर्मल बोलण झाल बस एवढंच. आकर्षणाचा प्रश्नच नव्हता राहील त्यागाच तर त्यांना सर्वस्व अर्पण केल आहे. काही महिन्यात एकमेकांच्या स्वभावाचा नीट परिचय झाला. एकमेकांची आवड निवड कळली. संसाराचा रथ दोघंही व्यवस्थित सांभाळत आहोत. काही दिवसांनी तुझ्याविषयी पेपरमध्ये वाचायला मिळाल. उत्सुकता म्हणून त्या मैत्रिणीला तुझ्या विषयी विचारलं. तेव्हा बराच काही कळल मला एवढ सार लेक्चर देणारा तू प्रेमविवाह करशील अस कधीच वाटलं नव्हत. पहिले सर्वाना वाटलं तुझी तिच्याबातीत सहानुभूती असेल म्हणून आंधळी असूनही तू तिच्याशी लग्न केलस. पण तस नव्हत तिने तिच्या आंधळेपणाचा त्याग केला आणि तू तुझ्या डोळस असण्याचा. आज हे सुंदर जग ती तुझ्यामुळे बघू शकते. तुझ्या कवितातून त्याची तिला जाणीव होते. तुझ्या कविता जेव्हा ती तिच्या गोड गळ्यातून गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवते ना. तेव्हा खूप अभिमान वाटतो कि एके काळी मी तुझ्यावर प्रेम केल होत. अरे चुकलंच माझ प्रेम नाही तुझ्या कवितांच,बोलण्याच आकर्षण झाल होत.

मनापासून

दुपारचे तीन वाजले होते..केशव पाटीलाने बोलाविल्यामुळे मी त्याच्या घरी गेलो.

त्याच्या घरी बाजीवर पोलीस बसून होता.

      ‘तूच कारे रामराव.’ पोलीस म्हणाला.

      मी मान हालवली.

      त्याने मला कोर्टाचा समन्स दिला.

            मी घरी जायला वळलो. तेव्हा तो म्हणाला, ‘अरे,. मला दारुची शिशी आणून दे.’

      दारु आणि पोलीस असं हे विसंगत सुत्र पाहून मी अचंबित झालो. मी कुतूहलाने त्याच्याकडे ‘आ’ वासून थोडावेळ पाहातच राहिलो.

      पाटीलाने माझी संभ्रमीत अवस्था पाहून म्हणाला,

‘काका आहे ना घरी ?’ माझ्या बाबाला तो काका म्हणायचा.

      ’होमी म्हणालो. 

      मी घरी आलो. बाबा भजे बनवून धरणावर विकायला न्यायच्या तयारीत होता.

      ‘मला कोर्टाचा समन्स आला. पोलीसाने दारुची शिशी आणायला सांगितली. मी काय करु ?’ मी बाबाला विचारले.

      ‘त्याने पैसे दिले नसेलच. फुकटात पाहिजे असते लेकांना...!हरमखोर कुठले...!’ बाबाने त्याला शिवी हासडली.

      त्याने मला सुखदेव-काकाच्या घरी दारु आणण्यासाठी जाण्यास सांगितले.

      सुखदेवचं नाव घेतल्याबरोबर मला ती काळिज पिळवटून टाकणारी घटना आठवली.

शेतीच्या कामाची धांदल उडाली होती. अशावेळी खेड्यात सहसा दिवसा कोणी घरी दिसत नाहीत. शेतीच्या कामासाठी ते दिवसभर वावरात राहत असतात. मग गावातले लहान-सहान पोरं बेवारस कुठेतरी भटकत असलेले दिसतात.

त्यादिवशी दिवस बुडाला. तरीही त्याचे दोघेही मुले घरी आले नव्हते. म्हणून सारा गाव चिंतेत पडला होता. हातात कंदिल व बॅटर्‍या घेवून काही माणसं त्यांना शोधण्यासाठी रात्रभार फिरत होते.

त्या रात्री दोघाही पोरांचा थांगपत्ता लागला नाही.

सकाळी नानाची बायको विहिर्‍याजवळ गेली आणि ते दृष्य पाहून जोराने किंचाळली. तिला त्या दोन्हीही मुलांचे निर्जिव देह पाण्यावर तरंगत असलेली दिसली.

ती तशीच घाईघाईने भीतीने बावरलेल्या  अवस्थेत गावात आली. रस्त्यात भेटेल त्याला ही बातमी सांगत सुटली.

ते दृष्य मन हेलावणारे होते. दोघांही भावांचे शव एकमेकांच्या हातात हात घालून उबडे पाण्यावर पडले होते. त्यांचे कान कुरतडलेले होते. बहुतेक खेकड्याने खाल्ले असावे. पाण्यात बाजूला पळसाच्या पानाचे डोणे पडले होते. कोणी म्हणत यांना चकव्याने विहिर्‍यात ढकलले असावे, तर  कुणी म्हणायचे ते पाणी प्यायल्या गेले व घसरले असावे. अशाप्रकारे नाना तर्‍हेचे तर्कवितर्क पाहणारे लोकं करीत होते. ते पाहून सारा गाव हळहळला होता.

त्या दोन पोरांचे असे मरण पाहून आई बापाला काय वाटले असेल, कल्पनाही करवत नाही ! ते दृष्य डोळा भरुन पाहिल्यामुळे, त्या रात्री मला झोप आली नाही. डोळे मिटले की तेच दृष्य माझ्या डोळ्याच्या चक्षूसमोर उभं राहायचं. रात्रीला बाहेर पडायला भीती वाटायची. कित्येक दिवसपर्य़ंत त्या दृष्याची भयानता काही केल्या डोळ्यासमोरुन दूर होत नव्हती.

      याच आठवणीच्या तंद्रिमध्ये असतांना,मी सुखदेवच्या घरी पोहोचलो. मी त्याला दारुची शिशी मागितली.

      तो त्याच्या घराजवळील शेणखाताच्या उकंड्यात हात टाकून हिरव्या रंगाची मोठी काचेची शिशी -पळसाच्या पानाचे बूच लावलेली आणून दिली. मी ती पोलिसाला नेऊन दिली.

            मी तहसील कोर्टात तारखेवर हजर झालो.

तहसिलदार साहेबांनी आम्हा सर्वांना निरखून पाहिल्यावर मला विचारले,

            ‘तूझे नांव कायरे?‘

            ‘रामराव.’                 

            ‘काय करतो?’

            ‘शिकत आहे. बी.कॉम पार्ट टूला.

            ‘तू, पण या भांडणात होता काय?

            `नाही साहेब. भांडण सोडवत होतो.’

      त्यादिवशीची सारी हकिगत सांगितली.

.     तो दिवाळीचा दिवस असल्याने उत्साहाचा माहोल होता. आम्ही जेवायला बसलो.  एक-दोन घास तोंडात गेला असेल-नसेल तरबाहेर कल्ला ऎकू ला.

      दादा भरल्या ताटावरून तसाच उठला.

      आई म्हणाली, अरे शामराव...जाऊ नको. त्यांच्या भांडणात पडू नको. पहिले जेन घे. मग जा.

            ‘भांडण सुरु झाले आहे. कुणाचा  मुडदा पडेल काही सांगता येत नाही... मग निस्तारायला मोठात्रास होतो.

      दादा गांवचा सरपंच असल्यामुळे त्याला राहवले नाही.

      दादा बाहेर गेल्यामुळे आम्हालाही काळजी वाटायला लागली. म्हणून आम्ही पण जेवण अर्धवट टाकून बाहेर दमडू-मामाच्या घराजवळ आलो.

      पांदणीच्यारस्त्यावर दोन्ही बाजूने गोटमार चालू होती..जणूकाही दोन राष्ट्राच्या सैनिकामध्ये लढाई सुरु आहे की काय,असाच तो माहोल वाटत होता.मधातदादा उभा होता. तो हातवारे करुन दगडं मारु नका;असे ओरडून सांगत होता.  तेवढ्यातच  सुखदेव हातात कुर्‍हाड घेऊन पळत येत होता.तो माझ्याच वयाचा होता. तो जवळ आल्याबरोबर त्याच्याजवळची कुर्‍हाड हिसकावली.

      ’बस् ऎवढंच साहेब...’ मी म्हणालो.  

            ‘हो साहेब... हा माझा लहान भाऊ.... मी गांवचा सरपंच आहे. तो भांडणात नव्हता. तो कॉलेजमध्ये शिकत आहे. त्याला  विनाकारण या भांडणात गोवण्यात आले साहेब...दादाने काकुळतीने स्पष्टीकरण दिले.

      अस्सं काय ?

      तहसिलदार साहेबांनी इतरांकडे नजर वळवून गरजले.

कोणी टाकले या पोराचे नांव ?

      सारेच चिडीचूप झाले.

            ‘काढून टाका, याचं नाव... तुमच्या भांडणामूळे रेकॉर्ड खराब झालं तर पुढे त्याला नोकरी मिळणार नाही.

      सारेजण खजील झाले होते.

            मी तहसिलदाराच्या सांगण्याप्रमाणे अर्जनविसकडून अर्ज लिहून आणला.

      ‘जा आता. यापुढे तुला कोर्टात यायची गरज नाही. तुला नोकरी करायची आहे ना?’

      ‘हो साहेब.’

      ‘मग एक लक्षात ठेव... यापुढे तू भांडणाच्या वाटेला जात नको जाऊ.

      हो साहेब.मी खुषीतच बाहेर पडलो.

            खरोखरच माझं धूसर होणारं भविष्य त्यांनी वाचविलं.म्हणून मी मनातल्या मनात त्यांचे आभार मानले.

       तेव्हापासून मी भांडणाच्या थोड्याशाही धगीपासून चार हात दूर राहण्याचा प्रयत्‍न करीत आलो.

      तरीही एका बिकट प्रसंगात सापडलो होतोच.

संध्याकाळ होत आली होती. त्यावेळी सुरेभान माझ्या समोरुन घामाघूम होऊन पळत गेला. त्याच्या मागे किसन हातात दगड घेऊन धावत आला.

      ते दृष्य पाहून माझ्या अंगात काय विरश्री संचारली कुणास ठाऊक ! मी त्याच्या हातातला दगड खाली पाडला. एखाद्या शिकार्‍याच्या हातून शिकार निसटून गेली म्हणजे तो शिकारी कसा बावरतो ! तशीच अवस्था त्याची झाल्याची मला जाणवली. तो रागाने लालबूद झाला होता. माझ्यावर डोळे रोखून त्याने माझे मनगट करकचून धरले.

      त्याचं रौद्र रुप पाहून मी चरकलोच.

      पुन्हा माझ्या अंगात विरश्री संचारली. सर्व शक्ती एकवटून. त्याच्या हाताला असा काही हिसका मारला, की त्यामुळे माझा हात अलगद सुटून गेला. तसाच मी आंतमध्ये पळ काढला.

त्या वेळी मला वाचविणार्‍या त्या तहसिलदाराचे शब्द माझ्या कानावर आदळले, ’यापुढे तू भांडणाच्या वाटेला जात नको जाऊ...!

एक मुलगा एका कार अपघातात खूप गंभीर रित्या जखमी होता...
त्या अपघातात आणखी एकजण ठार सुध्दा झाला होता...
वेळीचं मदत मिळाल्याने या मुलाला लवकर शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात
आणण्यात आले होते...

मात्र डॉक्टर जाग्यावर नव्हते,
काही काळानंतर फोन केल्यानंतर डॉक्टर आले,
तितक्यात मुलाची आई एकदम रागात त्या डॉक्टर कडे पाहत म्हणाली,
तुम्हा डॉक्टर लोकांना दया नावाची गोष्टआहे का नाही...

माझ्या मुलाचे किती रक्त गेले मगापासून,
तुम्ही ­इतक्या हलगर्जीपणाने एवढे उशीरा का आलात..??

डॉक्टर म्हणाले आई मला माफ करा,
मला यायला जरा वेळ लागला मात्र आता मी आलो आहे...
देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल...

ती आई अजून रागाने म्हणाली तुझ्या माफी मागण्याने माझा मुलगा ठीकहोणार नाही,
तू जावून लवकर इलाज कर...

डाँक्टराने नर्स ला जवळ बोलावून घेतले आणि काहीतरी सांगून ते आत ऑपरेशन साठी गेले,
काही वेळाने ते परत आले
आणि त्या बाईला म्हणाले,
आई आता तुमचा मुलगा नक्की ठीक होईल,
थोड्या वेळाने त्याला शुध्द येईल, तुम्ही भेटू शकता...

आणि डॉक्टर शीघ्र तिथून चालते झाले...
ती बाई त्या नर्स ला म्हणाली,
या डॉक्टर ला एवढी कसली घाई,
जर माझा मुलगा शुद्धीवर आल्यावर गेले असते तर काय बिघडत होते...??

त्यावर नर्स म्हणाली,
बाई तुमच्या मुलाने मागच्या अपघातात
ज्या मुलाला ठार केले आहे तो याचं डॉक्टरचा मुलगा आहे...

Photo: एक मुलगा एका कार अपघातात खूप गंभीर रित्या जखमी होता...
त्या अपघातात आणखी एकजण ठार सुध्दा झाला होता...
वेळीचं मदत मिळाल्याने या मुलाला लवकर शस्त्रक्रियेसाठी इस्पितळात
आणण्यात आले होते...

मात्र डॉक्टर जाग्यावर नव्हते,
काही काळानंतर फोन केल्यानंतर डॉक्टर आले,
तितक्यात मुलाची आई एकदम रागात त्या डॉक्टर कडे पाहत म्हणाली,
तुम्हा डॉक्टर लोकांना दया नावाची गोष्टआहे का नाही...

माझ्या मुलाचे किती रक्त गेले मगापासून,
तुम्ही ­इतक्या हलगर्जीपणाने एवढे उशीरा का आलात..??

डॉक्टर म्हणाले आई मला माफ करा,
मला यायला जरा वेळ लागला मात्र आता मी आलो आहे...
देवाच्या कृपेने सर्व ठीक होईल...

ती आई अजून रागाने म्हणाली तुझ्या माफी मागण्याने माझा मुलगा ठीकहोणार नाही,
तू जावून लवकर इलाज कर...

डाँक्टराने नर्स ला जवळ बोलावून घेतले आणि काहीतरी सांगून ते आत ऑपरेशन साठी गेले,
काही वेळाने ते परत आले
आणि त्या बाईला म्हणाले,
आई आता तुमचा मुलगा नक्की ठीक होईल,
थोड्या वेळाने त्याला शुध्द येईल, तुम्ही भेटू शकता...

आणि डॉक्टर शीघ्र तिथून चालते झाले...
ती बाई त्या नर्स ला म्हणाली,
या डॉक्टर ला एवढी कसली घाई,
जर माझा मुलगा शुद्धीवर आल्यावर गेले असते तर काय बिघडत होते...??

त्यावर नर्स म्हणाली,
बाई तुमच्या मुलाने मागच्या अपघातात
ज्या मुलाला ठार केले आहे तो याचं डॉक्टरचा मुलगा आहे...


सायकोलॉजी टीचर वर्गात ‘तणाव व्यवस्थापन’ शिकवीत होती. व्याख्यानाच्या मध्येच तिनं पाण्यानं अर्धवट भरलेला एक ग्लास उचलला. वर्गातल्या सर्वांना वाटलं की टीचर आता विचारेल “हा ग्लास अर्धा रिकामा आहे की अर्धा भरलेला आहे?” पण तो अपेक्षित प्रश्न न विचारता चेह-यावर हास्य आणत तिनं विचारलं, “हा ग्लास किती जड आहे?”

वर्गाकडून आलेली उत्तरं वेगवेगळी असली तरी साधारण प्रत्येकानं सांगितलेलं उत्तर २०० ग्रॅम ते ४०० ग्रॅमच्या दरम्यान होतं.

ती उत्तर ऐकून ती पुन्हा हसली व म्हणाली, “नक्की किती वजन आहे हे महत्वाचं नाही. मी ग्लास कितीवेळ हातात धरते यावर ते अवलंबून आहे. मी एक मिनिट हा ग्लास हातात धरला तर काही प्राब्लेम नाही. पण मी तो एक तास हातात धरला तर माझा हात दुखू लागेल. मी जर पूर्ण दिवसभर तो हातात धरला तर माझा हात बधीर होऊन कदाचित हालचाल करू शकणार नाही. इथे ग्लासचं वजन बिलकूल बदलत नाही; पण मी जितक्या जास्त वेळ तो ग्लास हातात धरते तेवढा तो जड होतो.” विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात येईपर्यंत ती थांबली. मग म्हणाली, ‘आपल्या आयुष्यातल्या चिंता व तणाव या ग्लासप्रमाणेच आहेत. त्यांचा विचार थोडावेळ केला तर काहीच होत नाही. पण आणखी काही वेळ विचार करीत राहा आणि मग तो तणाव व चिंता तुम्हाला खाऊ लागतात. तुम्ही जर दिवसभर त्याबद्दल विचार कराल तर तुम्ही या हातासारखंच बधीर व्हाल. असं झालं तर मात्र तुम्ही दुसरं काहीही करू शकणार नाही.”

‘आणि म्हणूनच तुम्ही आपल्या चिंता व तणाव लवकरातल्या लवकर सोडून द्या. संध्याकाळपर्यंत आणि नंतर रात्रीसाठी त्याचं ओझं वागवू नका.

ग्लास खाली ठेवायला विसरू नका!  


Jyoti M Feb 23 '13 · Comments: 3 · Tags: stress, मराठी कथा, बोध कथा
पान : 1 2 »