Marathi blogs मराठी ब्लॉग्स

Tag search results for: "आई"

आईचं पिरेम म्हणजी आभाळाची माया,


तिच्या विना जगणं म्हणजी व्यर्थ ही काया,


देवही भूका व्हता आईच्या मायेसाठी,


म्हणून त्यानं जनम घेतला अनुसये पोटी,


काय सांगू तिची महती जी जगाला ठावं,


देवानं चमितकार केला आई तीचं नावं,


आज लाख मोठा मी पण ती आईची किमया,


तीनच शिकीवलं मला अ, आ, ई लिव्हाया,


राब राब राबली कामात जावा पैसं नव्हतं पोट भराया,


कष्ट केलं तिनं लयं मला शिकंवाया,


लाख संकट आली पण आधार तिचा व्हतां,


तिच्या रुपात देवच माझ्या पाठीशी व्हतां,


माझं वचन आये तुला न्हाय सोडणार तुझी साथं,


तुझ्या प्रेमासाठी आतुरलेले मन हे गातं,


लय पिरेम दिलसं मला राहू दे तुझी छाया,


तुझ्या मायेसाठी सदा भुकेली ही काया.... सदा भुकेली ही काया.....

Dipak Sonavane May 8 '13 · Tags: आई

आई...........!!!


आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,

आई म्हणजे साठा सुखाचा....

.............आई म्हणजे मैत्रीण गोड,

.............आई म्हणजे मायेची ओढ.....

आई म्हणजे प्रेमाची बाहुली,

आई म्हणजे दयेची सावली......

.............आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,

.............आपल्याला भरवणारी.......

.............आई म्हणजे जीवाचं रान करून,

.............आपल्यासाठी राबणारी.......

आई म्हणजे जगण्याचा अर्थ शिकवणारी,

जे कधी ओरडून समजावणारी,

आईच बोट धरून चालायला शिकवणारी,

आईच आपले अस्तित्व घडवणारी.........

Dipak Sonavane May 8 '13 · Tags: आई
प्रणव तो ओंकार असत नाही 

बालपणी मी प्रथम बोललो आई 

जल हे जीवन असत नाही 

जीवनाहून अधिक असते आई 

आग ही जाळत काही नाही 

सुर्याहून दाहक असते आई 

झंझावातात वारा असत नाही 

मायेची फुंकर असते आई 

आकाश अनंत असत नाही 

निस्सीम प्रेम असते आई 

पंचमहाभूतांचे जग असत नाही 

सर्वांचे जग असते आई 

Rahul Phansalkar May 7 '13 · Tags: aai, आई

आई 


मन दाटून आणि डोळे चटकन भरून येते ;

एका त्या हाकेने जणू काळीज चिरून जाते ;

तिच्या हाताची उब अजून हाताला जाणवते ;

जेव्हा आई ची हाक़ हृदयाला भिड्सावते ;


तिच्या कर्तुत्वाची किंमत चुकवणे शक्य नाही ;

अरे ती कुठे काय मागते तुमच्या प्रेमाच्या पोटी अभावी ;

दोन बोल प्रेमाचे आणि प्रेमाची हाक़ तिला हवी वाटते ;

जेव्हा आई ची हाक़ हृदयाला भिड्सावते ;


सर्व काही विसरून फक्त तुमचीच सेवा ती करते ;

उपाशी तापाशी काट्या कुत्यातून काम ती करते ;

आपली तहान भूक विसरून तुमचे पोट ती भरते ;

जेव्हा आई ची हाक़ हृदयाला भिड्सावते ;


जन्म आपल्याला देताना वेदना ती सहन करते ;

आपल्याला पोसण्यासाठी ते रोज रोज मरत असते ;

स्वतासाठी नाही आपल्यासाठी ती जगून मरत असते 

जेव्हा आई ची हाक़ हृदयाला भिड्सावते ;


तुम्ही देणाऱ्या सुखाची गरज कधीच तिला भासत नसते ;

तिने केलेल्या उपकाराची जाणीव कधी कोण ठेवते ;

तिने पाजलेल्या त्या दुधाची जान ठेवावीशी वाटत्ते 

जेव्हा आई ची हाक़ हृदयाला भिड्सावते ;


आई ला आपल्या देवापेक्षा हि उंच स्थानी ठेवावे ;

तिने रक्ताचे पाणी करून दिलेल्या प्रत्येक घासाला जगावे 

आयुष्यात आई सर्वाना फक्त एकदाच भेटते 

नसली जरी कधी ती आपल्यासोबत तरी तिची ती हाक़ आज हि माझ्या काळजाला चिरते .........काळजाला चिरते !!!!!!


written by: मिलिंद सावंत 

MILIND SAWANT May 3 '13 · Tags: आई
Aai
सकाळी दोन धपाटे घालुन उठवते.. ती आई
उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते.. ती आई
नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते.. ती आई
काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते.. ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते.. ती आई
परतीची आतुरतेने वाट बघत असते.. ती आई
आपण झोपत नाही तोवर जागी असते.. ती आई
आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण..
ती फ़क्त आईच..! ती फ़क्त आईच..!

पान : 1 2 »