॥ असं कसं नि किती का म्हणून जगायचं ?॥ from siddheshwar patankar's blogसिंव्हाने मारायचं 

तरसाने पळवायचं 

मेहनत करायची दुसऱ्यानेच 

भलत्यानेच फळ खायचं 

सांग देवा तूच आता 

असं कसं नि किती जगायचं 

कोंबडीने अंड दिलं तरी 

मालकंच त्यावर ताव मारी 

येता पाहुणे घरी 

कोंबडीच कापून स्वागत करी 

अंडपण द्यायचं आणि वेळेसरशी मरायचं 

सांग देवा तूच आता , कोंबडीने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? 

युगेयुगे चालू असाच तुझा गाडा 

मरणारे मरतायंत पोटाला खड्डे पडून 

जिवंतपणीच आपणसुद्धा असंच बघून मरायचं 

हात नाय उचलायचं कि काय नाय बोलायचं 

सांग देवा तूच आता , समद्या जगाने तरी 

असं कसं नि किती का म्हणून जगायचं ? सिद्धेश्वर विलास पाटणकर


Share:
Previous post     
     Next post
     Blog home

कट्ट्याची भिंत

कुठलीही प्रतिक्रिया नाही
You need to sign in to comment

Post

By siddheshwar patankar
Added Oct 26

Tags

Rate

Your rate:
Total: (0 rates)

Archives