सभासद - Members

Follow Us on Facebook

ब्लॉग्स - Blogs

You need to sign in to comment
Jul 21
न माँग कुछ जमाने से,
ये देकर फिर सुनाते हैं।
किया एहसान जो एक बार,
वो लाख बार जताते हैं।
है जिनके पास कुछ दौलत, समझते हैं खुदा हैं हम।
ऐ बन्दे तू माँग श्याम मुरलीवाले से,
जहाँ माँगने वो भी जाते हैं।
Jun 21
माउली ......

एका खेडे गावात एक आई आणि तिचा १०-१२ वर्षाचा मुलगा राहत होते,

उद्या आपला मुलगा जत्रेला जाणार त्याच्या हातात १० रुपये तरी असावे,

पण घरात १० रुपये नाही म्हणून त्या माऊलीने बाजूच्या शेतात राबायला गेली संध्याकाळी मजुरीचे पैसे आणले, तितक्यात मुलगा शाळेतून आला आई ला म्हणाला मला जेवायला दे मी लवकर झोपतो उद्या जत्रेला जायचे आहे सकाळी लवकर उठेन.

मुलगा सकाळी लवकर उठला त्या माऊलीला पण उठवले, मुलगा अंघोळीला जाताना आईला म्हणाला आई लवकर न्याहारी तयार ठेव मी लगेच अंघोळ करून घेतो

माऊलीने भाकर करून ठेवली, दुध चुलीवर होते, मुलगा अंघोळ करून आला आई जवळ बसला आणि आई ला म्हणाला मला लवकर दुध आणि भाकरी दे मला उशीर होतोय

आई ने आजू बाजूला पहिले दुध उतरवायला काहीच सापडत नव्हते पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर माउलीने विचार न करता तसाच दुधाचा टोप हाताने उतरवला गरम दुधाच्या टोपाचे चटके मस्तकाला वेदना देऊ लागल्या हाताची लाही लाही झाली, पुन्हा मुलाचा आवाज आला आई लवकर कर न उशीर होतोय त्या माउलीने पुन्हा टोप उचलून दुध प्यालात ओतले आणि मुलाला दिले, त्या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्या मुलाने मान खाली घालून न्याहरी केली. आई ने जवळचे १० रुपये त्या मुलाला दिले,

मुलगा जत्रेत गेला संध्याकाळी परतला आई ने विचारले बाळा जत्रेत की की पहिले मुलाने जत्रेतल्या गमती जमाती सांगितल्या मग आईने विचारले दिलेल्या १० रुपयाचे की केलेस काही खाल्लेस कि नाही,

त्या मुलाने आई ला सांगितले की तू डोळे बंद कर मी काहीतरी आणले आहे तुज्यासाठी माऊलीने डोळे बंद केले मुलाने खिश्यातून सांडशी काढून आईच्या हातात दिली, आई च्या डोळ्यात त्या संड्शीच्या स्पर्शाने अश्रू आले

आई धन्य झाली…..आईच्या हाताला झालेली इजा त्या मुलाच्या मनावर इजा करून गेली.कुठेतरी छानसे वाचलेले ………
Jun 13
युं ही हम दिल को साफ़ रखा करते थे ..
पता नही था की, 'किमत चेहरों की होती है!!'
पान : 1 2 3 4 5 6 7 8 ... » »»

Newsfeed

 • आयुष्य थोडसच असावं पण..
  आपल्या माणसाला ओढ
  लावणारं असावं, आयुष्य
  थोडंच जगावं पण..जन्मो-
  जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम
  असं द्यावं की..घेणा-याची
  ओंजळ अपुरी पडावी, मैत्री
  अशी असावी की..स्वार्थाचं
  ही भानं नसावं, आयुष्य असं
  जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
  "जग अजून, मी येईन नंतर...
 • Pravin liked Sanjeev's status
  खाली आपल्या लाडक्या गणेशाच्या आरती चा अर्थ दिला आहे.

  आरती चा अर्थ समजुन ती म्हणल्यावर अजुन चांगला देवाप्रती भाव चांगला होतो.

  आणि हा अर्थ गणपती बसायच्या आत सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करा.


  सुखकर्ता दु:खहर्ता.
  म्हणजे:- (सुख देणारा दुःख हरण करणारा)

  नुरवी
  म्हणजे:- दुःखाचा समुळ नाश करतो।

  पुरवी प्रेम कृपा जयाची।
  म्हणजे:- त्याची कृपा झाली की प्रेमवर्षावा भक्ताला लाभ होतो।

  सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची।।
  म्हणजे:- गणेश सर्वांगाने सुंदर आहे. त्याने शेंदुराची उटी लावली आहे।

  कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।।
  म्हणजे:- त्याच्या कंठात मोत्याची माळ झळाळत आहे।।१।।

  जय देव जय देव जय मंगलमूर्ति।
  दर्शनमात्रे मन: कामना पुरती।।धृ।।
  म्हणजे:- हे देवा, तुझा जयजयकार असो। तु मंगलाची प्रत्यक्ष मूर्तीच आहेस। तुझ्या केवळ दर्शनानेच भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात।।धृ।।

  रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा।

  म्हणजे:- हे गौरीकुमारा रत्न जडवलेला मुकुटाचा पुढील भाग तुझ्या कपाळी आहे।

  चंदनाची उटी कुमकुमकेशरा।
  म्हणजे:- कुंकू आणि केशर मिश्रित चंदनाची उटी तु लावली आहे।

  हिरेजडित मुकुट शोभतो बरा।
  म्हणजे:- हि-यांनी जडलेला मुकुट तुझ्या मस्तकावर शोभून दिसत आहे.

  रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया।।२।।
  म्हणजे:- तुझ्या पायांतील वाळ्यांतील घूंगरांचा रुणझुण असा मंजूळध्वनी होत आहे।।२।।

  लंबोदर पीतांबर फणिवरबंधना।
  म्हणजे :- मोठे पोट असणा-या, पीतांबर नेसलेल्या, कमरेला नागाचे बंधन (कडदोरा) असलेला.

  सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना।
  म्हणजे:- सरळ सोंड व वाकडे तोंड असणा-या, म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे व बोलणारे अशांना शिक्षा करुन त्यांना सरळ मार्गावर आणणा-या, त्रिनयना (३ नेत्र असणा-या)।

  दास रामाचा वाट पाहे सदना।
  म्हणजे :- हे गणपते मी रामाचा दास (समर्थ रामदास स्वामी) माझ्या घरी मी तुझी आतुरतेने वाट पहात आहे।

  संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना।।३।।
  म्हणजे:- हे सुरवरवंदना - सर्वश्रेष्ठ देवांकडून वंदिल्या जाणा-या हे गजानना, सर्व संकट प्रसंगी तु मला प्रसन्न हो. माझा संभाळ कर।

  निर्वाणी - अखेरीच्या, देहत्यागाच्या वेळी तु माझे रक्षण कर ही तुझ्या चरणी नम्र प्रार्थना।

  -समर्थ रामदास स्वामी.
  काल, 22:11
  0 1
  Pravin likes this
 • SUNILKUMAR commented on तेजू's video
  Mee marathi........मी मराठी .
  उत्तंग भरारी घेऊया , मी मराठी .
  Jun 24 '13
  hello
  namaste
  Jul 28
  hi
  काल, 20:22
  hii
  You need to sign in to comment
 • Basavaraj Bhuse joined group
  "लहानपण दे गा देवा "
  "लहानपण" हा शब्द जरी उच्चारला तरी लगेच लहान झाल्यासारखे वाटते... म्हणूनच हा समूह.... थोडे आपण पण लहान होऊयात ... आणि आपल्या लहानपणीच्या गोष्टी शेअर...
  सभासद : 7
 • आई..........................


  एका गावात एक बाई आपल्या छोट्या मुलाबरोबर एका छोट्या झोपडीत राहात होती. आपल्या मुलाला काही कमी पडू नयेम्हणून दिवसरात्र एक करून ती काम करत असे; पण त्या छोट्या मुलाला मात्र, आपली आई अजिबात आवडत नाही. तो तिचा तिरस्कार करत असतो; कारण तिला एकडोळानसल्यामुळे ती भेसूर दिसत असते. आईला तो शाळेतही येऊ देत नसतो.
  एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागते; पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे मुलाला कळत नाही . रागाचा एककटाक्ष टाकून तो तिथून पळून जातो. घरीआल्यावर तो आईला प्रचंड बोलतो.””कशाला आली होतीस शाळेत? आता माझे मित्र मला चिडवतील? मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही?मला तू अजिबात आवडत नाहीस.” वगैरे वगैरे. आई काहीही बोलत नाही. आपण आईला खूप बोललो, याचे मुलालाही काही वाटत नाही. रागाने तो नुसता धुमसत असतो. आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो. रात्री कधीतरी त्याला जाग येते; तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्‍या आवाजात त्याची आई रडत असते. पण त्याचेही त्याला काही वाटत नाही. एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो.
  त्या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूपमोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे.
  त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात येतो.नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्‌द्‌यावर काम करू लागतो. एका सुंदर मुलीशी त्याचे लग्न होते. त्याला एक मुलगा, एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण होते; कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नसते. तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो. अतिशय सुखात असतो.
  एक दिवस त्याच्या घराचे दार वाजते. दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एकाडोळ्याची आई उभी असते. तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते. तोआधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, “”कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली.”
  “”मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले,” असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते. तिने आपल्याला ओळखले नाही, अशा समाधानात (?) मुलगा दार लावून घेतो.
  काही दिवसांनी, माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते. परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो. ऑफिसच्या कामासाठी जातोय, असे बायकोला खोटेच सांगतो.
  संमेलन पार पडते. कुठल्यातरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात. दाराला कुलूप असते. शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते. ते पत्र त्याच्या आईचे असते.
  तो वाचू लागतो,
  “”… मी खूप आयुष्य जगले. तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही; पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा आहे. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते; पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले. कारण मला माहिती आहे, एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का, असेही तू मला एकदा विचारले होतेस. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही; पण आज सांगते. बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाले आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही.”तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे,’ असाच विचार मी करते. कधी काळी माझ्या भोवतीभोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस…”
  पत्र वाचून मुलगा ढसढसा रडू लागला.. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्‍चात्ताप झाला, तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला; पण आता त्याचा काय उपयोग होता?
  कुठेतरी छानसे वाचलेले ………
 • SUNILKUMAR commented on dipraj's photo
  hi friend
  काल, 20:06
  4 1
  SUNILKUMAR likes this
  Jul 26
  nice
  Jul 26
  thanks priyanka,ganesh
  काल, 20:06
  सुंदर
  You need to sign in to comment
 • SUNILKUMAR liked priyanka's blog post
  कधी कधी मैत्री आयुष्य बनुन जातं..
  कधी कधी मैत्री आयुष्य बनुन जातं
  तर कधी मोत्यांच्या माळेसारखे
  नकळत तुटुन जातात......

  जाताना मात्र आठवणींच्या बेटावर
  एकटे सोडुन जातात ......
  तुझी...
  काल, 20:05
  0 4
  4 members like this
 • SUNILKUMAR liked Santosh Warge's photo
 • KAILAS JADHAV and Asmita Mane are now friends
 • Santosh Warge and sadanand borkar are now friends
'':
fade
slide
Rating: